बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या जीवनावर लवकरच वेब सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. ‘लॉरेन्स – अ गँगस्टर स्टोरी’ असे वेब सीरिजचे नाव आहे. इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने या शीर्षकाला मंजुरी दिली असून जानी फायरफॉक्स फिल्म प्रोडक्शन हाऊसची ही निर्मिती आहे. वेब सीरिजमध्ये लॉरेन्सच्या आयुष्यातील अनेक घडामोडी दाखवण्यात येणार आहेत. लॉरेन्स बिष्णोई 2014 पासून कारागृहात आहे, मात्र असे असतानाही त्याचे देशातील आणि अमेरिकेतील गुन्हेगारी नेटवर्क वाढतच जात आहे. तुरुंगात बसून तो एकामागून एक गुन्हे करत आहे.