नाना पाटेकरांच्या ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ चा ट्रेलर रिलिज

मुंबई

चित्रपटसृष्टिचे ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांनी अनेक गंभीर भूमिका केल्या आहेत. कधी रागीट, सनकी, प्रेमळ, अशा अंदाजात दिसलेले नाना लवकरच आपल्याला एका गुढ भूमिकेत दिसणार आहेत. येत्या व्हॅलेण्टाईन डेच्या निमित्ताने नानांचा ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ हा चित्रपट रिलिज होणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. चित्रपटात कवी असलेले नाना कधी रोमॅण्टिक अंदाजात तर कधी अनाकलनीय अंदाजात दिसत आहेत.

या चित्रपटात नानांसोबत माही गिल ही अभिनेत्री आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग गोव्यात करण्यात आले आहे. आपल्या पती सोबत ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ साजरी करायला गोव्यात आलेली माही नानांना भेटते, त्यांच्यात मैत्री होते. मात्र नाना माहीशी सलगी करायला लागल्यामुळे दोघांमध्ये भांडण होते व ती त्यांना घराच्या बाहेर काढते. त्यानंतर माहीच्या आयुष्यात अनेक रहस्यमयी घटना घडतात. अशी या चित्रपटाची कथा हलक्याफुलक्या मूडवरुन रहस्याकडे वळत जाते.