भविष्य रविवार ११ ते शनिवार १७ फेब्रुवारी २०१८

27

>> नीलिमा प्रधान

मेष – चांगली योजना राबवा

या आठवडय़ात प्रत्येक दिवस तुमच्यासाठी यशाचा ठरेल. जोरदार प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात तुमचे डावपेच महत्त्वाचे ठरतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. लोकहितासाठी चांगली योजना राबवा. लोकसंग्रह व्यापक स्वरूप धारण करील. कुटुंबातील वातावरण तुमचा उत्साह वाढवणार आहे.
शुभ दिनांक : १२, १३.

वृषभ – नोकरी मिळेल

नम्रता ठेवा. अतिरेक टाळा. दुसऱयांचे विचार समजून घ्या. मुद्दय़ाचे बोला. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राखता येईल. सामाजिक कार्यातील दोष अचूक दूर करू शकाल. नोकरीचा प्रश्न सुटेल. परदेशी जाण्यासाठी कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. नंतर अधिक वेगाने कामे होतील.
शुभ दिनांक : १३, १४.

मिथुन -विद्यार्थी वर्गाला यश मिळेल

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, ताणतणाव आठवडय़ाच्या शेवटी कमी होतील. कौटुंबिक चिंता मिटेल. विद्यार्थी वर्गाने जास्त मेहनत घेतल्यास मनाप्रमाणे यश मिळेल. नोकरीत प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायातील अडचणींवर मार्ग शोधू शकाल. कोर्ट केससंबंधी शुभ समाचार मिळेल.
शुभ दिनांक : १६, १७.

कर्क -मौल्यवान वस्तू सांभाळा

मन अस्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तीची प्रकृतीसंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. वाटाघाटीत तणाव होईल. राजकीय क्षेत्रात दडपण येईल. कामाची तत्परता दाखवा. सामाजिक क्षेत्रात आरोप येतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. इतरांची नाराजी होईल. कोर्ट केसच्या कामात अडचणी येतील.
शुभ दिनांक : १३, १४.

सिंह – कंत्राट मिळेल

राजकीय क्षेत्रातील अडचणींचे काळे ढग दूर होऊन स्वच्छ आकाश निर्णय घेण्यासाठी मिळेल. सामाजिक क्षेत्रात लोकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक मदत मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. लोकोपयोगी योजना मार्गी लावा. सर्वांच्या गरजा ओळखून काम करा. व्यवसायातील गुंतवणूक वाढवता येईल.
शुभ दिनांक : १२, १६.

कन्या – योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठेवर टीकास्त्र सोडले जाईल. सामाजिक क्षेत्रात लोकांची नाराजी होईल. भलत्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. तुमच्या कार्यातील उणिवा समजून घ्या. निराश व उदास होण्यापेक्षा चुका समजून घ्या. म्हणजे अधिक चांगले काम करता येईल.
शुभ दिनांक : ११, १३.

तूळ – व्यवसायात जम बसेल

आप्तेष्टांच्या कार्यात सहभागी व्हाल. नवीन परिचय होईल. व्यवसायात जम बसेल. नोकरीचे प्रयत्न चालू ठेवा. राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढेल. नव्या दिशेने तुमचे कार्य आरंभ करू शकाल. सामाजिक क्षेत्रात कोणाच्या तरी ओळखीने रेंगाळत राहिलेले कार्य पूर्ण होईल. आर्थिक सहाय्य मिळू शकेल.
शुभ दिनांक : १६, १७.

वृश्चिक -प्रतिष्ठा वाढेल

संमिश्र स्वरूपाच्या घटना राजकीय क्षेत्रात घडतील. संभ्रमात पडाल. प्रतिष्ठा वाढेल तरीही विरोधाचा सामना करावाच लागेल. सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. व्यवसायात अंदाज घेणे कठीण होईल. तुमचा उत्साह व आत्मविश्वास टिकून राहील. त्यामुळे प्रसंग निभावून नेता येईल.
शुभ दिनांक :११, १२.

धनु -आर्थिक लाभ होईल

तुमचा प्रत्येक दिवस पराक्रम गाजवणारा असेल. विरोधकांना योग्य शब्दांत योग्य तो धडा शिकवता येईल. साहित्यात प्रसिद्धी व पैसा मिळेल. राजकीय क्षेत्रात जबाबदारी वाढेल. तुमचे वर्चस्व सिद्ध करण्याची तुमची ईर्षाही वाढेल. गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. वेळ येईल तेव्हा त्यांना उत्तर देता येते.
शुभ दिनांक : १३, १४.

मकर -जमिनीचा व्यवहार होईल

राजकीय क्षेत्रात आत्मविश्वासाने कार्य मार्गी लावता येईल. प्रतिष्ठा वाढेल. जमिनीचा व्यवहार होईल. लोकांच्या गरजेचा विचार तुम्ही करता. सामाजिक कार्यातील अडचणी दूर होतील. किरकोळ ताणतणाव होतील. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. चर्चा सफल होईल. प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या सुटेल.
शुभ दिनांक :१४, १६.

कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या

राजकीय क्षेत्रातील मतभेद मिटवता येतील. लोकांचा कल ओळखून त्यानुसार योजना तयार करा. वरिष्ठांना आठवडय़ाच्या शेवटी भेटा. सामाजिक कार्याचा विस्तार होऊ शकेल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नवा फंडा शोधता येईल. प्रकृतीसंबंधी असलेली चिंता पुढील आठवडय़ात कमी होऊ शकते.
शुभ दिनांक : १६, १७.

मीन -संयम राखा

आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. नंतर संघर्ष वाढेल. राजकीय क्षेत्रात अचानक कार्याला कलाटणी मिळेल. तुमच्या विरोधात वरिष्ठ जाण्याची शक्यता निर्माण होईल. चाचपणी करा. संयमाने बोला. सामाजिक कार्यात विलंब होईल. चर्चा करताना मनाची अस्थिरता वाढू शकते.
शुभ दिनांक : ११, १२.

आपली प्रतिक्रिया द्या