आठवड्याचे भविष्य – 11 ते 17 जानेवारी 2020

3610

<< मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ) ,[email protected] >>

मेष – कणखर राहा
या आठवडय़ात खूप भावनिक व्हाल. पण व्यवहारात कणखर राहा. तुमच्याजवळ अतिरिक्त पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवा. तुमच्या आनंदी स्वभावामुळे नवे मित्र जोडलं. धार्मिक कार्यासाठी चांगला आठवडा. जांभळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – डिझायनर दागिने, हातरुमाल

वृषभ – ऊर्जेने भारलेले
तुम्ही अत्यंत उत्साही आणि उर्जेने भरलेले आहात. त्या उर्जेला योग्य जागी वळवा. त्यातून दूरगामी फायदा होईल. विशेषतः खेळाडूंनी आपल्या उर्जेकडे लक्ष द्यावे. योग्य जागी मेहनत करा. स्वप्ने साकार होतील. पांढरा रंग उर्जा प्रदान करणारा आहे.
शुभ परिधान – काश्मिरी शाल, कुर्ता

मिथुन – मनं जुळतील
तुमचे खरे प्रेम तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्हाला कशाचीही गरज भासणार नाही. पण थोडा संयम बाळगल्यास हमखास याशाप्राप्तीही होणार आहे. फक्त प्रयत्नात सातत्य ठेवा. जोडीदाराशी मन जुळेल. कोणताही चमकदार रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पलाझो, स्टोल

कर्क – आनंदी घटना
खूप सुंदर आठवडा. अनेक सुंदर, महत्त्वपूर्ण घटना या आठवडय़ात घडणार आहेत. त्यासाठी मनाने तयार राहा. छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका. हातून उत्तम सामाजिक कार्य घडेल. गुलाबी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी साडी, लिननचे जॅकेट

सिंह – अर्थप्राप्ती होईल
परिपूर्ण आत्मविश्वासाने भरलेला आठवडा. विनाकारण एखाद्या घटनेचा तणाव घेऊ नका. आयुष्यात चढउतार येतच राहतात. त्याला समर्थपणे तोंड द्या. मोठे आर्थिक व्यवहार कराल. त्यात तुमचा फायदा होईल. पिवळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नऊवार साडी, लिपस्टिक

कन्या – सर्जनशील कार्य
खर्चात वाढ झाल्याने तुम्ही त्रस्त असाल. पण काळजी नको. अर्थप्राप्ती होणार आहे. आनंद सोहळा साजरा कराल. त्यामुळे तृप्त व्हाल. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे हातून सर्जनशील कार्य घडेल. लाल रंग परिधान करा.
शुभ परिधान – कार्डिगन, झब्बा

तूळ – स्वत:वर विश्वास
महत्त्वाची गुंतवणूक कराल. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची सर्व आर्थिक गणिते चांगल्या अर्थाने बदलतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. त्यातून खूप फायदा होईल. कुटुंबियांसमवेत वेळ घालवाल. घरातील लहानांना वेळ द्या. राखाडी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – भरजरी वस्त्र, हिऱयाची अंगठी

वृश्चिक – महत्त्वाचे निर्णय
अत्यंत शांत स्वभाव हे तुमचे वैशिष्टय़. त्यामुळे घरातील महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्याल. त्याचा सर्व कुटुंबास फायदा होईल. संतुलित विचार करा. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. वरिष्ठ कौतुक करतील. मोरपिशी रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – टीशर्ट, हेअरबँडं’

धनु – नवे लिखाण
ठामपणे निर्णय घ्या. तुमचे निर्णय कौशल्य हेच तुमचे या आठवडय़ातील वैशिष्टय़ ठरणार आहे. मानधनातून विशेष आर्थिक लाभ होईल. एखादे नवे लिखाण हाती घ्याल. लेखकांसाठी चांगला कालखंड. आकाशी रंग परिधान करा.
शुभ परिधान – पुष्कराज, शेवंतीची फुले

मकर – चांगले कार्य
आनंददायी प्रवास घडेल. नवे संदर्भ हाती लागतील. इतिहास संशोधकांसाठी चांगला आठवडा. महत्वाकांक्षी व्हाल. हातून चांगले कार्य घडेल. हिरवा रंग जवळ बाळगा. हातून धार्मिक कार्य घडेल. त्यामुळे मनास शांतता लाभेल.
शुभ परिधान – पायमोजे, कानटोपी

कुंभ – मालमत्ता खरेदी
अनपेक्षित प्रवास घडेल. काहीतरी गमावण्याची भीती मनात राहील. नवी मालमत्ता खरेदी कराल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. विश्रांती आवश्यक. अबोली रंग परिधान करा.
शुभ परिधान – सुगंध, टाय

मीन – एकाग्रता महत्त्वाची
आपले काम आणि प्राथमिकता यावर लक्ष केंद्रित करा. दोन्हींत संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. घरात आनंदाचे प्रसंग येतील. तुम्ही त्यामुळे खुश असाल. आईला वेळ द्या. कुटुंबियांसमवेत बाहेर फिरायला जाल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – शेवंतीची फुले, पर्स

आपली प्रतिक्रिया द्या