फॅशन ओ भविष्य – 18 ते 24 जानेवारी 2020

3663

>> मानसी इनामदार

मेष – मने जुळतील
आपल्या जवळच्या माणसांना गृहीत धरू नका. या आठवडय़ात तुमच्या माणसांची साथ खूप मोलाची ठरणार आहे. दुरावलेली मने जवळ येतील. तुम्ही प्रयत्नशील राहा. गुलाबी रंग जवळ ठेवा. देवीची उपासना करा. कामाच्या ठिकाणी यशाच्या पायऱया चढाल.
शुभ परिधान – पारंपरिक कपडे, साडी.

वृषभ – पैसे गुंतवा
व्यावसायिकांना उत्तम आठवडा, पण निरर्थक गोष्टीत, वादात वेळ वाया घालवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. हातातील पैसे गुंतवणुकीत गुंतवा. नव्या माणसांना भेटाल. अनपेक्षित लाभ होईल. पिवळा रंग जवळ ठेवा. घरातील वातावरण चांगले राहील.
शुभ परिधान – तांब्याचे कडे, रेशमी उपरणे.

मिथुन – हसत राहा
मनमुराद हसण्याचा आठवडा आहे, पण जवळच्या नातेसंबंधांना दुखवू नका. रागावर नियंत्रण ठेवा. हाताखालच्या माणसांवर चिडू नका. गोडीत काम काढून घ्या. घरातील माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. राणी रंग जवळ ठेवा. भावबंध दृढ होतील.
शुभ परिधान – डिझायनर नथ, मोठय़ा काठाची साडी.

कर्क – मजेचा आठवडा
जोडीदारासोबत आठवडा मस्त मजेत जाणार आहे. ध्यानधारणेकडे ओढ वाढेल. इष्ट देवतेची आराधना करा. लाल रंग जवळ बाळगा. परदेश प्रवास घडेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा.
शुभ परिधान – मोत्याच्या कुडय़ा, खादी सिल्कचा कुर्ता.

सिंह – कौतुक मिळेल
खेळाडूंसाठी आव्हानात्मक आठवडा. नव्या आव्हानांना तोंड द्याल आणि त्यांना मातही द्याल. घरात काही अडचणी उद्भवतील, पण तुमच्यामुळे त्या सुटतील. त्यामुळे कौतकस्थानी असाल. कर्तेपण अनुभवाल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – स्पोर्टस् शूज, टी-शर्ट.

कन्या – आवडत्या गोष्टी
ध्यानधारणा आणि योग तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मन शांत ठेवा. घरात आनंदाचे प्रसंग येतील. मुलांच्या आनंदात तुमचा आनंद असेल. गृहिणी घरात सगळय़ांच्या आवडीचे पदार्थ बनवतील. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – खडीची शाल, टोप पदरी साडी.

तूळ – नवे हवे
चित्तवृत्ती फुलारून येतील. नव्याचे आगमन खूप फलदायी ठरेल. भरपूर आर्थिक लाभ होईल. मोठा सोहळा साजरा होईल. आवडती व्यक्ती सहवासात येईल. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. गणेशाची उपासना करा. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – काळी पैठणी, चमेलीची फुले.

वृश्चिक – पैसे वाचवा
गृहिणीने घराचे आर्थिक व्यवस्थापन स्वतःच्या नियंत्रणात ठेवावे. त्यामुळे पैशांची बचत होईल. कोणत्याही वचनात अडकू नका. ज्याला शत्रू समजत होतात त्याच्या सद्भावना कळतील. मोठे गैरसमज दूर होतील. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – चांदी, अंगठी.

धनु – फायदा होईल
मेहनत आणि सहनशीलता हे तुमच्यातील मोठे गुण आहेत. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. दूरगामी फायदा होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. घरात खर्च वाढतील, पण त्यातून नुकसान होणार नाही. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – टोपी, डिझायनर चष्मा.

मकर – उभारी मिळेल
मित्रांच्या साथीमुळे तुमच्या मनाला उभारी मिळेल. घरातील सदस्यांसाठी जीव तोडून एखादी गोष्ट कराल. त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान लाभेल. आवडत्या घरात तुमची प्रतिमा उंचावेल. पिवळा रंग फलदायी.
शुभ परिधान – मनगटी घडय़ाळ, गॉगल.

कुंभ – भरीव कार्य
यशाच्या वाटेवर आहात, पण स्वतःची काळजी घ्या. माणसाची योग्य पारख करा. विश्वास फार ठेवू नका. अचानक खर्च उद्भवतील. हितशत्रूंना मात द्याल. हातून भरीव कार्य घडेल. चंदेरी रंग जवळ बाळगा. शिव उपासना करा.
शुभ परिधान – सुती कपडे, काळा दोरा.

मीन – देवाची साथ
स्वप्ने पूर्ण करा. देव सोबत आहे. मेहनतीत कसूर नको. आर्थिक व्यवहार जपून करा. घरात राहावेसे वाटेल. अवश्य राहा. मानसिक समाधान मिळेल. व्यायामाचा आनंद घ्याल, पण विश्रांती महत्त्वाची. वेळेवर झोपा. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – हीरा, सोन्याचे अलंकार.

आपली प्रतिक्रिया द्या