भविष्य- रविवार 10 ते शनिवार 16 फेब्रुवारी 2019

<नीलिमा प्रधान>

मेष-अंदाज खरे ठरतील

मेषेच्या एकादशात बुध राश्यांतर, चंद्र-मंगळ युती होत आहे. मनाची शक्ती व आत्मविश्वास दोन्ही एकत्र आल्याने तुम्ही कठीण काम करून घेऊ शकाल. राजकीय – सामाजिक क्षेत्रातील अंदाज खरा ठरेल. व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायानुसार तुमचे विचार ठेवावे लागतील. व्यवसायात जम बसेल.

शुभ दि. – 11, 13.

वृषभ-मतभेद होतील

वृषभेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, मंगळ – हर्षल युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. सहकारी तुमची दिशाभूल करत नाही ना याकडे लक्ष द्या. वाटाघाटीत तुमच्यावर आरोप येऊ शकतो. व्यवसायात मतभेद होईल.नव्या ओळखीवर विश्वास ठेवू नका.

शुभ दि. – 14, 15.

मिथुन-अहंकार दूर ठेवा

मिथुनेच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या पदाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. अहंकाराच्या भाषेतून बोलू नका. व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल. नोकरीत चौकटीत राहून निर्णय घ्या. क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल.

शुभ दि. – 15, 16.

कर्क-शब्द जपून वापरा

कर्केच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर, मंगळ, हर्षल युती होत आहे. महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे शब्द कुणाच्याही जिव्हारी लागू शकतात. तुमचे मन अस्थिर करण्याचा प्रयत्न चोहोबाजूने होईल. गोड बोलून तुमची फसगत व्यवहारात होऊ शकते.

शुभ दि. – 10, 11.

सिंह-मनाप्रमाणे निर्णय घ्याल

सिंहेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कोणतीच प्रतिक्रिया स्पष्टपणे देणे ठीक नसेल. लोकांचे प्रेम मिळवणे एवढेच ध्येय ठेवा. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. समस्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकेल. तडजोड करावी लागेल.

शुभ दि. – 14, 15.

कन्या-सहनशीलता राखा

कन्येच्या षष्ठस्थानात सूर्य प्रवेश. मंगळ, हर्षल युती होत आहे. मनावर दडपण राहिल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक उग्र रूप धारण करतील. तुमच्या प्रतिष्ठsचा प्रश्न निर्माण होईल. कुटुंबात अचानक मतभेद होतील. व्यवसायात फसगत टाळता येईल. अचानक खर्च वाढेल. प्रवासात सावध रहा.

शुभ दि. 10, 13

तूळ-नवीन संधी लाभतील

तूळ राशीच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. मेहनत घ्या. नम्रता ठेवा. तुमचा मुद्दा प्रेमाने पटवून द्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात संधी समोर दिसेल. थोडा विलंब होईल. वरिष्ठांची मर्जी पाहून मनोगत व्यक्त करा. कुटुंबात तडफदार निर्णय घेण्याची वेळ येईल.  क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल.

शुभ दि. – 15, 16.

वृश्चिक-कुटुंबातील कामे वाढतील

वृश्चिकेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, मंगळ, हर्षल युती होत आहे. कामात अडचणी व अडथळे येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमच्या चुका स्पष्टपणे मांडतील. कुटुंबातील कामे वाढतील. दगदग होईल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. सावध रहा.

शुभ दि. – 13, 14.

धनु-संमिश्र घटना घडतील

धनुच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आठवडय़ाच्या शेवटी महत्त्वाची घटना घडेल. संमिश्र स्वरूपाच्या घटना सर्वत्र घडतील. वेळ, प्रसंगानुरूप निरीक्षण करून निर्णय घ्या. व्यवसायात मेहनत घेतल्यास जम बसवता येईल. स्वतः विचार करा.

शुभ दि. – 15, 16.

मकर-ध्येयाकडे लक्ष द्या

मकरेच्या धनेबात सूर्य राश्यांतर, मंगळ – हर्षल युती होत आहे. तोंडावर गोड बोलून तुमच्या मागे कटकारस्थाने करणारी माणसे सहवासात येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. दुतोंडी माणसांच्या नादी न लागता स्वतःचे ध्येय गाठा. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात पराक्रम गाजवता येईल.

शुभ दि. – 13, 14.

कुंभ-जबाबदारी स्वीकारावी लागेल

स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या विरोधात गेलेले लोक पुन्हा तुमच्याकडे मैत्रीसाठी येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नव्या पद्धतीने डावपेचांची रचना करता येईल. कुटुंबात वाटाघाटीत जबाबदारी स्वीकारावी लागेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचे पाऊल पडेल.

शुभ दि. – 15, 16.

मीन-व्यवसायातील खर्च वाढेल

मीनेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. मानसिक स्थैर्य राहील. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी मार्ग शोधता येईल. व्यवसायात खर्च वाढू शकतो. जवळच्या माणसांवर ठेवलेला विश्वास नव्याने तपासा. नोकरीत वर्चस्व राहील. अविस्मरणीय काम होईल.

शुभ दि. – 11, 12.

आपली प्रतिक्रिया द्या