साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 10 ते शनिवार 16 ऑक्टोबर 2021

>> नीलिमा प्रधान

मेष – निर्णय घेताना विचार करा

चंद्र, गुरू लाभयोग, बुध, हर्षल षडाष्टक योग होत आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना, निर्णय घेताना विचार करा. विरोधक तुमच्या कार्याचे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर आरोप होतील. चर्चा करताना संयम ठेवा. नोकरीत व्याप वाढतील.
शुभ दिनांक – 12, 13

वृषभ – मतभेद होतील

गुरू, शनी लाभयोग, सूर्य गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. जगदंबेची आराधना तुमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करेल. सोमवार, मंगळवार मतभेद होतील. उद्योगधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगाने प्रगती कराल. वेळेला महत्त्व द्या.
शुभ दिनांक – 14, 15

मिथुन – संयम बाळगा

चंद्र, मंगळ केंद्रयोग, चंद्र शनी युती होत आहे. सामाजिक क्षेत्रात वक्तव्य करताना भान ठेवा. राजकीय क्षेत्रात संयम ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. पूर्वी केलेल्या चुकांचा नव्याने समोर येतील. सांभाळून राहा. व्यवसायात जास्त मोह ठेवू नका. अंबामातेच्या प्रार्थनेतून एखादा मार्ग निघेल.
शुभ दिनांक – 12, 13

कर्क – अडचणींवर मात कराल

सूर्य, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, शनी लाभयोग होत आहे. ग्रहांची साथ आहे तेव्हा महत्त्वाची कामे करा. किरकोळ अडचणींवर मात कराल. धंद्यात वाढ होईल. श्रीदेवीच्या कृपेने समस्या सुटतील. वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रतिष्ठा, पैसा लाभेल. प्रश्न मार्गी लागतील.
शुभ दिनांक – 10, 14

सिंह – कायद्याच्या कक्षा ओळखा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. धंद्यात हुशारीचा उपयोग करा. चर्चा सफल होईल. नवीन परिचयात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढत असली तरी विरोधक नजर ठेवून आहेत हे लक्षात असू द्या.
शुभ दिनांक – 12, 16

कन्या – यशदायी कालावधी

श्री जगदंबेच्या कृपेने सर्व ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढणार आहे. मोठे यश संपादन कराल. चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, गुरू त्रिकोणयोग होत आहे. उद्योगधंद्यात कठीण कामे करून घ्या. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. नोकरीत चांगली संधी मिळेल.
शुभ दिनांक – 10, 14

तूळ – दुखापत होण्याचा संभव

बुध, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. चौफेर समस्या येतील. अनेक कामांची गर्दी होईल. कायद्याच्या कक्षा ओळखून निर्णय घ्या. व्यवसायात आरोप होतील. दुखापत होण्याचा संभव आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या आरोप होतील. श्रीअंबेच्या आराधनेने शांतता लाभेल.
शुभ दिनांक – 10, 11

वृश्चिक – प्रत्येक दिवस उत्साहवर्धक

चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, गुरू त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. नविन परिचय फायदेशीर ठरतील. उद्योगधंद्यात वाढ होईल. श्री जगन्मातेच्या कृपेने मनातील इच्छा पूर्ण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल. अविवाहितांना मनाप्रमाणे स्थळ मिळेल.
शुभ दिनांक – 12, 13

धनु – कामाचे कौतुक होईल

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, गुरू त्रिकोणयोग होत आहे. श्री दुर्गामातेच्या कृपेने तुमच्यावरील संकट दूर होईल. एखादे दडपण तुम्हाला अस्वस्थ करेल. धंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. मात्र जुना वाद वाढवण्याचे प्रयत्न होतील. वाटाघाटीचा प्रश्न नकोसा होईल.
शुभ दिनांक – 14, 15

मकर – वाद वाढवू नका

साडेसाती सुरू असली तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात मेहनत घ्या. सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सोमवार, मंगळवार क्षुल्लक वाद वाढवू नका. अचानक कामात बदल करण्याची वेळ येईल. उद्योगधंद्यात सुधारणा करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे यश संपादन करण्याची जिद्द ठेवा.
शुभ दिनांक – 14, 15

कुंभ – प्रसंगावधान राखून वक्तव्य करा

सूर्य, नेपच्युन षडाष्टक योग, मंगळ नेपच्युन षडाष्टक योग होत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. श्री जगन्मातेच्या कृपेने संकट टळू शकेल. उद्योगात तत्परता व हुशारी ठेवा. सामाजिक कार्यात नियमांचे पालन करा. कोणतेही वक्तव्य करताना प्रसंगावधान ठेवा. राजकीय क्षेत्रात तुमच्यावर आरोप होतील.
शुभ दिनांक – 10, 11

मीन – महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

सूर्य, चंद्र लाभयोग, सूर्य, गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. श्री अंबामातेच्या नवरात्रौत्सवात तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. उद्योगधंद्यातील समस्या कमी करून प्रगती साधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर होतील.
शुभ दिनांक – 10, 11

आपली प्रतिक्रिया द्या