आठवड्याचे भविष्य – रविवार 13 सप्टेंबर ते शनिवार 19 सप्टेंबर 2020

>> नीलिमा प्रधान

व्यवसायात अडचणी येतील

मेष : मेषेच्या षष्ठेशात सूर्य, धनेशात राहू, अष्टमेशात केतू राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात मोठे आव्हान स्वीकारावे लागेल. व्यवसायात अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या दृष्टिकोनाची दखल घेतली जाणार नाही. कुटुंबात गैरसमज निर्माण होतील. नोकरीच्या कामात चुका टाळा.                     

शुभ दिनांक : 15, 16

कामांना गती मिळेल

वृषभ : वृषभेच्या पंचमेशात सूर्य, स्वराशीत राहू, सप्तमेशात केतूचे राश्यांतर होत आहे. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत वर्चस्व, बुद्धिमत्ता दिसेल. व्यवसायात मित्रपरिवाराचे सहकार्य घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना वेगाने पुढे नेता येईल. चित्रपट, साहित्यक्षेत्रात कल्पनेला चालना मिळेल.                   

शुभ दिनांक : 13, 14

आरोपांचा सामना करावा लागेल

मिथुन : मिथुनेच्या सुखस्थानात सूर्य, व्यवेशात राहू, षष्ठेशात केतू राश्यांतर होत आहे. क्षुल्लक वाटणारे प्रश्न सोडवताना दमछाक होईल. व्यवसायात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर आरोप होतील. जुन्या अनुभवांचा उपयोग होईल. कलासाहित्यात नवी संधी मिळेल.       

शुभ दिनांक : 13, 14

कल्पकता जपा

कर्क : कर्केच्या पराक्रमात सूर्य, एकादशात राहू, पंचमेशात केतू राश्यांतर होत आहे. अडचणींवर मात करण्याचा मार्ग सुचेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. योजना पूर्ण करा. नोकरीत वरिष्ठांची शाबासकी मिळेल. चित्रपट, कलाक्षेत्रात कल्पनाशक्तीचा वापर करता येईल.

शुभ दिनांक : 14. 18

नोकरीत ठसा उमटेल

सिंह : सिंहेच्या धनेशात सूर्य, सुखस्थानात केतू, दशमेशात राहू राश्यांतर होत आहे. तुमच्या कार्यात वेगाने प्रगती करा. व्यवसायात मोह बाजूला ठेवून निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. व्यावहारिक दृष्टिकोन जपा. नोकरीत कामाचा ठसा उमटेल. कठीण कामे संपवा.  

शुभ दिनांक : 18, 19

कायद्याची कक्षा ओलांडू नका

कन्या : स्वराशीत सूर्य, कन्येच्या पराक्रमात केतू, भाग्यात राहू राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्राला नवी दिशा मिळेल. व्यवसायातील परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कमी झालेले वर्चस्व वाढवण्यासारख्या योजना आखा. कायद्याची कक्षा ओलांडू नका. कलासाहित्य क्षेत्रात उत्साह वाढेल.     

शुभ दिनांक : 13, 14

निर्णय घेताना सावध राहा

तूळ : तुळेच्या व्ययेषात सूर्य, अष्टमेषात राहू, धनेशात केतू राश्यांतर होत आहे. कोणताही निर्णय घेताना सावध रहा. कोणालाही शब्द देताना घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर जबाबदारीचे काम सोपवले जाईल. रागावर ताबा ठेवा. गुरुतुल्य व्यक्तीचा आधार मिळेल. प्रवासात सावध राहा.

शुभ दिनांक : 13, 14

किचकट कामे मार्गी लागतील

वृश्चिक : वृश्चिकेच्या एकादशात सूर्य, सप्तमेशात राहू, स्वराशीत केतू राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील किचकट कामे मार्गी लागतील. परिचयातून मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवाल. विरोधकांना समजून घेण्यात हित आहे. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील.                

शुभ दिनांक : 13, 14

रागावर ताबा ठेवा

धनु : धनूच्या दशमेशात सूर्य, षष्ठेशात राहू, व्ययेषात केतूचे राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला वादाचे प्रसंग येतील. रागावर ताबा ठेवा. व्यवसायात तुमचा गैरफायदा घेतला जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढवता येईल. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. मानसन्मान लाभेल.                     

शुभ दिनांक : 13, 18

प्रसंगाचे गांभीर्य ओळखा

मकर : मकरेच्या भाग्येशात सूर्य, पंचमेशात राहू, एकादशात केतूचे राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रात दिलासा देणारी घटना घडेल. महत्त्वाचा निर्णय घेताना घाई नको. प्रसंगाचे गांभीर्य ओळखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होतील. कुटुंबात तुमचे महत्त्व वाढेल. कायदा पाळा.                    

शुभ  दिनांक : 14,

ताणतणाव निर्माण होतील

कुंभ : कुंभेच्या अष्टमेषात सूर्य, सूर्य सुखस्थानात राहू, दशमेशात केतूचे राश्यांतर होत आहे. साडेसातीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागतेय. न केलेल्या प्रसंगात अडकवण्याचा प्रयत्न होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. कुटुंबात ताणतणाव निर्माण होतील.            

शुभ दिनांक : 13, 16

अधिकारप्राप्ती होईल

‘मीन : मिनेच्या सप्तमेशात सूर्य, पराक्रमात राहू, भाग्येषात केतूचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. अधिकारप्राप्ती होईल. दूरदृष्टिकोनातून पुढे जाण्याची योजना बनवा. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. कलासाहित्यात उत्साह वाढेल.          

शुभ दिनांक : 18, 19   18

आपली प्रतिक्रिया द्या