भविष्य – रविवार 16 ते शनिवार 22 फेब्रुवारी 2020

5912

>> नीलिमा प्रधान

मेष – सकारात्मक काळ
चंद्र-मंगळ युती, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात तणावाचा प्रसंग निर्माण होईल. त्यावर बुद्धिचातुर्याने मातही करू शकाल. नोकरीत वरिष्ठांची मान उंचावेल असे काम तुम्ही कराल. व्यवसायात जम बसेल. तुमचे कौतुक होईल. आत्मविश्वासात भर पडेल. नामवंतांचे मार्गदर्शन लाभेल. शुभ दिनांक – 18, 19

वृषभ – प्रवासात सावध राहा!
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. परिचयाचा फायदा होईल. कर्जाचे काम मार्गी लावता येईल. कुटुंबात सुखाचे क्षण येतील. कोणतेही काम करताना सावध राहा. दुखापत संभवते. प्रवासात घाई करू नका. महत्त्वाची भूमिका निभावाल. शुभ दिनांक – 16, 17

मिथुन – लाभदायी व्यवहार होईल
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य- चंद्र लाभयोग तुमच्या कार्याला दिशादर्शक ठरेल. या आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात चर्चा करताना संयम ठेवा. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. राजकीय क्षेत्रांत वर्चस्व टिकवण्यासाठी धावपळ होईल. फायद्याचा व्यवहार होईल. शुभ दिनांक – 18, 19

कर्क – निर्णयात सावधगिरी बाळगा
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात भावनेला महत्त्व दिल्याने व्यवहारात चूक होऊ शकते. नोकरीच्या कामात कायद्याच्या कक्षेत राहून निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न होईल. कला-नाटय़क्षेत्रात कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल. शुभ दिनांक – 16, 17

सिंह – कामाचे कौतुक होईल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-गुरू युती होत आहे. या आठवडय़ात तुमची धावपळ वाढेल. मानसिक तणाव होईल. व्यवसायात काम वाढेल. चर्चा होईल. नोकरीत वेळेला महत्त्व द्या. वरिष्ठ तुमच्यावर मोठे काम सोपवतील. सामाजिक क्षेत्रांत हितशत्रूंचा त्रास होईल. तुमची कार्यपद्धती मान उंचावणारी ठरेल. शुभ दिनांक –18, 19

कन्या – चौफेर विचार करा
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. तुमचे मन खंबीर राहील. कोणतेही काम करताना चौफेर विचार करा. सहनशीलता ठेवा. व्यवसायात तडजोड करावी लागेल. कामगार समस्या आणतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मत प्रदर्शित करताना उतावळेपणा नको. शुभ दिनांक – 16, 17.

तूळ – कार्याला प्रेरणा मिळेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-गुरू युती म्हणजे प्रत्येक दिवशी तुमच्या प्रत्येक कार्याला प्रेरणा मिळणार आहे. व्यवसाय-नोकरीमध्ये सुधारणा होईल. सुख समोर असले तरी मिळण्यास वेळ लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कोणावरही विश्वास ठेवू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत दणदणीत यश मिळेल. शुभ दिनांक – 17, 18

वृश्चिक – अहंकाराला दूर ठेवा
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू युती होत आहे. सहकारी वर्ग, मित्र यांच्याकडून महत्त्वाचे काम करून घेण्यास सहाय्य करणारी ग्रहस्थिती आहे. व्यवसायातील चर्चा वादाकडे जाऊ शकते. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्थान पक्के कराल. अहंकारी वृत्तीने वागू नका. शुभ दिनांक – 18, 19

धनु – वेळेला महत्त्व द्या
चंद्र-मंगळ युती, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. व्यवसायातील तांत्रिक समस्या सोडवता येईल. क्षुल्लक वाद वाढविण्यात वेळ घालवू नका. नोकरीत पदाधिकार वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे चौफेर कौतुक होईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. शुभ दिनांक – 20, 21

मकर – परदेशी जाण्याची संधी
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. संघर्षातून नवा मार्ग शोधावा लागेल. तळागाळापासून राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्य करा. अनुभवी मित्र, नेते यांचा सल्ला उपयोगी येईल. नोकरीत टिकून राहा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दिनांक – 16, 17

कुंभ – वर्चस्व सिद्ध कराल
चंद्र-शुक्र केंद्रयोग, गुरू-नेपच्यून लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. व्यवसाय-नोकरीत वर्चस्व सिद्ध कराल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वक्तव्य प्रभावी ठरेल. मैत्रीपूर्ण वातावरण राहील. कुटुंबासाठी प्रगतीकारक योजना बनवाल.कला-क्रीडा क्षेत्रांत उत्साह वाढेल. शुभ दिनांक – 16, 17

मीन – तडजोड स्वीकारा!
चंद्र-गुरू युती, मंगळ-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. संघर्षातून यशाचा मार्ग शोधावयाचा आहे. त्यामुळे या आठवडय़ात सहनशीलता ठेवा. अरेरावी करून बोलू नका. व्यवसायात तात्पुरत्या स्वरूपाची तडजोड करा. नोकरीमध्ये दक्ष राहा. वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा प्रयत्न करा. सावध राहा. शुभ दिनांक – 16, 19

आपली प्रतिक्रिया द्या