आठवड्याचे भविष्य – रविवार 2 ते शनिवार 8 डिसेंबर 2018

114

>> नीलिमा प्रधान

मेष – योजनांमध्ये अडथळे येतील
बुध-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र युती होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात ठरविलेली योजना पूर्ण होण्यामध्ये अडचणी येतील. एकमत होण्यास विलंब होऊ शकतो. व्यवसायासाठी घाई करू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. कायद्याचे पालन करा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. शुभ दि. – 4, 5.

वृषभ -कामाचे नियोजन करा
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. रेंगाळत राहिलेले व्यवसायातील काम मार्गी लावता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत पद्धतशीर कामाची मांडणी करा. वेळेला महत्त्व द्या. तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. कुटुंबातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. नाटय़- चित्रपट-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. शुभ दि. – 2. 4

मिथुन- महत्त्वाच्या भेटी होतील
बुध-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र युती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची भेट घेता येईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत चर्चेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात जाऊन चालणार नाही. कामाचा व्याप सांभाळावा लागेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. शुभ दि. – 3, 4.

कर्क – योजनांना गती मिळेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. विरोधकांच्या गुप्त कारवाया तुम्हाला अचूक ओळखता येतील. त्यामुळे डाव कसा टाकावयाचा ते ठरवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वासाने निर्णय घेता येईल. दौऱयात दर्जेदार लोकांचे सहकार्य मिळेल. योजनांना गती मिळेल. यश मिळेल. शुभ दि. – 2, 6.

सिंह – अडचणींवर मात कराल
सूर्य-मंगळ केंद्रयोग, चंद्र-शुक्र युती होत आहे. तुमच्या मानसिक धैर्याचे लोकांना कौतुक वाटेल. अडचणीवर जिद्दीने मात करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रभाव पडेल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो. वाटाघाटीत चिंता वाटेल. नोकरीत कायदा-सुव्यवस्थेचे योग्य पालन करावे लागेल. शुभ दि. 2, 3.

कन्या – शेअर्समध्ये लाभ होईल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. जुने अनुभव व बुद्धिचातुर्य यांचा योग्य मेळ घालून नव्या पद्धतीने डाव रचता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात धोरण ठरवता येईल. व्यवसायात सफलता मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर आल्याने मोठा लाभ मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मोठी असेल. शुभ दि. 4, 5.

तूळ – मानसन्मान लाभतील
चंद्र-बुध युती, सूर्य-मंगळ केंद्रयोग होत आहे. राजकीय – सामाजिक क्षेत्रात चौफेर कार्य करा. लोकसंग्रह वाढवा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत मानसन्मान मिळेल. व्यवसायातील मरगळ दूर होईल. नवा फंडा शोधून मेहनत घेता येईल. नोकरीत बदल करण्याची संधी शोधा. खरेदीचा विचार करता येईल. शुभ दि. 6, 7.

वृश्चिक – डावपेचांकडे लक्ष ठेवा
सूर्य-मंगळ केंद्रयोग, चंद्र-गुरू युती होत आहे. मन दडपणाखाली राहील. जनहितासाठी केलेले काम पूर्णत्वास गेल्याची खात्री करून घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या अपरोक्ष चाललेले डावपेच याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यवसायाला कलाटणी मिळेल. जबाबदारी स्वीकाराल. शुभ दि. 7, 8.

धनु- चुका सुधारता येतील
बुध-हर्षल षडाष्टक योग, चंद्र-शुक्र युती होत आहे. या आठवडय़ात सर्वच कामांना विलंब होण्याची शक्यता जास्त आहे. राजकीय – सामाजिक क्षेत्रांत तुमचे वक्तव्य वादग्रस्त ठरेल. स्वतःच्या हिमतीवर धंदा करा. त्यामुळेच स्वतःच्या होणाऱया चुका सुधारता येतील. पैशांसाठी कोणताही मार्ग स्वीकारणे धोकादायक ठरेल. शुभ दि. 2, 3.

मकर – चौफेर यश लाभेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. या आठवडय़ात यशाची पताका चौफेर फडकवता येईल. वेळ फुकट दवडू नका. नियमितपणे मेहनत घ्या, योजना बनवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व वाढलेच पाहिजे याकडे लक्ष द्या. लोकप्रियता मिळेल. व्यवसायात मोठा करार होईल. खरेदी-विक्रीत, शेअर्समध्ये फायदा होईल. शुभ दि. 2, 3.

कुंभ – चौफेर यश लाभेल
सूर्य-चंद्र लाभयोग, चंद्र-बुध युती होत आहे. या आठवडय़ात यशाची पताका चौफेर फडकवता येईल. वेळ फुकट दवडू नका. नियमितपणे मेहनत घ्या, योजना बनवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व वाढलेच पाहिजे याकडे लक्ष द्या. लोकप्रियता मिळेल. व्यवसायात मोठा करार होईल. खरेदी-विक्रीत, शेअर्समध्ये फायदा होईल. शुभ दि. 2, 3.

मीन – रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य-मंगळ केंद्रयोग, चंद्र-गुरू युती होत आहे. प्रतिष्ठsवर घाला घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जाईल. तुम्ही राग नियंत्रणात ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीची प्रत्येक संधी घ्या. पदाधिकार मिळेल. व्यवसायात मोठे काम मिळेल. नावलौकिक वाढेल. आर्थिक सुधारणा होईल. शुभ दि. 7, 8.

आपली प्रतिक्रिया द्या