साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 2 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020

>> नीलिमा प्रधान

ध्येयावर लक्ष ठेवा

मेष : चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्याला प्रोत्साहन मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा नीट अभ्यास करा. कला साहित्यात प्रगती कराल.                

शुभ दिनांक : 2, 5

जबाबदारी वाढेल

वृषभ : चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी वाढेल. नोकरीत कायदा पाळून निर्णय घ्या. कुटुंबातील वाटाघाटीची चर्चा सफल होईल. कला-साहित्यात प्रगतिकारक घटना घडेल. लोकप्रियता वाढेल.

शुभ दिनांक : 3, 4

शेअर्समध्ये लाभ होईल

मिथुन : चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायातील समस्या सोडवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला दिशा मिळेल. स्वतःचे स्थान मजबूत करा. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत महत्त्वाचे स्थान मिळेल. कला-साहित्यात प्रसिद्धी मिळेल.

शुभ दिनांक : 5, 7

प्रोत्साहन देणारी घटना घडेल

कर्क : चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. अडचणीत आलेले काम पूर्ण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रोत्साहन देणारी घटना घडेल. विरोधकांचा डाव वेळीच ओळखा. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. कठोर शब्द वापरू नका. व्यवसायात किरकोळ तणाव होतील.                      

शुभ दिनांक : 5, 7

निर्णयाची घाई नको

सिंह : चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, मंगळ, गुरू केंद्रयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो निर्णयाची घाई नको. विचारपूर्वक बोलून करार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुमच्यावर टीका करतील. वादाचा प्रसंग निर्माण होईल. प्रवासात घाई नको. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल.

शुभ दिनांक : 5, 6

व्यवसायात वाढ होईल

कन्या : चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाचा प्रश्न सोडवा. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत दिलेली जबाबदारी पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला गती मिळेल. कला-साहित्य क्षेत्रात नवा पर्याय शोधाल.

शुभ दिनांक : 3, 4

कृतिशील राहा

तूळ : चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग रेंगाळत राहिलेल्या कामाला गतिमान करेल. व्यवसायात कायदा पाळून नवा मार्ग निवडा. राजकीय, सामजिक क्षेत्रात स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. कृतिशील राहा तरच तुमचे महत्त्व वाढेल. कला-साहित्याला नवी दिशा मिळेल.                       

शुभ दिनांक : 5, 6

तणाव कमी होईल

वृश्चिक : चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव कमी होईल. विरोध मोडून काढण्याचे तंत्र मिळेल. कुटुंबात जबाबदारी घ्यावी लाभेल. मैत्रीत गैरसमज होतील. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

शुभ दिनांक : 2, 3

रागावर ताबा ठेवा

धनु : बुध, शनी प्रतियुती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील समस्येवर मात करण्याचे मनोबल लाभेल. नोकरीत रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मुद्दय़ांवर टीका होईल. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य लाभेल. कला-साहित्य क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल.                 

शुभ दिनांक : 2, 7

कामाला प्राधान्य द्या

मकर : बुध, शनी प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवड्यात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. नोकरीत वरिष्ठांच्या कामात सहकार्य करावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेचांचा नीट अभ्यास करा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.

शुभ दिनांक : 5, 7

मनस्ताप वाढेल

कुंभ : सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी, व्यवसायात समस्या येतील. काही गोष्टी मनस्ताप देणार्‍या ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण परिस्थितीचे अवलोकन करा. तटस्थपणे राहून अभ्यास करा. गुंतवणुकीची घाई नको.

शुभ दिनांक : 7, 8

मनोबल राखा

मीन : चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तणाव, वाद वाढवणारा काळ आहे. परिचयातून मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत महत्त्वाच्या कामात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना महत्त्व द्या. संधीचा लाभ घ्या. कला-साहित्यात प्रेरणा मिळेल.

शुभ दिनांक : 2, 3

आपली प्रतिक्रिया द्या