आठवड्याचे भविष्य – रविवार 20 सप्टेंबर ते शनिवार 26 सप्टेंबर 2020

>>  नीलिमा प्रधान

मेष

चौफेर लक्ष द्या

मेषेच्या सप्तमेशात बुध राश्यांतर शुक्र-गुरू षडाष्टक योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला वाद निर्माण होतील, गैरसमज वाढतील, धंद्यात खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर लक्ष द्या. विरोधक निशाणा साधतील, सावध रहा. कुटुंबात अनादर केला जाईल. मात्र रागावर ताबा ठेवा.

शुभ दिनांक : 24, 25

 

 

वृषभ

अनाठायी खर्च टाळा

वृषभेच्या षष्ठेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. अडचणींवर मात करून प्रगती साधा. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे करण्याची तयारी ठेवा. नोकरीत कामाचा ताण असला तरी तुमचे महत्त्व वाढेल. कला, साहित्यात संधी मिळेल. तारेवरची कसरत होईल.

शुभ दिनांक : 22, 26

मिथुन

शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायी

मिथुनेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या डावपेचांना महत्त्व येईल. नोकरीत कौतुक होईल. कला, साहित्यात प्रेरणादायक घटना घडेल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रगती होईल.

शुभ दिनांक : 20, 24

 

कर्क

अधिकारप्राप्ती होईल

कर्केच्या सुखेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. मनावरील दडपण कमी होईल. व्यवसायात वाढ होईल. प्रकृती सुधारेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारप्राप्तीचा योग येईल. गुप्त कारवायांना ओळखून नवे डावपेच टाकता येतील. कला, साहित्यात नवे वळण येईल.

शुभ दिनांक : 22, 26

 

सिंह

वादविवाद उद्भवतील

सिंहेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, शुक्र-गुरू षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद निर्माण होणारी स्थिती तयार होईल. विरोधक मैत्री करण्यास येतील. जवळच्या लोकांना कमी लेखू नका. कला, साहित्यात इतरांच्या विचारांना मान द्या.

शुभ दिनांक : 20, 24

 

कन्या

प्रेरणादायक घटना घडतील

कन्या राशीच्या धनेशात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील अर्धवट राहिलेली कामे करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक घटना घडतील. ताणतणाव कमी होतील. वरिष्ठांच्या कामात मदत केल्याने वर्चस्व वाढेल. कोर्टकचेरीच्या कामात दिलासा मिळेल.

शुभ दिनांक : 20, 26

तूळ

अतिशयोक्ती टाळा

स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आत्मविश्वास वाढेल. अतिशयोक्तीपूर्ण वागणे टाळा. तुमच्या कार्यात यश खेचून आणता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न होईल. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवून काम करत रहा.

शुभ दिनांक : 24, 25

 

वृश्चिक

नावीन्यपूर्ण गोष्टी घडतील

वृश्चिकेच्या व्ययेषात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात वर्चस्व वाढेल. व्यवसायातील व्यवहार सावधपणे करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. विरोधकांना नमवता येईल. कुटुंबातील समस्या कमी होतील. कला, साहित्यात नावीन्यपूर्ण गोष्टी घडतील.

शुभ दिनांक : 24, 25

 

धनु

व्यवहारात सावधगिरी बाळगा

धनुच्या एकादशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यावसायातील धोरण बदलावे लागेल. नोकरीत इतरांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद्धतशीर योजना तयार करा. आर्थिक व्यवहारात सावध रहा. मैत्रीत दुरावा निर्माण होईल.

शुभ दिनांक : 25, 26

 

 

मकर

गुंतवणुकीत दक्ष रहा

मकरेच्या दशमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. गुंतवणुकीची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवता येतील. सहकारी वर्गाची मदत होईल. नवीन कार्याची मांडणी करा. आत्मविश्वास वाढेल. गुप्त कारवायांवर मत करता येईल. कला, साहित्याला दिशा मिळेल.

शुभ दिनांक : 20, 22

 

कुंभ

प्रसंगावधान राखा

कुंभेच्या भाग्येशात बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. भावना व कर्तव्य यांचा मेळ घाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांच्या सूचना त्रासदायक ठरतील. आग्रही व आक्रमक प्रतिमा धोकादायक ठरेल. कुटुंबात जबाबदारी वाढेल. कला, साहित्यात गैरसमज वाढेल.

शुभ दिनांक : 23, 24

 

मीन

व्यवसायात प्रगती होईल

मीनेच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे योग्य ठरतील. तुमच्या कार्याचा ठसा उमटेल. कोर्टकचेरीच्या कामात सुधारणा होईल. कलासाहित्यात मान व प्रतिष्ठा मिळेल.

शुभ दिनांक : 21,22

आपली प्रतिक्रिया द्या