भविष्य

411

मानसी इनामदार,(ज्योतिषतज्ञ),[email protected]

गुलाबी थंडीचे दिवस

समस्या

घरात भावाभावांत सतत वाद, भांडणे होत असतील, अशांतता असेल तर

तोडगा

रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाईल. संध्याकाळी देवासमोर बसून रामरक्षा म्हणावी.

 मेष ः सहलीला चला

आप्तस्वकीयांवर अती खर्च कराल, पण त्यावर नियंत्रण ठेवा. स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कणखर बनवा. त्यासाठी योगासने करा. थंडीचे रम्य दिवस आहेत. त्यामुळे या आठवडय़ात सहलीचे आयोजन कराल. घराच्या डागडुजीकडे लक्ष द्या. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…गरम पेय, सूप, डाळीचे कढण.

वृषभ ः खुशियों की बरसात

दूरच्या नातेवाईकाकडून आलेली छोटीशी बातमी आनंदाची बरसात करेल. जीवन आनंदाने जगायला शिका. छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधा. तेच आनंद पुढे मोठे होणार आहेत. गरजेच्या वस्तूंची खरेदी होईल. मनाप्रमाणे घटना घडतील. गुलाबी रंग जवळ ठेवा. शुभ आहार…फालुदा, गुलाबाचे दूध.

मिथुन ः आदर वाढेल

सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. त्यामुळे तुमची पतप्रतिष्ठा वाढेल. तसेच मानसन्मानही वाढेल. परिचयातील व्यक्तीला त्याचे प्रेम परत मिळवून द्याल. त्यामुळे लोकांचा तुमच्या विषयीचा आदर द्विगुणीत होईल. या आठवडय़ात स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या. हिरवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…चवळी, पालक.

कर्क ः विनोदबुद्धीतून मार्ग

तुमची विनोदबुद्धी हा तुमचा सर्वात मोठा गुणविशेष आहे. त्याचा उपयोग तुमच्या कामाच्या ठिकाणी होईल आणि तुमच्या वरिष्ठांचे अडलेले काम साधून द्याल. त्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. यातून आगामी येणाऱया समस्याही सहज मागे पडतील. पिवळा रंग जवळ बाळगा.शुभ आहार…तुरीच्या डाळीची आमटी, कोशिंबीर.

सिंह ः प्रेमाचा आस्वाद

जोडीदार तुमच्यावर प्रेमाची उधळण करणार आहे. त्यामुळे कशाचीही चिंता करू नका. आनंदात रहा. प्रेमाचा आस्वाद घ्या. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. अनेक भेटवस्तू मिळतील. त्यामुळे कुटुंबात स्थान आणि महत्त्व वाढेल. राखाडी रंग जवळ ठेवा. शुभ आहार…ताजा मत्स्याहार.

कन्या ः प्रियजनांसमवेत आनंद

दीर्घकाळ प्रलंबित असलेली थकबाकी तुम्हाला परत मिळेल. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. तुमची ऊर्जा पातळी खूपच उच्च असल्याने घरातील कामे चुटकीसरशी संपवाल. त्यामुळे तुमचे खूप कौतुक होईल. तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. मेंदीचा हिरवा रंग शुभ ठरेल. शुभ आहार…वांगे, पिष्ठमय भाज्या.

तूळ ः सकारात्मकता वाढेल

मुलांच्या यशस्वी होण्याचा अभिमान वाटेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व्याधींपासून सुटका होईल. त्यामुळे मन शांत होईल. स्वतःकडे सकारात्मकतेने पाहाल. जोडीदाराला त्याचा व्यक्तिगत वेळ द्या. त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुधारण्यास मदतच होईल. केशरी रंग महत्त्वाचा. शुभ आहार…मसाला दूध, दुधी हलवा.

वृश्चिक ः स्वकीयांची साथ

तुमचा योग्य दृष्टिकोन कोणत्याही नकारात्मकतेवर मात करतो. त्यामुळे प्रकृतीची काळजी करणे सोडा. आपल्या माणसांत रहा. कुटुंबीयांशी कठोरपणे वागू नका. त्यांची साथ मोलाची असते. आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. निळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…पनीर, दुधाचे पदार्थ.

धनु…खाऊ खुशाल

अत्यंत प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. जोडीदाराशी वादविवाद टाळा. आर्थिक प्रश्नांवर रचनात्मक विचार कराल. त्यामुळे फायद्यात राहाल. या आठवडय़ात मित्रमैत्रिणींबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्याल. थंडीचा आनंद घ्या. कोणताही चमकदार रंग जवळ बाळगा. शुभ आहार…गुलाबजाम, खव्याचे पदार्थ.

मकर ः कीर्ती दिगंत

सुखकारक आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे मन भूतकाळात रमेल. देवीची उपासना करा. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा. गरम कपडे परिधान करा. कामाच्या ठिकाणी तुमची कीर्ती अत्तरागत पसरेल. आमरशी रंग जवळ बाळगा. मनाप्रमाणे घडेल. शुभ आहार…ऋतूनुसार फळे.

कुंभ ः मदत मिळेल

ग्रहमान अनुकूल आहे. विशेषता प्रेमासाठी. जोडीदारासमवेत काळ घालवाल. गुलाबी थंडीचा आस्वाद घ्या. प्रेमाला बहर येईल. कौटुंबिक सौख्य अनुभवाल. कामाचे नियोजन करा. चांगल्या व्यक्तीकडून मदत मिळेल. काळा रंग जवळ ठेवा. शुभ आहार…सुका मत्स्याहार, भाकरी.

मीन…चांगले घडेल

कामाचा तणाव असेल, पण तो जाणवणार नाही. संतुलित आहार ठेवा. त्यामुळे मनाप्रमाणे घडेल. घरातील लहानांसाठी खरेदी कराल. आर्थिक हिशेब नीट करा. हातातील गंगाजळी उगाच खर्च करू नका. विचार सकारात्मक ठेवा. सगळे चांगले घडेल. चिंतामणी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…दही, ताक.

आपली प्रतिक्रिया द्या