साप्ताहिक राशिभविष्य – 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2020

4868

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
कुटुंबाची साथ
तुमची कर्तबगारी आणि व्यावहारिकता या आठवडय़ात उजळून निघणार आहे. स्तुतीपाठकांवर विश्वास ठेवू नका. कुटुंबीयांची साथ मोलाची.
शुभ अलंकार – पोवळे, अंगठी

वृषभ
देवी उपासना
नव्या ओळखी होतील. आदिमायेची उपासना करा. निसर्गसान्निध्य लाभेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. नव्या उद्योगात पैसे गुंतवा.
शुभ अलंकार – हिरा, जोडवी.

मिथुन
प्रगती होईल
तरल बुद्धी, खेळकर स्वभाव हे तुमचे वैशिष्टय़. मोठय़ांचा आशीर्वाद मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मनापासून मेहनत करा.
शुभ अलंकार – पाचू, रुद्राक्ष

कर्क
महत्त्वाची कामे
सोम, मंगळ, गुरु या वारी महत्त्वाची कामं करून घ्या. सत्पात्री दान करा. धनप्राप्ती होईल.
शुभ अलंकार – मोती, सोनसाखळी

सिंह
नवी खरेदी
विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी वाटेल. मेहनतीत कसूर नको. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी होईल. पैसे जपून वापरा. व्यसनांना लांब ठेवा.
शुभ अलंकार – पुष्कराज, ब्रेसलेट

कन्या
संयम ठेवा
मन अस्वस्थ होईल. शिवकवच स्तोत्र वाचा. अचानक अडचणीचे निवारण होईल. संयम महत्त्वाचा. देवी कवच वाचा.
शुभ अलंकार – पाचू, चांदीचा दागिना

तूळ
आनंदाचे दिवस
नातेवाईक घरी येतील. आनंदाचे दिवस सुरू होतील. आता चिंता सोडा. चांगलेचुंगले पदार्थ खाल, खायला घालाल.
शुभ अलंकार – हिरा, मंगळसूत्र

वृश्चिक
नवी जबाबदारी
रामरक्षा स्तोत्र म्हणा. मानसिक शांतता मिळेल. गृहसौख्य लाभेल. नवी जबाबदारी वाढेल. कामातून आनंद मिळेल.
शुभ अलंकार – पोवळे, पाटली

धनु
सहलीचा योग
मोठय़ांचा आशीर्वाद लाभेल. सहलीचा योग आहे, पण काम पूर्ण करून फिरायला जा. अविवाहितांसाठी चांगली स्थळे येतील.
शुभ अलंकार – पुष्कराज, कर्णभूषणे

मकर
वाहन खरेदी
श्रीकृष्णाचे स्मरण करा. आज महत्त्वाचे काम उरकून घ्या. सरकारी नोकरी मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे.
शुभ अलंकार – नीलम, कडे

कुंभ
निर्णय घ्या
घरातील ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
शुभ अलंकार – हिरा, ब्रोच

मीन
सकारात्मक दिवस
पाण्यातले खेळ – पोहणे आत्मसात कराल. दिवस सकाळी लवकर सुरू करा. सूर्यस्नान करा. सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
शुभ अलंकार – पुष्कराज, नथ

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या