साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 ऑक्टोबर ते शनिवार 28 ऑक्टोबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रगतीचा काळ

शुक्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही प्रभावी ठराल. नोकरीधंद्यात वाढ, खरेदी, विक्रीत लाभ होईल. दिग्गजांचा परिचय उत्साहवर्धक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक डावपेच ठरवता येतील. चुका सुधारता येतील. मानसन्मान वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. आनंदी रहाल. शुभ दिनांक : 23, 24

वृषभ – प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र प्रतियुती, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. प्रयत्नपूर्वक यश मिळवावे लागेल. अतिरेक करू नका. धंद्यात, नोकरीत सहनशील रहा. मैत्रीच्या नात्याने वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. कौटुंबिक जबाबदारी पाळा. वक्तव्य करताना कायदा पाळा. प्रवासात सावध रहा. शुभ दिनांक: 23, 24

मिथुन – योजनांना गती मिळेल 

शुक्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. कोणतेही काम करताना काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरी, धंद्यात लाभ होईल. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. गैरसमज दूर करा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. शुभ दिनांक: 24, 25

कर्क – संयम बाळगा

चंद्र, शुक्र लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. दसऱ्याच्या दिवशी रागावर, बोलण्यावर ताबा ठेवा. संयम बाळगा. नोकरीत, धंद्यात तडजोड स्वीकारावी लागेल. उर्मटपणा अंगाशी येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचय होतील. डावपेच उघड करण्याची घाई नको. कुटुंबात क्षुल्लक नाराजी होईल. शुभ दिनांक: 22, 26

सिंह – कामाचा व्याप वाढेल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. चुकीचा निर्णय घेऊ नका.  नवी संधी मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात वाढ होईल. दगदग, धावपळ होईल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गजांचा परिचय होईल. शुभ दिनांक: 24, 25

कन्या – महत्त्वाची कामे करा

चंद्र, बुध त्रिकोणयोग, मंगळ, गुरू प्रतियुती. राग वाढवणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करा. पैशांची काळजी घ्या. धंद्यात चातुर्याने बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मैत्रीचे संबंध वाढतील. उत्साहाच्या भरात टीका करू नका. महत्त्वाची कामे करा. दसऱ्याच्या दिवशी गुप्त कारवायांवर नजर ठेवा. शुभ दिनांक : 22, 23

तूळ – प्रेरणादायक घटना घडेल

बुध, शनि त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. दिशादर्शक संधी मिळेल. प्रेरणादायक घटना घडेल. नोकरीत क्षुल्लक तणाव, चिंता राहील. धंद्यात नम्र रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक इतरांना सहन होणार नाही. अधिकार लाभेल. स्पर्धेत पुढे रहा. कौटुंबिक वातावरण सुखद ठेवा. शुभ दिनांक : 24, 25

वृश्चिक – अहंकार दूर ठेवा

चंद्र, बुध केंद्रयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. कठोर वक्तव्य त्रासदायक ठरेल. अहंकारयुक्त वागणे घातक ठरेल. नोकरी टिकवा. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. धंद्यात कराराची घाई नको. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या चुका उघड होतील. संसारात राग आवरा. शुभ दिनांक : 22, 23

धनु – वर्चस्व वाढेल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. प्रत्येक दिवस प्रेरणादायक ठरेल. कठीण कामे करून घ्या. चर्चेत  यश मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. अधिकार लाभतील. वरिष्ठ कौतुक करतील. खरेदी-विक्रीत लाभ होईल. शुभ दिनांक : 23, 24

मकर – योग्य निर्णय घ्या

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, मंगळ, गुरू प्रतियुती. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नवीन परिचयावर भाळू नका. धंद्यात नुकसान टाळा. भावनेच्या आहारी न जाता योग्य निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनिक दबाव आणला जाईल. आर्थिक व्यवहारात सावध रहा. कौटुंबिक खर्च वाढेल. शुभ दिनांक : 24, 25

कुंभ – क्षुल्लक तणाव होईल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक तणाव होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय प्रेरणादायक ठरेल. कठीण कामे करून घ्या. प्रतिष्ठा, मान वाढेल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दिनांक : 25, 26

मीन – मौल्यवान वस्तू जपा

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. दसऱ्याच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई नको. कायदा पाळा. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात नुकसान टाळा. मौल्यवान वस्तू, माणसे जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण ठेवा. मनाविरुद्ध घटना घडतील. कोणताही वाद वाढवू नका. शुभ दिनांक: 22,23