साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 24 सप्टेंबर ते शनिवार 30 सप्टेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष :- कामात चूक टाळा
सूर्य, शनि षडाष्टक योग, बुध, गुरू त्रिकोणयोग. भावना, कर्तव्य, कायदा यांचा योग्य प्रकारे विचार करून तुमच्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे. गुप्त कारवाया वाढतील. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे पार पाडावी लागतील. दूरदृष्टिकोन ठेवा.
शुभ दिनांक : 24, 27

वृषभ :- किचकट कामे करा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. चंद्र, शुक्र प्रतियुती. किचकट, महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. नोकरीधंद्यात सुधारणा, लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करा. दिग्गज व्यक्तींकडून नव्या गोष्टी शिकायला मिळतील.

शुभ दिनांक: 26, 27

मिथुन :- अहंकार नको
बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. कोणतीही कठीण समस्या वेळेत निस्तरणेच शहाणपणाचे असते. नोकरीधंद्यात थकबाकी मिळवा. अहंकाराचा दर्प येऊ देऊ नका. तुमचे वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क वाढवा. योजनांचा पाठपुरावा करा. दिग्गजांचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक : 27, 29

कर्क :- परदेशी जाण्याची संधी
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग… चंद्र, बुध प्रतियुती तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठरेल. नोकरीत बढती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात वाढ होईल. योग्य भागीदार निवडता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे स्थान भरभक्कम करून ठेवा. मानसन्मान मिळेल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.
शुभ दिनांक : 25, 29

सिंह :- मैत्रीत नाराजी होईल
बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, बुध युती. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. मैत्रीत नाराजी होईल. नोकरीत सौम्य धोरण यश देईल. धंद्यात मोह नको. चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व जाणवेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. भावनेच्या आहारी जाऊ नका. प्रकृती सांभाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.
शुभ दिनांक : 27, 28

कन्या :- संयम बाळगा
सूर्य, शनि षडाष्टक योग. चंद्र, शुक्र प्रतियुती. दुसऱयाला मोठेपणा देण्यात कमीपणा नसतो हे लक्षात ठेवा. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत नम्रपणे बोला. पैसा जपा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारांना चालना देणारी घटना घडेल. जुने स्नेही भेटल्याने उत्साह वाढेल. मान, प्रतिष्ठा वाढेल. संयम सोडू नका.
शुभ दिनांक: 26, 29

तूळ :- दुखापत टाळा
बुध, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. नम्र, शांत राहिल्यास प्रश्न सुटेल. दुखापत टाळा. नोकरीत जबाबदारी वाढेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संताप वाढवण्याचा प्रयत्न होईल. प्रतिष्ठेवर टीका होईल. अहंकाराने न वागता मैत्रीच्या नात्याने वागा. कला, साहित्य क्षेत्रात रमाल.
शुभ दिनांक : 24, 27

वृश्चिक :- प्रश्न मार्गी लागतील
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात नवा परिचय लाभदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या धोरणाची प्रशंसा होईल. अनेक दिग्गजांचा सहवास, मैत्री यामुळे संबंध दृढ होतील.
शुभ दिनांक : 24, 29

धनु :- गैरसमज उद्भवतील
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध युती. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नात्यात, मैत्रीत गैरसमजद्भवतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत मान मिळेल. धंद्यात आळस नको. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना कमी लेखू नका. प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे होतील.
शुभ दिनांक : 26, 27

मकर :- तारतम्य ठेवा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. भावनाविवश होऊ नका. शब्द जपून वापरा. मैत्री टिकवून ठेवता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. चर्चा करताना तारतम्य ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रत्येक दिवस प्रेरणादायक ठरेल. किचकट कामे होतील. जनसंपर्क वाढवा. नवा इतिहास तयार करा.
शुभ दिनांक : 26, 29

कुंभ :- दगदग होईल
सूर्य, शनि षडाष्टक योग, बुध, गुरू त्रिकोणयोग. भावनेच्या आहारी न जाता काम करा. शारीरिक, मानसिक दगदग होईल. धंद्यात सावध रहा. नोकरीत कर्तव्य पाळा. कामात चूक नको. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयमाने बोला. प्रतिष्ठा जपा. संसारात खर्च होईल.
शुभ दिनांक : 28, 29

मीन :- रागावर ताबा ठेवा
चंद्र, शुक्र प्रतियुती, चुद्र, गुरू लाभयोग. कुठेही अतिरेक करू नका. रागावर ताबा ठेवा. प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतील असे वक्तव्य टाळा. धंद्यात नम्र बोला. नोकरीत वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीकारक विचार होईल. योजनांना गती द्या.
शुभ दिनांक : 24, 29