आठवड्याचे भविष्य – रविवार 27 सप्टेंबर ते शनिवार 3 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान  

मेष

कायद्याचे पालन करा

मेषेच्या पंचमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय होतील. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. कोणतेही क्षेत्र असले तरी अहंकार दूर सारूनच व्यवहार करा.

शुभ दिनांक : 27, 28

वृषभ

वाद वाढवू नका

वृषभेच्या सुखस्थानात शुक्र राश्यांतर, चंद्र- मंगळ युती होत आहे. तुमचे मुद्दे मांडताना संयम बाळगा. व्यवसायातील वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. शेअर्समधील अंदाज बरोबर येतील. कलाक्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल कराल.

शुभ दिनांक : 28, 29

मिथुन

उत्साहवर्धक घटना घडतील

मिथुनच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही काम लवकर पूर्ण करा. लोकांच्या समस्या समजून घ्या. नोकरीत वरिष्ठांचा सल्ला ऐका. कला, साहित्यात उत्साहवर्धक घटना घडेल. महत्त्वाची कामे करा.

शुभ दिनांक : 29, 30

कर्क

नवीन परिचयाचा उपयोग होईल

कर्केच्या धनेशात शुक्र राश्यांतर, शुक्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात नवीन परिचयाचा उपयोग होईल. नोकरीतील कामे होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज दूर करून समस्या सोडवता येतील. संसारातील तणाव कमी होतील. कला, साहित्यात प्रेरणा देणाऱया घटना घडतील.

शुभ दिनांक : 27, 1

सिंह

संयम बाळगा

स्वराशीत शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तुम्ही न केलेल्या चुकांचा आरोप होईल. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना उत्तर देता येईल. अनुकूल निर्णय घ्याल. मुलांची प्रगती उत्साहवर्धक ठरेल. कला, साहित्यात प्रभाव वाढेल.          

शुभ दिनांक : 28, 29

कन्या

नमते धोरण ठेवा

कन्येच्या व्ययेशात शुक्र राश्यांतर, चंद्र- बुध त्रिकोणयोग होत आहे. प्रवासात घाई करू नका. व्यवसायात नमते धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळचे लोक अडचणी निर्माण करतील. कोणतेही विधान जपून करा. इतरांच्या प्रभावाखाली राहिल्यास वाद वाढतील. कुटुंबात मतभेद होतील.

शुभ दिनांक : 27, 1

तूळ

राग नियंत्रणात ठेवा

तुळेच्या एकादशात शुक्र राश्यांतर, सूर्य- चंद्र षडाष्टक योग होत आहे. कामात चूक होणार नाही याकडे लक्ष द्या. थोरामोठय़ांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा आढावा घेऊनच बोला. राग वाढवणारी घटना घडेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 28, 29

वृश्चिक

विरोधकांचा सामना करावा लागेल

वृश्चिकेच्या दशमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. मानसन्मान वाढवणारी घटना घडेल. व्यवसायात चर्चा करताना तुमचा मुद्दा योग्य शब्दांत पटवून द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांचा सामना कुशलतेने करा. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. निर्णय सावधतेने घ्या.

शुभ दिनांक : 27, 1

धनु

कामे मार्गी लागतील

धनुच्या भाग्येशात शुक्र राश्यांतर, चंद्र- बुध त्रिकोणयोग होत आहे. प्रगती होईल. कठीण कामे मार्गी लागतील. व्यवसायात मनाप्रमाणे सुधारणा कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या शब्दांना मान मिळेल. लोकप्रियता वाढेल. आनंदी वातावरणाने प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभ दिनांक : 28, 29

मकर

भावनांची अतिशयोक्ती नको

मकरेच्या अष्टमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. भावनांची अतिशयोक्ती होऊ देऊ नका. व्यवसायात मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे ध्येय ठरवा. चांगल्या प्रगतीची संधी तुम्हाला लवकरच मिळेल. व्यसनात अडकू नका.

शुभ दिनांक : 27, 28

कुंभ

व्यवसायातील समस्या सोडवा

कुंभेच्या सप्तमेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग  होत आहे. व्यवसायातील समस्या सोडवण्याचा मार्ग लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समोरच्या व्यक्तीला पारखून घ्या. त्यामुळे अंदाज चुकणार नाहीत. गुप्त कारवायांचा योग्य समाचार घ्या. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील.

शुभ दिनांक : 30, 2

मीन

व्यक्त होण्याची घाई नको

मीनेच्या षष्ठेशात शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. न पटलेले विचार व्यक्त करण्याची घाई नको. व्यवसायात क्षुल्लक अडचणींना जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. नवीन परिचयाने उत्साह वाढेल.

शुभ दिनांक : 2, 3

आपली प्रतिक्रिया द्या