साप्ताहिक राशिभविष्य

>>मानसी इनामदार

मेष – झटपट पैसे
स्नेहमेळावे आणि रम्य सहलींचा आस्वाद घ्याल. झटपट पैसे कमवाल. घरात छान वातावरण निर्माण कराल, पण कामाच्या ठिकाणी उगाच गप्पाटप्पा आणि अफवा यांच्यापासून दूर रहा. सात्त्विक आहार घ्या. पांढरा रंग जवळ बाळगा. विशुद्धतेचा अनुभव येईल.
शुभ परिधान – शिंपल्याचे आभूषण, पांढरा पोशाख

वृषभ – आनंददायी सहवास
यावेळचा आठवडा तुमच्यासाठी अमर्याद आनंद आणि उत्साह घेऊन येईल. विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी, पण त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. मोकळ्या हवेत फिरायला जावे. मित्रमैत्रिणींचा सहवास आनंददायी ठरेल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – आवडता सुगंध, सैल वस्त्र

मिथुन – हमखास यश
एखाद्या ध्येयाने झपाटले जाल. त्यावर झपाटल्यागत काम कराल, पण तब्येतीची हेळसांड नको. खेळाडूंनी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करावे. यश हमखास मिळेल. नव्याने अर्थप्राप्ती होईल. लाल रंग जवळ बाळगा. आईसाठी वेळ राखून ठेवा.
शुभ परिधान – भरजरी वस्त्र, अष्टगंधाचा तिलक

कर्क – मेहनत सफल
तुमची द्विधा मनस्थिती, कामाचा अतिरिक्त ताण या साऱयासाठी हा शेवटचा आठवडा असेल. तणावमुक्त वातावरणाचा अनुभव घ्याल. यामध्ये तुमचे कुटुंबीय तुमच्यासोबत असतील. खूप दिवसांपासूनच्या मेहनतीचा आर्थिक लाभ होईल. गडद निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – आधुनिक पोशाख, शेवंतीचा गजरा

सिंह – मेहनत सफल
तुमची द्विधा मनस्थिती, कामाचा अतिरिक्त ताण या साऱयासाठी हा शेवटचा आठवडा असेल. तणावमुक्त वातावरणाचा अनुभव घ्याल. यामध्ये तुमचे कुटुंबीय तुमच्यासोबत असतील. खूप दिवसांपासूनच्या मेहनतीचा आर्थिक लाभ होईल. गडद निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – आधुनिक पोशाख, शेवंतीचा गजरा

कन्या – आनंद द्विगुणीत
तुमच्या चाणाक्षपणामुळे संभाव्य धोके सहज परतवाल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मुले तुमच्या अपेक्षांवर उतरल्यामुळे समाधान वाटेल. घरातील लहानांना वेळ द्या. ते तुमचा आनंद आणि मनस्थिती द्विगुणीत करतील. केशरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – केशरी गंध, महिलांनी साडी

तूळ – गुंतवणुकीचे फळ
तुमच्या कामाची वेळ सुटसुटीत करून घ्या, यामुळे तुम्हाला घरी कुटुंबीयांसाठी वेळ देता येईल. विशेषतः तुमच्या मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. दूरगामी गुंतवणूक करा. विनाकारण दडपण घेऊ नका. काळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मोत्याची अंगठी, खादीचा कुर्ता

वृश्चिक – नियोजनातून लाभ
तुमच्या कामाची आणि बुद्धिमत्तेची स्तुती होईल, पण हुरळून जाऊ नका. कामावर लक्ष केंद्रित करा. नियोजनबद्ध गुंतवणुकीतून अपेक्षित आर्थिक लाभ होतील. कुटुंबीयांचे पैसे देऊन टाका. अनपेक्षित भेटीगाठी होतील. तपकिरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सोन्याचे आभूषण, गॉगल

धनू – भरपूर खा
लक्षात नसलेल्या गुंतवणुकीतून घसघशीत आर्थिक लाभ होईल. महिलांनी कामाच्या ठिकाणी इतर गोष्टीत लक्ष घालू नये. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आवडते खाद्यपदार्थ मिळतील. त्यामुळे मनोमन खुश असाल. शरीरास व्यायामाची सवय लावा. हिरवा रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – सनक्रीन लोशन, सुती कपडे

मकर – बढतीचे योग
निर्णय विचारपूर्वक घ्या. सरकारी नोकरीतील परीक्षा आवर्जून द्या. बढतीचे योग येतील. स्वतःच्या आरामासाठी आवर्जून वेळ काढा. मैत्रीत दिलदारपणा अनुभवाल. त्यामुळे मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – जॅकेट, रेशमी वस्त्र

कुंभ – सुखवर्षावात दंग
नातेवाईक, आप्तस्वकीय यांच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल. तुमच्या विनोदी स्वभावामुळे वरिष्ठांचे मन जिंकाल. हजरजबाबीपणाचा फायदा होईल. पत्नीसमवेत सुखवर्षावात दंग राहाल, पण कामाकडे दुर्लक्ष नको. मरून रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान -मखमली वस्त्र, चंदनाची पेटी

मीन – आत्मविश्वास, सकारात्मकता
चांगल्या लोकांच्या संपर्कात याल. त्यामुळे मनात आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण होईल. प्रगतीच्या दिशेने पावले पडतील. आर्थिक बचत करणे महत्त्वाचे. विनाकारण खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळा. नारिंगी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – हिरा, घडय़ाळ

समस्या – एक वर्ष नोकरी शोधतेय पण हवी तशी मिळत नाहीय. सध्या घरीच आहे, पण घरातही आर्थिक अडचण आहे.
– दीप्ती पाटील
तोडगा – दर शुक्रवारी देवीला पूजेत धणे गुळाचा नैवेद्य दाखवा आणि मुलाखतीला जाण्यापूर्वी आठवणीने दही भात खा.

आपली प्रतिक्रिया द्या