आठवड्याचे भविष्य

मानसी इनामदार, ज्योतिषतज्ज्ञ

नातेवाईकांची वर्दळ

मेष : सुखद आणि अनोखा आठवडा. फक्त इतरांची निंदा करणे टाळा. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे फायद्याचे. घरी नातेवाईकांची वर्दळ वाढेल. मनास समाधान मिळेल. पण गृहिणीवर कामाचा ताण पडेल. नव्या लोकांशी संपर्क वाढेल. भगवा रंग जवळ बाळगा.

शुभ परिधान – अबोलीचा गजरा, भगवे उपरणे

उत्साह, व्याप्ती

वृषभ : महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचारांती घ्या. कोणत्याही बाबतीत उताविळपणा नको. मित्रमैत्रीणींसोबत आठवडा मजेत जाईल. नवा प्रकल्प हाती घ्याल. त्यामुळे कामाचा उत्साह आणि व्याप्ती वाढेल. बोलून प्रश्न सोडवा. पिवळा रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानभारतीय पोशाख, खरे दागिने

जबाबदारी, प्रवास

मिथुन : तुमच्या आकर्षक आणि मोहक व्यक्तिमत्त्वाचा कामाच्या ठिकाणी प्रभाव पडेल. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवी जबाबदारी सोपविली जाईल. कामानिमित्त प्रवास घडेल, तो आनंददायी असेल. दागदागिन्यांची खरेदी होईल. तपकिरी रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानकाठपदराची साडी, ब्रेसलेट

साथ महत्त्वाची

कर्क : जोडीदाराचे आणि तुमचे अनेक बाबतीत दुमत होईल. पण एकमेकांची साथ सोडू नका. साथीनेच दोघांचाही फायदा होणार आहे. नव्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कर्ज मिळेल. यात भरभराट होईल. हातातील कामावर मेहनत घ्या. निळा रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानसॅटीनचे वस्त्र, चांदीची अंगठी

हाती पैसे

सिंह : मानसिक स्पष्टता टिकवण्यासाठी संभ्रम आणि नैराश्यापासून दूर राहा. रखडलेली देणी परत मिळतील. त्यामुळे अनपेक्षित हातात पैसे खेळतील. घरी छोटेसे हवन कराल. त्यामुळे सकारात्मकता वाढेल. आकाशी रंग जवळ बाळगा.

शुभ परिधान काळा स्कार्फ,गॉगल

जीवनमान उंचावेल

कन्या : खर्च वाढतील तसेच उत्पन्नही वाढेल. रखडलेले काम मार्गी लागेल. आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. इष्ट देवतेची उपासना करा. देवीला शेवंतीचे फूल वाहा. सरकारी नोकरीतील आर्थिक फायदे मिळतील. त्यामुळे जीवनमानात सुधारणा होईल. लाल रंग जवळ बाळगा.

शुभ परिधान कुर्ता, कोल्हापुरी चप्पल.

आर्थिक फायदा

तूळ : तणावाकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहा. नव्या संकल्पनांतून आर्थिक फायदा संभवतो. पण अनावश्यक खर्च करू नका. रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू नका. घरात आनंदाचे वातावरण राहील.  मोरपिशी रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानशेवंतीची वेणी, पायात पैंजण

आनंदी वृत्त

वृश्चिक : आपल्या कामाबाबत, बोलण्याबाबत अत्यंत स्पष्टता ठेवा. जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाहीत. अत्यंत आशादायी वातावरण तयार होईल. पोस्टाने आलेले पत्र आनंददायी बातमी घेऊन येईल. मातीचा रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानरुद्राक्ष, केसांची रिबन

सजग… सावध

धनु : घरात सुखसमृद्धी व शांतता नांदेल. जोडीदारासोबत योग्य तो ताळमेळ साधा. सतत सावधानता बाळगा. समाजातील आपली प्रतिमा जपा. इतरांच्या कामात जराही पडू नका. स्वतःपुरता व्यवहार पहा. काळा रंग जवळ बाळगा.

शुभ परिधानटी शर्ट, सुरंगीची फुले

वैचारिक मदत

मकर : महत्त्वाच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळेल. कामामुळे मानसिक ताण येऊ शकतो. रामरक्षा म्हणा. घरातील व्यक्तींना वैचारिक मदत करा. त्यामुळे बरेच प्रश्न सोडवले जातील. त्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. किमती लेखणी खरेदी कराल. निळा रंग महत्त्वाचा.

शुभ परिधानअत्तर, लेखणी

गुलाबी हवा

कुंभ :तुमच्या आशेचा पतंग पुन्हा आभाळात उडू लागेल. त्यामुळे मन पिसागत हलके होईल. मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी विधायक काम करा. भविष्यातील ध्येय आणि गुंतवणूक याबाबत गुप्तता बाळगा. गुलाबी रंग जवळ बाळगा.

शुभ परिधान पांढरा कुर्ता, सुगंध

एकाग्रता महत्त्वाची

मीन : प्रिय व्यक्तींच्या भावना समजून घ्या. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य वापरा. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कार्याची लोकांकडून दाखल घेतली जाईल. निरर्थक गप्पांपासून कटाक्षाने दूर राहा. सोनेरी रंग जवळ बाळगा.

शुभ परिधाननवे कपडे, घडय़ाळ

आपली प्रतिक्रिया द्या