आठवड्याचे भविष्य

287

>> नीलिमा प्रधान
मेष – सकारात्मक घटना घडतील
ग्रहांची साथ चांगली असते तेव्हा यश मिळते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा प्रभाव वाढेल. तुमच्या नेतृत्वाची व विचारांची गरज भासेल. अंदाज बरोबर येईल. व्यवसायात प्रेरणादायी घटना घडेल. नवे भागीदार मिळतील. फायदा वाढेल. नोकरीत बदल करता खरेदी होई&ल. शेअर्समध्ये लाभ मिळेल.
शुभ दिन – ७, ८.

वृषभ – संयम बाळगा
संयम व गोड बोलणे हेच या आठवडय़ातील यशाचे गमक असेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठsवर घाला घालण्याचा प्रयत्न होईल. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. कलाक्षेत्रात कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात बोलणे घातक ठरेल.
शुभ दिन – ७, ९.

मिथुन – सामाजिक कार्यात यश
क्षेत्र कोणतेही असो, महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करा. किरकोळ वाद वाढवू नका. बुद्धिचातुर्य व प्रतिष्ठा यांचा मेळ घालून सामाजिक कार्यात मोठे यश मिळवता येईल. राजकीय क्षेत्रात तुमची योजना कौतुकास पात्र ठरेल. कोर्टकेसमध्ये बाजी मारता येईल. क्रीडा क्षेत्रात विशेष यश व कीर्ती मिळेल.
शुभ दिन – ९, १०.

कर्क – सहकार्य लाभेल
राजकीय क्षेत्रात तुमच्या विचारधारेचा वरिष्ठ आदर करतील. सामाजिक क्षेत्रात लोकांचे सहकार्य मिळेल. त्याच्या गरजेनुसार त्यांच्याकडे लक्ष देऊन तुमचे स्थान टिकवता येईल. व्यवसायात मोठे कंत्राट मिळवा. आध्यात्मिक कार्यात विशेष मन रमेल. शुभसंकेत मिळेल. अडचणी कमी होतील.
शुभ दिन- ११, १२.

सिंह – कामाचा प्रभाव वाढेल
सामाजिक क्षेत्रातील तुमचे धाडस व वर्चस्व पाहून गुप्त हितशत्रूंची तारांबळ होईल. ते अस्थिर होतील. राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुमच्या विरोधात निर्णय घेण्याचा विचार केला जाईल. त्याचा उपयोग होणार नाही. लोकांच्या प्रेमाने तुम्हाला खंबीर बनवले आहे. वाहन जपून चालवा. यश मिळेल.
शुभ दिन – ९, १०.

कन्या – मनोबल राखा
क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या विचारांची घुसमट होईल. तुमची मते पटवून देणे कठीण आहे. व्यवसायात चर्चा वादाच्या दिशेने जाईल. गुंतवणूक करण्याची घाई नको. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचे मत ऐकून घ्या. तुमची प्रतिष्ठा सांभाळा. नोकरीत कोणताही निर्णय दबावाखाली घेऊ नका. प्रतिक्रिया व्यक्त करू नका.
शुभ दिन – ६, ७.

तूळ – निर्णयाला साथ मिळेल
व्यवसायाला कलाटणी मिळेल. थोरांचा परिचय होईल. त्यातून धंद्याला नवे वळण मिळेल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठ तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतील. सप्ताहाच्या शेवटी जवळच्याच व्यक्ती त्या निर्णयात काडी घालण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्याला प्रसिद्धी मिळेल. क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल.
शुभ दिन – ९, १०.

वृश्चिक – संमिश्र घटना घडतील
साडेसातीमध्ये शनीमहाराज प्रगतीची मोठी संधी देतात. त्याबरोबर माणसाच्या कोणत्याही अतिरेकी स्वभावाला आळाही घालतात. म्हणूनच शनीला गुरू म्हटले जाते. कोणत्याही प्रकारचा आव आणलेला साडेसातीत चालत नाही. वृश्चिकेचा षडाष्टकयोग होत आहे. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील.
शुभ दिन – ७, ८.

धनु – वेगवान दिशेने प्रगती
प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा वेग वाढवणार आहे. राजकीय क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. सामाजिक कार्यात लोकांच्या भावना समजून घ्या. त्यांच्या कलाने घेऊन समस्या सोडवा. वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वाटाघाटीसंबंधी सर्वांचा तगादा तुमच्याकडे सुरू होईल. व्यवसायाला दिशा मिळेल.
शुभ दिन – ७, ९.

मकर – महत्त्वाकांक्षा सफल होतील
आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाची कामे करून घ्या. तुमचा उत्साह व महत्त्वाकांक्षा राजकीय क्षेत्रात उपयुक्त ठरेल. दौऱयात-भेटीत यश मिळेल. सामाजिक कार्यात लोकांच्या प्रेमाने तुम्हाला नवी प्रेरणा मिळेल. वेळेला महत्त्व द्या. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. आर्थिक गुंतवणूक होईल. नोकरीत अधिकार मिळेल.
शुभ दिन – ९, १०.

कुंभ – यशदायी आठवडा
आठवडय़ाची सुरुवात कटकटीची वाटली तरी त्यानंतर तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा दबदबा वाढेल. प्रेरणादायी विचारांना चालना मिळेल. इतरांनी केलेल्या टीकेला चोख उत्तर देता येईल. तुमचे मुद्दे पटवून देता येतील. कौटुंबिक समस्या कमी होतील. प्रवासाचे बेत ठरवाल.
शुभ दिन – ९, ११.

मीन – निर्णयात सावधगिरी बाळगा
व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये फायदा होईल. बुधवार, गुरुवार सावधपणे निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत पदाधिकार मिळण्याची आशा राहील. मोठे आश्वासन मिळेल. लोकांकडून तुमच्या कार्याला भरघोस प्रतिसाद मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. प्रगती होईल.
शुभ दिन – ६, ७.

आपली प्रतिक्रिया द्या