साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 ऑगस्ट ते शनिवार 5 सप्टेंबर 2020

>>    नीलिमा प्रधान

मेष

बोलताना सावध राहा

मेषेच्या सुखस्थानात शुक्र, षष्ठशात बुध राश्यांतर होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. व्यवसायात समस्या येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची पकड अधिक मजबूत होईल. आपापसांत गैसमज होतील तेव्हा बोलताना सावध राहा. कुटुंबात क्षुल्लक तणाव होईल.

शुभ दिनांक : 30, 31

वृषभ

व्यवसायात प्रभाव वाढेल

वृषभेच्या पराक्रमात शुक्र, पंचमेशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात प्रभाव वाढेल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांच्या सहवासात राहाल. किचकट कामं सोपी होतील. लोकप्रियतेत वाढ होईल. योजनांना गती द्या. कलासाहित्य क्षेत्रात विचारांना चालना मिळेल.

शुभ दिनांक : 30, 31

मिथुन

गुंतवणुकीत लाभ होईल

मिथुनेच्या धनेशात शुक्र, सुखेशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात मोठा लाभ होईल. गुंतवणूक करून घ्या. मागील येणे वसूल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे प्राबल्य वाढेल. अधिकार लाभतील. नोकरीत व्यावहारिक दृष्टिकोनामुळे लाभ होईल. कलाक्षेत्रात प्रेरणादायी घटना घडेल.

शुभ दिनांक : 1, 2

कर्क

अधिकार लाभतील

स्वराशीत शुक्र, कर्केच्या पराक्रमात बुध राश्यांतर होत आहे. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. नियमांचे काटेकोर पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मागे राहिलेली कामे करून घ्या. पदाधिकार लाभण्याची शक्यता. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत केल्याने तुमचे महत्त्व वाढेल.

शुभ दिनांक : 30, 31

सिंह

मानसिक दडपण येईल

सिंहेच्या व्यवेशात शुक्र, धनेशात बुध राश्यांतर होत आहे. जवळच्या व्यक्तीच्या समस्येवर उपाय शोधावा लागेल. एखादी गोष्ट मनाविरुद्ध स्वीकारावी लागेल. मानसिक दडपण येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. सहकारी वर्गाला सांभाळावे लागेल.

शुभ दिनांक : 1, 2

कन्या

विचारपूर्वक बोला

कन्येच्या एकादशात शुक्र, स्वराशीत बुध राश्यांतर होत आहे. रागावर ताबा ठेवा. प्रवासात सावध राहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट प्रश्नांची जबाबदारी तुमच्याकडे दिली जाईल. उतावळेपणा दूर ठेवून विचारपूर्वक बोला अन्यथा फसगत होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

शुभ दिनांक : 30, 31

तूळ

नावलौकिक वाढेल

तुळेच्या दशमेशात शुक्र, व्ययेषात बुध राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमच्या बोलण्यातून गैरसमज होतील. तुमचा उद्देश्य समजणे कठीण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. कामाचे कौतुक होईल. कलासाहित्य क्षेत्रात नावलौकिक वाढेल.

शुभ दिनांक : 1. 2

वृश्चिक

नवीन वास्तूचा योग

वृश्चिकेच्या भाग्येशात शुक्र, एकादशात बुध राश्यांतर होत आहे. नवीन वास्तूचा योग आहे. योग्य ठिकाणी गुंतवणुकीचा लाभ घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर कराल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

शुभ दिनांक : 30, 31

धनु

सहकाऱयांना दुखवू नका

धनुच्या अष्टमेषात शुक्र, दशमेशात बुध राश्यांतर होत आहे. मानसिक दडपण येईल. खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मात्र सहकारी वर्गाला दुखवू नका. चित्रपट, कलासाहित्यात प्रेरणादायक वातावरण असेल.

शुभ दिनांक : 31, 2

मकर

जबाबदारीने वागा

मकरेच्या सप्तमेशात शुक्र, भाग्येशात बुध प्रवेश करीत आहे. कुणाचीही बाजू घेण्याआधी विचार करा. दोषारोप तुमच्यावर येईल. कर्तव्य आणि भावना यांचा मेळ घाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. मात्र फाजील आत्मविश्वास नको. वरिष्ठांचा अवमान होऊ देऊ नका.

शुभ दिनांक : 2, 4

कुंभ

संयम राखा

कुंभेच्या षष्ठशात शुक्र, अष्टमेषात बुध राश्यांतर होत आहे. बोलताना संयम राखा. कुटुंबात भान राखून वागा. राजकारणात एखादे पाऊल मागे राहिल्यास फारसे बिघडत नाही. समाजकार्यात तुमच्यावर टीका होईल. अशावेळी तटस्थ राहून उत्तम प्रकारे समस्या सोडवा. व्यवसायात सावध राहा.

शुभ दिनांक : 3, 4

मीन

अहंकार दूर ठेवा

मिनेच्या पंचमेशात शुक्र, सप्तमेशात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात नवी संधी मिळेल. अहंकाराची भावना दूर ठेवून सांवाद साधा म्हणजे गैरसमज होणार नाहीत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामातील चूक दाखवली जाईल. कायद्याचे पालन करा. रागावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : 30, 31

आपली प्रतिक्रिया द्या