आठवड्याचे भविष्य

नीलिमा प्रधान

मेष – व्यवहारात सावध रहा
स्वराशीत बुध प्रवेश, बुध, मंगळ लाभयोग होत आहे. अधिकाराचा वापर बुद्धिचातुर्याने करावा लागेल. तरच राजकीय-सामाजिक क्षेत्रात विशेष करून दाखवता येईल. व्यवसायात सुधारणा होईल. मोठय़ा लोकांचा सहभाग उपयोगही पडेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. जबाबदारी वाढेल.
शुभ दिनांक – 29, 30

वृषभ – कायद्याचे भान राखा
वृषभेच्या व्ययेषात बुधप्रवेश, मंगळ-शनी षडाष्टकयोग होत आहे. व्यवसायात खर्चच जास्त होईल. कायद्याच्या कक्षा पार करून कोणतेही काम करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा धोक्यात येईल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात चाणाक्ष रहा. दुसऱयाची चूक तुमच्यावर लादली जाईल.
शुभ दिनांक -28,29

मिथुन – संयमाने मुद्दे मांडा
मिथुनेच्या एकादशात बुधप्रवेश सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. रविवार वाहन जपून चालवा. प्रत्येक कार्यात जिद्दीने पुढे जाता येईल. कर्जाचे काम येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वाटाघाटीत संयमाने तुमचे मुद्दे मांडा. नोकरीत वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. नाटय़-चित्रपट क्षेत्रात पुरस्कार लाभेल.
शुभ दिनांक – 29, 30

कर्क – यशदायी काळ
कर्केच्या दशमेषात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या पूर्वार्धात गुप्त कारवायांनी त्रस्त व्हाल. धावपळ होईल, परंतु यश तुम्हाला मिळवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आश्चर्यकारक यश मिळेल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. उत्तुंग यश मिळेल. ध्येय ठेवा.
शुभ दिनांक – 1, 2

सिंह – वरिष्ठांची मर्जी राखा
सिंहेच्या भाग्येषात बुधप्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. मनावर दडपण येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तणाव होईल. अनपेक्षित एखादे यश झळाळेल. कमीचे काम करून घेता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी फारच महत्त्वाची ठरेल. चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.
शुभ दिनांक – 29, 30

कन्या – कसोटीचा काळ
कन्येच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आठवडा कसोटीचा ठरेल. व्यवसायातील समस्या सुरुवातीलाच सोडवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा जबरदस्त प्रयत्न होईल. प्रतिष्ठा पणाला लावून कोणताही प्रश्न सोडवू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात तत्पर रहा. शुभ दिनांक -1,2

तूळ – नवी जबाबदारी लाभेल
तुळेच्या सप्तमेषात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेलच. वेगळय़ा प्रकारची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. सामाजिक क्षेत्रात सहकारी लोक तुमचा हेवा करतील. व्यवसायात फायदा होईल. मोठय़ा लोकांचा परिचय होईल. कलाक्षेत्रात चांगले काम करा
शुभ दिनांक-29,30

वृश्चिक – मनोबल राखा
वृश्चिकेच्या षष्ठषात बुधप्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी यश मिळण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात आहे. दिग्गज लोकांना तुमचे मुद्दे पटले तरी एकी होण्यास वेळ लागेल. व्यवसायात नाराजी होईल. कुटुंबात तुमच्यावर जबाबदारी येईल. नोकरीत कामाचा ताण होईल.
शुभ दिनांक- 28,1

धनु – प्रवासाचे बेत ठरतील
धनु राशीच्या पंचमेषात बुधप्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. काही लोक दुसऱयांच्या चुका दाखवतात. फार लक्ष देऊ नका.. व्यवसायात नवा पर्याय यशस्वी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी घेतलेले श्रम उपयोगी पडतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. आर्थिक लाभ होईल. शुभ दिनांक – 28,30

मकर – तुमचा प्रभाव वाढेल
मकरेच्या सुखेषात बुधाचा प्रवेश, चंद्र-शुक्र युती होत आहे. राजकीय परिस्थितीची योग्य वेळ साधा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दौऱयात प्रभाव वाढेल. साडेसाती सुरू आहे. अनुभव घेऊनच माणूस हुशार होतो. व्यवसायात वाढ करण्याची संधी सोडू नका. कोर्टाच्या कामात तत्परता ठेवा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल. शुभ दिनांक-29,30

कुंभ – अधिकार लाभतील
कुंभेच्या पराक्रमात बुधप्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवशी तुमची महत्त्वाची कामे मार्गी लावता येतील. व्यवसायात जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे यश कौतुकास्पद ठरेल. अधिकारप्राप्ती होईल. नवा परिचय आत्मविश्वास वाढवेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दिनांक -1,2

मीन – नवी खरेदी कराल
मीन राशीच्या धनेषात बुधप्रवेश, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. सोमवार, मंगळवार व्यवसायात समस्या येईल. त्यानंतर तुम्ही केलेले प्रयत्न चांगलेच यशस्वी होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वास्तू, वाहन, जमीन अशी मोठी खरेदी-विक्री फायदेशीर ठरेल. शुभ दिनांक ः 2,3