साप्ताहिक राशिभविष्य 11 मे ते 17 मे 2019

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – सबुरीने घ्या
प्रत्येक कालखंड तुमच्यासाठी यशाचा ठरणार आहे. पण हाताचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नका. थोडे सबुरीने घ्या. वेळप्रसंगी वरिष्ठांपुढे नमते घेतले तरी हरकत नाही. लाल रंग जवळ बाळगा. नव्या उद्योगासाठी चांगला मुहूर्त.
शुभ परिधान – भरजरी वस्त्र, अंगठी

वृषभ – वेतनवाढ होईल
उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी पगार वाढीचे संकेत आहेत. घरातील वातावरण चांगले राहील. पाहुणे येतील. घरातील गृहिणीस कामाचा ताण पडेल. सर्वांनी कामे वाटून घ्यावीत. तब्येतीची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी पंधरा रंग परिधान करा.
शुभ परिधान – शिंपल्याचे अलंकार, लिनन

मिथुन – वातावरण चांगले
घरात थोडयाफार कुरबुरी होतील. लहानांना सांभाळून घ्यावे. डोकं शांत ठेवावे. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. कामात मन गुंतवावे. मारुती रायाची उपासना करा. दर शनिवारी घरातील देवासमोर समर्थ रामदासांचे मारुती स्तोत्र म्हणा. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुती साडी, मोगरा

कर्क – गहिरे नाते
हा आठवडा तुमचे नाते अजून गहिरे करण्यास अत्यंत पोषक आहे. कर्क राशीच्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराचे लाड करण्याचा हा आठवडा आहे.जोडीदारास लाल गुलाबाचे फुल द्या. शक्य झाल्यास दोघेही बाहेर जा.. गुलाबी रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – मोत्याच्या कुडय़ा, कुर्ता

सिंह – आनंदी आनंद
तेजस्विता तुमचा स्थायी भाव. ठाम, निश्चयी वृत्ती हा तुमचा स्वभावधर्म. हे तुमचे गुण कधीही सोडू नका. हा आठवडा आनंदाचा आहे. भगवा रंग धारण करा. हनुमंताची उपासना करा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.
शुभ परिधान – सौंदर्य प्रसाधन, दुपट्टा

कन्या – वास्तू खरेदी
भावंडांशी मतभेद संभवतात. तुम्ही मोठेपणा घेऊन सांभाळून घ्या. घरातील वातावरण त्यामुळे चांगले राहील. वास्तू खरेदीसाठी उत्तम काल. समोरून विचारणा झाली तर पूर्ण चौकशी करून काम तडीस न्या. त्यावेळी निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – बांगडया, रेशमी झब्बा

तूळ – अपेक्षित फळ
अप्तास्वयांच्या भेटीगाठी संभवतात. त्यामुळे मनास आनंद मिळेल. नातवंडात रमाल. घरात सुंठवडा तयार करा. आणि मारुतीस नैवेद्य दाखवा. अपेक्षित फळ मिळेल. लाल रंग जवळ ठेवा. घरात वाद टाळा. पुस्तकात मन रमवा. उत्तमोत्तम साहित्य वाचाल.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, मंगळसूत्र

वृश्चिक – घराचे पावित्र्य
घरात साफसफाईची कामे निघतील. त्यामुळे घराचे पावित्र्य वाढेल. घरी जलपूजन करा. पूजेचा तांब्या स्वच्छ पाण्याने भरून दिवेलागणीच्या वेळेस त्याचे पूजन करा. अचानक धनलाभ होईल. आकाशी रंग परिधान करा. उद्योगधंद्यात प्रगती होईल.
शुभ परिधान – पोवळ्याचा खडा, जरीचे वस्त्र

धनु – प्रगती होईल
पिवळा रंग अत्यंत लाभकारक ठरेल. महत्वाच्या कामाच्या दिवशी आवर्जून परिधान करा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. घरात थोडय़ा कुरबुरी संभवतात. दुर्लक्ष करा. कला क्षेत्रात प्रगती होईल. नवीन उद्योगधंद्यासाठी प्रयत्न करा.
शुभ परिधान – रेघांचा शर्ट, केशालंकार

मकर – सबुरीने घ्या
देशाची रास मकर आहे. अत्यंत सहनशील स्वभावाची तुमची रास. सब्र का फल मिठा या उक्तीचा प्रत्यय येईल. पायाच्या विकारांपासून स्वतःची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने वागा. फायदा होईल. निळा रंग यश देईल. इच्छा पूर्ण होईल.
शुभ परिधान – कोल्हापुरी चप्पल, उपरणे

कुंभ – धावपळीचा आठवडा
वरून जरी दाखवत नसलात तरी मनाने अत्यंत हळवे असता तुम्ही. प्रिय व्यक्तीच्या भेटीस अधीर व्हाल. इतक्यात भेट होणार नाही. अत्यंत धावपळीचा आठवडा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. घरातील शंकराच्या पिंडीस बेलपत्र वाहा. राखाडी रंग परिधान करा.
शुभ परिधान – कपाळी अष्टगंध, सुगंध

मीन – आवडती गोष्ट
नवीन वस्तूंची खरेदी होईल. ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवा. आवडत्या गोष्टीत स्वतःला गुंतवून ठेवा. देर है पर अंधेर नही या उक्तीचा तुम्हाला प्रत्यय नेहमीच येतो. हनुमानाची उपासना करा. कोणत्याही वारी त्याच्या देवळात जा. पांढरा रंग लाभदायी.
शुभ परिधान – ब्रेसलेट, चमेलीचा गजरा

समस्या –
प्रिय व्यक्तीसोबत वारंवार मतभेद होतात. अनेक दिवस अबोला चालतो. चैन पडत नाही. मनात वाईट विचार येतात.
– सुभाष गानू, डोंबिवली

तोडगा – त्या महत्वाच्या व्यक्तीस वेलची घातलेला चहा आपल्या हाताने करून द्या. त्यामुळे त्या व्यक्तीचे मन सहज जिंकून घ्याल.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

manasijyotish@gmail.com