आठवड्याचे भविष्य – रविवार 8 ते शनिवार 14 सप्टेंबर 2019

4845

 >> नीलिमा प्रधान

मेष
मनोधैर्य सांभाळा
मेषेच्या षष्ठय़स्थानात शुक्र, बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायात तणाव होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबर चर्चा सौम्य शब्दांत करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत स्वतःचे महत्त्व नुसते टिकवून चालत नाही. सार्वजनिक प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते. मनोधैर्य टिकून राहील. गैरसमज वाढू देऊ नका.
शुभ दि. 9, 10.

वृषभ
लोकप्रियता लाभेल
वृषभेच्या पंचमेषात शुक्र, बुध राश्यांतर व्यवसाय-नोकरीत फायदेशीर ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रत्येक योजनेवर लक्ष देऊन त्या पूर्ण करा. लोकप्रियता मिळेल. कुटुंबात मुलांच्या संबंधी समस्या सोडवता येतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नवीन ओळख होतील. कोर्ट केस लवकर संपवा.
शुभ दि. 10, 11.

मिथुन
कामात दिरंगाई नको
मिथुनेच्या सुखस्थानात शुक्र, बुध राश्यांतर व्यवहाराला फायदेशीर ठरेल. मंगळवार, बुधवार प्रवासात दुखापत संभवते. करार करू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कामे रेंगाळत ठेवू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक वाढेल. कार्याला चालना देणारी घटना घडेल. करारीपण कौतुकास्पद ठरेल.
शुभ दि. 8, 13.

कर्क
परदेशी जाण्याची संधी
कर्क राशीच्या पराक्रमात शुक्र, बुध प्रवेश, बुध-शुक्र युती होत आहे. दुखापत संभवते. व्यवसाय-नोकरीत मनाप्रमाणे बदल करता येईल. कंपनीद्वारे परदेशात जाण्याचे ठरू शकते. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वास वाढेल. कलाक्षेत्रांत पुरस्कार मिळेल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल.
शुभ दि. 10, 11.

सिंह
रागावर नियंत्रण ठेवा
सिंहेच्या धनेषात शुक्र, बुध राश्यांतर होत आहे. बुध-प्लुटो त्रिकोणयोग व्यवसायात अधिक वाढ करेल. नवे काम मिळेल. नोकरीतील समस्या सोडवाल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत  आर्थिक सहाय्य मिळेल. प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळेल. राग वाढेल अशी घटना घडेल. नवे परिचय प्रेरणा देतील.
शुभ दि. 8, 13.

कन्या
सावध रहा
स्वराशीत बुध, शुक्र राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवणारे ठरणार आहे. अनंतचतुर्दशीच्या दिवशी तणाव होऊ शकतो. तुम्ही सावध रहा. व्यवसायात मोठय़ा कामाची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या ध्येयावर व कार्यसिद्धीवर अधिक लक्ष द्या.
शुभ दि. 9, 10.

तूळ
व्यवहारात तटस्थ रहा
तुळेच्या व्ययेषात शुक्र, बुध राश्यांतर, सूर्य-नेपच्यून प्रतियुती होत आहे. व्यवसायात भावना व व्यवहार एकत्र करू नका. शब्द देताना विचार करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. वर्चस्व राहील. कुणालाही कमी लेखू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी करून दाखवाल.
शुभ दि. 8, 12.

वृश्चिक
मनाप्रमाणे घटना घडतील
वृश्चिकेच्या एकादशात शुक्र, बुध राश्यांतर, सूर्य-गुरू केंद्रयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत मनाप्रमाणे घटना घडतील. त्यानुसार प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत सहकार्य मिळेल. आर्थिक सहाय्य करणारे उद्योजक मिळतील. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत उत्साहवर्धक घटना घडेल.
शुभ दि. 8, 9.

धनु
यश देणारा काळ
धनुच्या दशमेषात शुक्र, बुध राश्यांतर, सूर्य-नेपच्यून प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या कार्यात यश देणारा ठरेल. व्यवसाय-नोकरीत महत्त्वाचा, फायद्याचा बदल करता येईल. कौटुंबिक  चर्चा सफळ होईल. राजकीय क्षेत्रांत तुमचे विचार सर्वांना पटतील. यशस्वी व्हाल. कलाक्षेत्रांत नावलौकिक मिळेल.
शुभ दि. 10, 11.

मकर
संयम राखा
मकरेच्या भाग्येषात शुक्र, बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात झालेला गुंता, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. लोकांच्या मनातील संशय दूर करा. रागावर ताबा ठेवा. संयमानेच चांगले उत्तर आपण शोधू शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रसंगावधान ठेवा. स्पर्धेत अविरत प्रयत्न करा.
शुभ दि. 12, 13.

कुंभ
नव्या कार्याची सुरुवात
कुंभेच्या अष्टमेषात शुक्र, बुध प्रवेश, सूर्य-नेपच्यून प्रतियुती होत आहे. व्यवसायात अचानक फायद्याची नवीन संधी मिळेल; परंतु त्याची नक्की शहानिशा करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वास राखा. प्रतिष्ठा मिळेल. कोणालाही कमी लेखू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत खंबीर नेतृत्व कराल.
शुभ दि. 8, 14.

मीन
ध्येयाकडे लक्ष असू द्या
मीनेच्या सप्तमेषात बुध, शुक्र राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. कोणतेही गैरवर्तन नको. दादागिरी महागात पडेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कार्यावर लक्ष केंद्रित करा. कार्यानेच माणूस मोठा होतो. व्यवसायातील वाद सोडवता येईल. क्रीडा क्षेत्रांत प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दि. 8, 9.

 

आपली प्रतिक्रिया द्या