साप्ताहिक राशिभविष्य- 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019

5085

>> नीलिमा प्रधान

मेष – तडजोड करावी लागेल
मेष राशीच्या षष्ठेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-शनी प्रतियुती होत आहे. व्यवसाय-नोकरीत तुमचा प्रभाव करण्याचा प्रयत्न होईल. नवीन कंत्राट मिळवणे सोपे नाही. अनुभवी विचार व दूरदृष्टी यांचा जरूर विचार करा. क्षेत्र कोणतेही असले तरी कदाचित तडजोड करावी लागेल, व्यवहारात फसगत होईल.
शुभ दिनांक – 22

वृषभ – मनाप्रमाणे बदल होतील
वृषभेच्या पंचमेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात जम बसवा. मनाप्रमाणे बदल, सुधारणा करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. योजनांच्या मागे लागा. लोकप्रियता मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करा. कलाक्षेत्रात नावलौकिक होईल.
शुभ दिनांक – 22, 24

मिथुन – सावधगिरी बाळगा
मिथुनेच्या सुखेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. मनशक्तीच्या जोरावर तुम्ही तुमच्या क्षेत्रात कामे करू शकाल. संयमाने तुमचे विचार पटवून द्या. नोकरीत वरिष्ठ मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात कोंडीत पकडायचा प्रयत्न होईल. सावध रहा.
शुभ दिनांक – 24, 25

कर्क – आर्थिक फायदा होईल
कर्केच्या पराक्रमात मंगळ राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात चांगला जम बसेल. कंत्राट पूर्ण करून त्याचा आर्थिक फायदा घेता येईल. ग्रहांची साथ असताना संधीला अधिक महत्त्व द्यायला हवे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. कार्याला दिशा मिळेल. कुटुंबातील तणाव कमी होईल. शुभ दिनांक – 26, 27

सिंह – रागावर ताबा ठेवा
सिंहेच्या धनेषात मंगळ राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायात सर्व समस्या सोडवता येतील. मंगळवार, बुधवार रागावर ताबा ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वाटाघाटीची उत्तम बोलणी होतील. तुमचे वर्चस्व बुद्धिचातुर्याने दाखवा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल.
शुभ दिनांक – 26, 27

कन्या – परदेशी जाण्याची संधी
स्वराशीत मंगळ राश्यांतर, बुध-गुरू लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. व्यवसायात उत्तम प्रकारे तुमचा प्रभाव पडेल. मोठे कंत्राट मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी होईल. परदेशात जाण्याची कंपनीद्वारे संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीची घोडदौड वेगाने होईल. शुभ दिनांक – 22,25

तुळ – स्पर्धा वाढेल
तुळेच्या व्ययेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. संघर्ष करून यश मिळवायचे आहे. या सप्ताहात तडजोड करावी लागेल. व्यवसायात वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. सहनशीलता ठेवावी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कोणताही व्यवहार करताना सावध रहा.
शुभ दिनांक – 22, 23

वृश्चिक – सकारात्मक काळ
वृश्चिकेच्या एकादशात मंगळ राश्यांतर, बुध-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात ओळखीतून मोठे काम मिळेल. जुने येणे वसूल करा. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होईल. कुटुंबात सुखद घटना घडेल. नामवंतांचा परिचय होईल.
शुभ दिनांक – 24, 25

धनु – व्यवसायात सुधारणा होईल
धनुच्या दशमेषात मंगळ राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. संघर्ष असला तरी व्यवसायात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नोकरीत तणाव कमी होईल. बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मागे पडलेली योजना गतिमान करू शकाल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात गौरवास्पद काम कराल.
शुभ दिनांक – 22, 23

मकर – विचारांना चालना मिळेल
मकरेच्या भाग्येषात मंगळ राश्यांतर, शुक्र-गुरू लाभयोग होत आहे. या आठवडय़ात तुमच्या विचारांना चालना मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत कामाचा व्याप असला तरी वर्चस्व वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पुढे जाता येईल. योजनांची पूर्ती करता येईल. शुभ दिनांक – 24, 25

कुंभ – मनोबल राखा
कुंभेच्या अष्टमेषात मंगळ राश्यांतर, बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. व्यवसायात अचानक अडचण निर्माण होईल. भागीदाराच्या बरोबर वादविवाद होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विरोध वाढेल. तुमचा मानसिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. कुटुंबात वाद उद्भवतील.
शुभ दिनांक – 22, 23

मीन – अधिकारप्राप्ती होईल
मीनेच्या सप्तमेषात मंगळ राश्यांतर, बुध-गुरू लाभयोग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. समस्या सोडवता येईल. नवीन ओळखीमुळे मोठे काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात चूक सुधारून पुढे जाता येईल. नव्या योजनांना मार्ग खुला होईल. वरिष्ठ मदत करतील. अधिकारप्राप्ती होईल.
शुभ दिनांक – 24, 25

आपली प्रतिक्रिया द्या