आठवड्याचे भविष्य

2323

>> मानसी इनामदार

मेष – जनसंपर्क वाढेल
या आठवडय़ात दूरचा प्रवास घडेल. प्रवासादरम्यान प्रकृतीची काळजी घ्या. कामाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढेल. नवीन गुंतवणूक कराल. चांगल्या माणसांशी संपर्क येईल. उद्योग व्यवसायात यश मिळेल. नवे निर्णय घ्याल. पांढरा रंग महत्त्वाचा. कामे वेळेत पूर्ण होतील.
शुभ परिधान – भरजरी वस्त्र, सोन्याचे वळे

वृषभ – मधुर नातं
पतीपत्नीच्या संबंधात मधुरता निर्माण होईल. घरातील महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घ्याल. गुंतवणूक करताना सावध रहा. निळा रंग जवळ बाळगा. शनी माहात्म्य वाचा. स्वतःवर विश्वास ठेवा. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.
शुभ परिधान – सोनेरी घडय़ाळ, पैंजण

मिथुन – घसघशीत पैसा
घरात आनंदाचे वातावरण राहील. आवडती माणसे घरी येतील. रखडलेली कामे पूर्ण कराल. कर्तृत्व गाजवाल. महालक्ष्मी पूजन मनोभावे कराल. पिवळा रंग जवळ बाळगा. कार्यालयीन कामात यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील. यात घसघशीत अर्थप्राप्ती होईल.
शुभ परिधान – नऊवार साडी, कुर्ता

कर्क – मानपान होईल
प्रतिष्ठत व्यक्तीच्या संपर्कात याल. त्यातून खूप फायदा होईल. पण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता.. या उक्तीचा प्रत्यय येईल. त्यात कसूर होऊ देऊ नका. सासरी मानमरातब वाढेल. विशेषतःपुरुषांना हा अनुभव येईल. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – कर्णफुले, ब्रेसलेट

सिंह – नवी खरेदी
हा आठवडा दसरा विशेष असेल. मोठय़ा सुट्टीवर जाण्याचा मानस असेल. त्यामुळे घरातील खूश असतील. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. घरात सकारात्मक ऊर्जा लाभेल. नवीन खरेदी कराल. गुलाबी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – खरा दागिना, लिपस्टिक

कन्या – फिरायला चला
घरात छान आनंदी वातावरण राहील. घरातील लहान मुलांचे लाड पुरवा. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा योग आहे. त्यामुळे मन आनंदी होईल. अवास्तव खर्चाना लगाम घाला. वेळीच काळजी घ्या. अबोली रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – अबोलीचा गजरा, सुगंध

तूळ – पाहुणे येतील
दसरा आनंदात साजरा होईल. नवी खरेदी कराल. त्यामुळे नवे काम हाती घेण्यास उत्साह येईल. घरात पाहुणे मंडळींचा राबता असेल, पण कामाचा ताण जाणवणार नाही. उत्तम अर्थप्राप्ती होईल. लाल रंग जवळ बाळगा. आत्मविश्वास वाढेल.
शुभ परिधान – पैठणी, ठुशी

वृश्चिक – मानसिक पाठिंबा
देवीची उपासना यथोचित फळ देईल. नवमीला देवीची ओटी भरा. नवे वस्त्र खरेदी करा. राहिलेली कामे मार्गी लागतील. नवी ऊर्जा मिळेल. घरातील लहानांची काळजी घ्या. त्यांना मानसिक पाठिंबा द्या. तुळशीचा रंग लाभदायक ठरेल.
शुभ परिधान – रुद्राक्ष, शेवंतीचा वळेसर

धनु – गूळ थांबा
मित्रांकडून फसवणूक संभवते. अत्यंत सावध रहा. कोणतेही पैशाचे व्यवहार करू नका. गायीला गूळ खायला घाला. स्वतःच्या आहारात गुळाचा समावेश करा. आत्मबल वाढेल. कामात मन रमवा. सोनेरी रंग जवळ ठेवा. दसरा आनंदात साजरा कराल.
शुभ परिधान – चांदीचे अलंकार, हीना अत्तर

मकर – आवक वाढेल
घरखर्च वाढेल. पण काळजी करू नका. आवकही त्याप्रमाणात वाढेल. पण काटकसरीने राहण्याचा प्रयत्न करा. हाती राखीव पैसे असणे केव्हाही चांगले. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रवास सफल होतील. प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नथ, बांगडय़ा

कुंभ – वेग आणि यश
एखादे थांबलेले काम प्रचंड वेगाने पूर्ण कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. यश तुमचेच आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवा. जवळच्या माणसांवर राग काढू नका. चुकीची संगत लागण्याची शक्यता आहे. कोणताही चमकदार रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – फॅन्सी पोशाख, गुलाब

मीन – सकारात्मक राहा
भोवतालची नकारात्मक ऊर्जा कटाक्षाने दूर ठेवा. एखाद्या आनंदसोहळय़ात सामील व्हाल. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा माराल. त्यातून बरेच काही मिळेल. काळा रंग परिधान करा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.
शुभ परिधान – तन्मणीचे खोड, मोती

आपली प्रतिक्रिया द्या