आठवड्याचे भविष्य – 6 ऑक्टोबर 2019 ते 12 ऑक्टोबर 2019

5348

मेष – संयम राखून बोला

सूर्य-नेपच्यून षडाष्टक योग, बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. दुर्गामातेच्या कृपेने येणारे संकट टळू शकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा जोरदार प्रयत्न होईल. प्रतिष्ठsचा प्रश्न करून कोणत्याही क्षेत्रातील समस्या सोडवू नका. नाटय़-चित्रपट- क्षेत्रात ओळखी होतील.         शुभ दि. – 7, 8

 

वृषभ – कामासाठी अवलंबून राहू नका

सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. कुटुंबात क्षुल्लक कारणाने वाद होईल. तुमचे गुपित उघड होण्याचा संभव आहे. नोकरी-व्यवसायात स्वतःचे काम स्वतः करा. सहकारी – नोकरवर्ग तुमच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मोठी योजना मार्गी लावा.                      शुभ दि. – 7, 8

 

मिथुन – प्रवासात सावध रहा

बुध-हर्षल प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सोमवार, मंगळवार प्रवासात सावध रहा. क्षुल्लक कारणाने वाद वाढेल. नोकरी-व्यवसायात जम बसेल. फक्त रागाचा पारा नियंत्रणात ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. योजनांच्या मागे लागून कामे करा.         शुभ दि. – 6, 11

 

कर्क – आनंददायी घटना घडेल

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. लवकर प्रश्न सोडवा. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. नोकरी-व्यवसायात चांगला जम बसेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेळ फुकट घालवू नका. दसऱयापासून नव्या कार्याचा आरंभ करा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात पुरस्कार मिळेल.        शुभ दि. – 7, 8

 

सिंह – परदेशी जाण्याची संधी

सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगला बदल करण्याची संधी मिळेल. मोठे काम मिळवा. कुटुंबातील वाद, तणाव संपवता येईल. प्रेमाने प्रश्न सोडवा. संततीप्राप्तीसाठी प्रयत्न यशस्वी ठरेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. परदेशात जाण्याची संधी येईल.         शुभ दि.- 6, 10

 

कन्या – महत्त्वाचे काम मार्गी लागेल

चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात रेंगाळत राहिलेले महत्त्वाचे काम मार्गी लागेल. नोकरी-व्यवसायात नावलौकिक वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात भरकटलेले विचार स्थिर होतील. रागामुळे नुकसान जास्त होते. खंबीर रहा. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात लाभ होईल.        शुभ दि. – 7, 8

 

तूळ – व्यवसायात सुधारणा होईल

सूर्य-नेपच्यून षडाष्टक योग, बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. श्री दुर्गामातेच्या कृपेनेच तुमची कामे होतील. प्रतिष्ठsच्या मागे न लागता राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्यरत रहा. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत वरिष्ठांना नाराज करू नका. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात तुमच्याशी स्पर्धा वाढेल.                   शुभ दि. – 6, 10

 

वृश्चिक – नावलौकिक मिळेल

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. नोकरीत काम वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. क्षुल्लक कारणाने व्यवसायात वाद होईल. सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते यांना नाराज करू नका. योजनांना गती मिळेल. दसरा सण मनाप्रमाणे साजरा होईल.नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.   शुभ दि. – 6, 8

 

धनु – प्रगतीकारक काळ

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, शुक्र-हर्षल प्रतियुती होत आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रकारे सुधारणा करता येईल. दिशा मिळेल. विचारांना चालना मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात उन्नतीचा मार्ग दिसेल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. तुम्ही स्वतःची व इतरांचीही प्रगती सहयोगाने करून दाखवाल.      शुभ दि. – 7, 8

 

मकर – प्रयत्न सत्कारणी लागतील

सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. श्री दुर्गामातेच्या कृपेने तुमच्या क्षेत्रात तुम्ही बाजी माराल. व्यवसाय-नोकरीत चांगला बदल करू शकाल. प्रयत्न सत्कारी लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव टिकवता येईल. कुटुंबातील महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.             शुभ दि. – 2, 9

 

कुंभ – वादाचा प्रसंग ओढवेल

सूर्य-नेपच्यून षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. सोमवार, मंगळवार मानसिक, शारीरिक दडपण येईल. वादाचा प्रसंग व्यवसाय-नोकरीत निर्माण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा विचार घेतला जाणार नाही. तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होईल. कुटुंबात महत्त्वाची घटना घडेल.        शुभ दि. – 6, 12

 

मीन – प्रेरणादायी घटना घडेल

सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात काम मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात योजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. कुटुंबात वाटाघाटीसंबंधी प्रश्न निर्माण होऊ शकतो. चित्रपट-क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी घटना घडेल.       शुभ दि. – 6, 7

 

आपली प्रतिक्रिया द्या