साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021

>>  नीलिमा प्रधान

मेष  : दिशाभूल होऊ देऊ नका

मेषेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, शुक्र, शनी प्रतियुती होत आहे. व्यवसायात वाद होईल. दिशाभूल होऊ देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक डावपेच उधळून लावतील. अनुभवातून शहाणपण घ्या. नोकरीत मोहाला बळी पडू नका. क्रीडा साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहील.

शुभ दिनांक : 5, 6

वृषभ : योजनांना गतिमान बनवा

वृषभेच्या धनेशात बुध राश्यांतर, शुक्र, शनी प्रतियुती होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला अंदाज चुकेल, शब्द जपून वापरा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद मिळण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढेल. योजनांना गतिमान बनवा. कला, साहित्यात नवे परिचय होतील.

शुभ दिनांक : 6, 7

मिथुन : वर्चस्व वाढेल

स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. ठरवलेल्या कामात यशस्वी व्हाल. व्यवसायात सुधारणा होईल. नवे धोरण ठरवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांच्या चुका दाखवता येतील. नोकरीत वरिष्ठांना खुश कराल. कुटुंबातील प्रश्न मार्गी लागेल.

शुभ दिनांक : 4, 5

कर्क : अरेरावीची भाषा दूर ठेवा

कर्केच्या व्ययेषात बुध राश्यांतर, शुक्र शनी प्रतियुती होत आहे. व्यवसायात खर्च वाढेल. नवे काम मिळेल मात्र अरेरावीची भाषा वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मुद्यांवर विरोधक आक्षेप घेतील. कुटुंबात जबाबदारीने काम करावे लागेल. कला, क्रीडा साहित्य क्षेत्रात नावीन्य दाखवाल.

शुभ दिनांक : 4, 5

सिंह : प्रत्येक दिवस यश देणारा

सिंहेच्या एकादशात बुध राश्यांतर, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. किरकोळ वादांकडे दुर्लक्ष करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता विरोधकांना सहन होणार नाही. मनस्ताप देणाऱया घटना घडतील. मानसन्मानात भर पडेल.

शुभ दिनांक : 4, 5

कन्या : अधिकार लाभतील

कन्येच्या दशमेशात बुध राश्यांतर, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. मन अस्थिर होईल. उद्योगधंद्यात सुधारणा करून फायदा करा. शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला नवीन कार्याचा अधिकार मिळेल. महत्त्वाचा निर्णय घेतल्याने प्रतिमा उजळेल.

शुभ दिनांक : 6, 7

तूळ : सावधपणे निर्णय घ्या

तुळेच्या भाग्येशात बुध राश्यांतर, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. मनावर दडपण येईल. व्यवसायात सावधपणे निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे मुद्दे उपस्थित केल्याने सर्वत्र काwतुक होईल. नवीन परिचयातून अडलेले काम करून घेता येईल.  प्रगतिकारक घटना घडतील.

शुभ दिनांक : 4, 5

व़ृश्चिक : कायदा सांभाळा

वृश्चिकेच्या अष्टमेषात बुध राश्यांतर, शुक्र शनी प्रतियुती होत आहे. आठवडय़ाची सुरुवात तणावग्रस्त असेल. भागीदाराशी व्यवहार करताना सतर्क राहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळा. नोकरी टिकवा. कायद्याला धरून व्यवहार करा. कुटुंबाची काळजी वाटेल.

शुभ दिनांक : 6, 7

धनु : दडपण आणणारी घटना घडेल

धनु राशीच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. मनावर दडपण आणणारी घटना घडेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवसायात खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना पूर्ण करू शकाल. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. कुटुंबात क्षुल्लक कारणाने नाराजी होईल.    शुभ दिनांक : 4, 5

मकर : चौफेर विचार करा

मकरेच्या षष्ठेशात बुध राश्यांतर, शुक्र शनी प्रतियुती होत आहे. कोणत्याही कारणाने संतप्त होत निर्णय घेऊ नका. चुकण्याची शक्यता असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. कोणतेही वक्तव्य करताना चौफेर विचार करा. घातक कृतीपासून दूर राहा. कला, क्रीडा क्षेत्रात विशेष घटना घडतील.                 शुभ दिनांक : 6, 7

कुंभ : कार्याचा ठसा उमटेल

कुंभेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, सूर्य हर्षल लाभयोग होत आहे. व्यवसायात तणाव होईल. भागीदाराच्या अपेक्षा वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचा विशेष ठसा उमटेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. नोकरीत महत्त्व वाढेल. चित्रपट काळ, साहित्य क्षेत्रात मतभेद होतील.

शुभ दिनांक : 4, 8

मीन : कामाचा व्याप वाढेल

मीन राशीच्या सुखस्थानात बुध राश्यांतर, शुक्र, शनी प्रतियुती होत आहे. व्यवसायात नवीन परिचयातून काम मिळवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक वादग्रस्त मुद्दे उभे करतील. वाद वाढवू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. मित्रांना सहकार्य कराल. वरिष्ठांना कमी लेखू नका. शुभ दिनांक : 4, 5

आपली प्रतिक्रिया द्या