भविष्य – रविवार १३ मे ते १९ मे २०१८

108

>> नीलिमा प्रधान

मेष – सहकार्य लाभेल
राजकीय क्षेत्रात थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे योजना व दौरे यशस्वी होण्यास मदत होईल. सामाजिक प्रतिष्ठा व लोकांचे प्रेम यांच्या जोरावर तुमचे नियोजन फारच प्रभावी ठरणार आहे. व्यवसायात चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल. कार्य सफल करता येईल.
शुभ दिनांक – १६, १७

वृषभ – व्यवसायात अनुकूलता लाभेल
ग्रहांची साथ असते तेव्हा केलेले प्रयत्न यशस्वी होतात. क्षेत्र कोणतेही असो, तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढविणारी घटना घडेल. शेतकऱयांचे नुकसान भरून निघेल. व्यवसायात सुधारणा होऊ शकेल. मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. राजकीय क्षेत्रांत प्रतिष्ठा तयार करू शकाल.
शुभ दिनांक – १६, १७.

मिथुन – महत्त्व वाढेल
आठवडय़ाच्या सुरुवातीला कामे करा. भावनेच्या भरात एखादे गुपित तुमच्याकडून उघड होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात योजना पूर्ण करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. वारा येईल तशी पाठ फिरवणे तुम्हाला चांगले जमते. त्याचाच उपयोग होईल.
शुभ दिनांक – १३, १९.

कर्क – निर्णयात सावधगिरी बाळगा
राजकीय कारकीर्द उजळवता येईल. तुमचे डावपेच वरिष्ठांना खूश करणारे असतील. भलत्या व्यक्तीच्या सल्ल्याने चूक करू नका. सामाजिक कार्यात नाराजीकडे लक्ष न देता लोकांच्या अडचणी समजून घ्या. प्रेमाने कुटुंबात गैरसमज व नाराजी होईल. व्यवसायात गुंतवणूक करण्याची घाई नको.
शुभ दिनांक ः १३, १४.

सिंह – संभ्रम दूर होतील
या आठवडय़ात मनातील संभ्रम दूर होईल. अविचारांचे काळे ढग दूर होऊन विचार प्रकाशमान होतील. राजकीय क्षेत्रात योग्य सल्ल्याने व चर्चेतून चांगला निर्णय घेता येईल. व्यवसायात लक्ष द्या. मनाप्रमाणे प्रगती होईल. संसारातील नाराजी दूर होईल. योग्य-अयोग्य ओळखून निर्णय घ्या.
शुभ दिनांक -१४, १५.

कन्या – वर्चस्व वाढेल
सर्व ठिकाणी अडचणीवर मात करावी लागेल. नम्रता ठेवा. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व नव्याने प्रस्थापित होईल. सामाजिक कार्याला तुमच्या पद्धतीने दिशा देऊ शकाल. आर्थिक सहाय्य व लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात जम बसेल. कला-क्रीडा क्षेत्रांत प्रगती उत्तम होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभ दिनांक – १६, १७.

तूळ – संयम बाळगा
तुम्ही ठरविलेल्या कार्यक्रमात किरकोळ अडचणी येतील. जिद्दीने काम पूर्ण करा. राजकीय क्षेत्रात अचानक गैरसमज होईल. आरोप होईल. सामाजिक कार्यात तुमचे विचार पटण्यास वेळ लागेल. संयम ठेवा. प्रवासात सावध रहा. थट्टामस्करीवर तीक्र प्रतिक्रिया व्यक्त करू नका. कामं पूर्ण होतील.
शुभ दिनांक- १४, १५

वृश्चिक – संमिश्र घटनांचा काळ
क्षेत्र कोणतेही असो, संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. राजकीय क्षेत्रात एखादे प्रकरण अंगाशी येईल. सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जवळचे सरकारी व नेते तुमच्या अपरोक्ष कट करतील. ठरविलेला कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा. क्रीडा क्षेत्रात चमकाल.
शुभ दिनांक -१६, १७.

धनु – अडचणींचा सामना करा
जवळची माणसे दूर गेल्याने आपण अस्थिर होतो. राजकीय क्षेत्रात याचा अनुभव येईल. सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमचा प्रभाव कमी असल्याची भावना तुमच्या मनात येईल. प्रतिष्ठsवर घाला घालण्याचा प्रयत्न विरोधक व जवळचे लोक करण्याची शक्यता आहे. खरी माणसं ओळखा.
शुभ दिनांक – १३, १८.

मकर – कार्याची व्याप्ती वाढेल
आठवडय़ाच्या सुरुवातीला जास्त महत्त्वाची कामे करा. राजकीय क्षेत्रात विचारविनिमय चांगल्या पद्धतीने होईल. सामाजिक कार्याची व्याप्ती वाढेल. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून डावपेच बनवा. कुटुंबात गैरसमज होईल. क्रीडा क्षेत्रात चमकाल. जवळच्या मित्रांना जपावे लागेल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.
शुभ दिनांक – १६, १७.

कुंभ – चुका सुधारण्याची संधी
ज्या क्षेत्रात असाल तिथे महत्त्वाची कामे करा. चर्चा तुमच्या पद्धतीने होईल. राजकीय क्षेत्रात दर्जेदार लोकांच्या सहवासाने पूर्वी झालेल्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यात लोकांच्या मनापर्यंत जाण्याची तयारी ठेवा. दौऱयात यश मिळेल. विरोध मोडून काढू शकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक – १८, १९.

मीन – खरेदीचा योग
व्यवसायात तुमचा फंडा फारच प्रभावी ठरेल. भागीदार पैसा गुंतवण्यासाठी येतील. राजकीय क्षेत्रात तुमच्याबरोबर स्पर्धा करणारे असले तरी वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील. सामाजिक कार्याला दिशा देऊन योजना पूर्ण करा. प्रत्येक प्रयत्न यशदायी होईल. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक असेल.
शुभ दिनांक – १४, १५.

आपली प्रतिक्रिया द्या