भविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 ऑक्टोबर 2020

>> नीलिमा प्रधान

मेष – कठीण कामे मार्गी लागतील
मंगळ मीनेत वक्री, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. कठीण कामे मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु नम्रतेने या गोष्टी टाळा. बुद्धिचातुर्याचा वापर करा. नोकरीत तणाव निर्माण होईल. कला, साहित्यात नवे परिचय होतील.
शुभ दिनांक ः 4, 6

वृषभ – नोकरीत वर्चस्व राहील
सूर्य- चंद्र त्रिकोणयोग, मीनेत मंगळ वक्री होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, महत्त्वाची कामे उरकून टाका. व्यवसाय, नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. योजनांना गती द्या. कुटुंबात क्षुल्लक तणाव होईल. कला, साहित्यात नावलौकिक मिळेल.
शुभ दिनांक ः 8, 9

मिथुन- योजना पूर्ण करा
चंद्र-गुरू प्रतियुती, मीनेत मंगळ वक्री होत आहे. मागील येणे वसूल होईल. नोकरीत कामाचा व्याप असला तरी तुमचे महत्त्व टिकून राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना रेंगाळत ठेवू नका. लोकांचे सहकार्य लाभेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल.
शुभ दिनांक ः 4, 5

कर्क – कामाचे कौतुक होईल
सूर्य- चंद्र त्रिकोण योग, मीनेत मंगळ वक्री होत आहे. महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. व्यवसायात बोलणी यशस्वी होतील. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. महत्त्वाच्या मुद्दय़ावर केलेल्या चर्चेने वर्चस्व वाढेल.
शुभ दिनांक ः 4, 5

सिंह – अधिकारप्राप्ती लाभेल
चंद्र- गुरू त्रिकोणयोग, मीनेत मंगळ वक्री होत आहे. व्यवसायातील वाद, समस्या मिटवता येतील. नोकरीतील कामात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामामुळे लोकप्रियता वाढेल. प्रतिष्ठा व अधिकारप्राप्ती होईल. कोर्टकचेरीचे प्रश्न मार्गी लागतील.
शुभ दिनांक ः 4, 9

कन्या – विरोधक मैत्रीची भाषा करतील
चंद्र-बुध प्रतियुती, मीन राशीत मंगळ वक्री होत आहे. प्रवासात घाई नको. व्यवसायात जम बसेल. मागील वसुली पूर्ण करा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. कोर्टातील कामे मार्गी लागतील. स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधा.
शुभ दिनांक ः 6, 8
तूळ – प्रगतीची संधी लाभेल
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, मीन राशीत मंगळ वक्री होत आहे. कोणताही निर्णय घेताना प्रसंगावधान राखा. कायद्याचे उल्लंघन होऊ देऊ नका. नोकरीत संयम ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या ध्येयाचा विचार करा. कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. नवीन परिचय होतील.
शुभ दिनांक ः 4, 5
वृश्चिक -शब्दांचा वापर जपून करा
सूर्य- चंद्र त्रिकोणयोग, मीनेत मंगळ वक्री होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. शब्दांचा वापर सांभाळून करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी अनेकांची मदत होईल. मात्र विरोधाचा सामनाही करावा लागेल. महत्त्वाची कामे लवकर उरकून घ्या.
शुभ दिनांक ः 6, 7
धनु – योजनांना दिशा देता येईल
सूर्य- चंद्र त्रिकोणयोग, मीनेत मंगळ वक्री होत आहे. प्रवासात सावध रहा. व्यवसायाला नवे वळण मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना दिशा देता येईल. भेट घेऊन लोकांच्या समस्या सोडवा. चित्रपट, कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल.
शुभ दिनांक ः 9, 10

मकर – व्यवहारात दक्ष रहा
बुध- हर्षल प्रतियुती, मीनेत मंगळ वक्री होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. इतरांची चूक तुम्हाला निस्तरावी लागेल. नोकरी, व्यवसायात टिकून राहण्याचा प्रयत्न करा. व्यवहारात फसगत होऊ शकते. शिक्षणात मेहनतीची गरज आहे. प्रतिष्ठा लाभेल.
शुभ दिनांक ः 5, 6

कुंभ – कायद्याची कक्षा पाळा
चंद्र- शुक्र लाभयोग, मीन राशीत मंगळ वक्री होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, निर्णय घेताना कायद्याची कक्षा ओलांडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक ः 9, 10

मीन – रागावर ताबा ठेवा
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, स्वराशीत मंगळ वक्री होत आहे. व्यवसायात वाढ होईल. मात्र चर्चा करताना रागावर ताबा ठेवा. सौम्य शब्द वापरा. नवीन परिचयावर फार विश्वास ठेवू नका. नोकरीत कामाचे कौतुक होईल. वेळेला महत्त्व दिल्याने कठीण कामेही पूर्ण होतील.
शुभ दिनांक ः 5, 6

आपली प्रतिक्रिया द्या