भविष्य – रविवार ३ ते शनिवार ९ जून २०१८

85

>> नीलिमा प्रधान

मेष – तुमच्या मताला पसंती मिळेल
आठवडय़ाच्या सुरुवातीपासून महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. विज्ञान विकासाने आयुष्यमान वाढत असले तरी दुसरीकडे नवीन रोग निर्माण होतात व माणसांना जडतात. तेव्हा कोणत्याही विकासाला सीमारेषा असणे गरजेचे असते. व्यवसायात मोठे कंत्राट मिळेल. शुभ दि. ३,४

वृषभ – चांगल्या व्यक्तींशी परिचय
कुटुंबाच्या विकासासाठी सर्वांनाच तडजोड करावी लागते. जीवनसाथीबरोबर झालेला मोठा वाद कोर्टात जाऊ देऊ नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांची मर्जी सांभाळून तुमचे विचार मांडता येतील. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. दूरदृष्टिकोनातून विचार केल्यानंतरच मोठमोठय़ा विकासाचे दुष्परिणाम दिसतात. धंद्यात सुधारणा होईल. शुभ दि. ४,५

मिथुन – निर्णय घेताना सावध रहा
व्यवसायात मोठा फायदा दिसणारे कंत्राट समोरून येऊ शकते. आठवडय़ाच्या सुरुवातीला निर्णय चुकण्याची शक्यता आहे. प्रवासात वाहनापासून त्रास संभवतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या योजनेचा विकास मंदावणार आहे. वरिष्ठ तुमची बाजू घेण्याची टाळाटाळ करण्याची शक्यता आहे. कला-क्रीडा क्षेत्रात शत्रुत्व होईल. शुभ दि.६, ७

कर्क – वरिष्ठांची मर्जी राखाल
तुमची कार्यतत्परता पाहून वरिष्ठ नोकरीत खूश होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमची सरशी होईल. मैत्रीत तणाव होईल. शत्रू मैत्रीची भाषा करतील तर मित्र दूर जातील. कुटुंबात जबाबदारीने कामे करावी लागतील. कौटुंबिक वाटाघाटीचा तुमचा प्रश्न विचारात घेतील. क्रीडा क्षेत्रात अव्वल राहाल. शुभ दि. ८, ९

सिंह – जबाबदारी वाढेल
संमिश्र स्वरूपाच्या घटना सर्वच ठिकाणी घडतील. नोकरीत वर्चस्व असल्याने जबाबदारी वाढेल. कुटुंबात जवळच्या व्यक्तीविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा विकास पाहून विरोधक भलतीच भाषा करतील. तुमची प्रतिष्ठा कायम राहील. शुभ दि. ५,६

कन्या – व्यवसायाला दिशा मिळेल
तुमच्यावर झालेले आरोप मनस्ताप देणारे असले तरी त्याची उत्तरे तुमच्याकडे असतील. म्हणूनच राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रभाव राहील. तुमची शारीरिक व बौद्धिक चपळता सर्वांच्या नजरेत भरेल. कला-क्रीडा क्षेत्रांत तुमच्या विकासाचा मार्ग खुला होईल. व्यवसायाला दिशा मिळेल. थोरामोठय़ांची गुंतवणूकही मिळेल. शुभ दि. ३,४

तूळ – मनोबल राखा
राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तारेवरची कसरत करून विकासाची पूर्वनियोजित योजना पूर्ण करावी लागेल. वरिष्ठांचा दबाव राहील. तुमचा स्पष्टवक्तेपणा इतरांना त्रासदायक वाटू शकतो. हाती घेतलेल्या कामात तुम्ही ठरविल्याप्रमाणे यश मिळेल याची शक्यता कमीच आहे. कुटुंबात तुमचे विचार पटणे अशक्य होईल. शुभ दि. ५,६

वृश्चिक – प्रगतीची संधी मिळेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विकासाचा मार्ग निवडताना लोकांची नाराजी व त्यांच्या खऱया गरजा यांचाही विचार होण्याची आवश्यकता असते. याच आठवडय़ात महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रांत संघर्षाने यश मिळेल.  शुभ दि. ८, ९

धनु – प्रलोभनापासून दूर रहा
विकासाचा आभास निर्माण करून विकास होत नाही. म्हणून राजकीय-सामाजिक क्षेत्रांत काम करताना तुम्ही सावधपणे निर्णय घ्या. टीका व आरोप सहन करावा लागेल. व्यवसायात उतावळेपणा नको. प्रलोभनाने नुकसान होऊ शकते. नोकरीत वरिष्ठांचे मत विचारात घ्या. घाईने निर्णय घेऊ नका. तणाव व वादाचे प्रसंग येतील. शुभ दि. ४,५

मकर – प्रतिष्ठा वाढेल
राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विकासाचा आराखडा तयार करताना कोणाच्या आयुष्यावर ओरखडा ओढला जाणार नाही याची मात्र काळजी घ्या. जवळच्या नाराज लाकांना तुमचा मुद्दा पटवून देता येईल. प्रभाव, व प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वासाचा पुरेपूर उपयोग करून व्यवसाय, नोकरी व तुमचे आवडते क्षेत्र यात प्रगती करून घेता येईल. साहित्याला चालना मिळेल. शुभ दि. ५,६

कुंभ – अडचणींवर मात कराल
व्यवसायात अडचणी येतील. प्रवासात वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. कला-क्रीडा क्षेत्रांत घेतलेल्या श्रमाला पाहिजे तेवढे फळ मिळणे कठीणच कौटुंबिक वाटाघाटीत तुमची जबाबदारी वाढेल. तात्पुरत्या स्वरूपाच्या अडचणींवर जिद्दीने मात करू शकाल. शुभ दि. ८,९

मीन – महत्त्वाचा निर्णय घ्याल
तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर अडचणी वाढतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचा निर्णय घेता येईल. सामाजिक बांधिलकीची जाणीव तुम्हाला आहे. व्यवसायात जम बसेल. नवी गुंतवणूक होईल. नोकरी लागेल. परीक्षेत यश मिळेल. कला-क्रीडा-साहित्यात नावलौकिक व पैसा मिळेल. नवे मित्र मिळतील. शुभ दि. – ३,४

आपली प्रतिक्रिया द्या