साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 6 सप्टेंबर ते शनिवार 12 सप्टेंबर 2020

> >  नीलिमा प्रधान

मेष

शब्द देताना काळजी घ्या

सूर्य गुरु त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करा. व्यवसायात वाढ होईल. मात्र कोणताही शब्द देताना काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. तुमच्या विरोधातील व्यक्ती अडचणीत येईल. अनाठायी खर्च होईल.

शुभ दिनांक : 8, 10

 

वृषभ

नवीन परिचय होतील

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. रागावर ताबा ठेवा. वाद उद्भवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाषणाचा प्रभाव परिणामकारक ठरेल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. नवीन परिचय होतील. कुटुंबातील समस्या कमी होतील. कला साहित्यात प्रगती होईल.

शुभ दिनांक : 10, 11

 

मिथुन

प्रगतीचा मार्ग आखा

सूर्य, गुरु त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो तुमचा प्रगतीचा मार्ग सर्वशक्तीनिशी तयार करा. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बुद्धिमतेचे योग्य प्रदर्शन करता येईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. साहित्यक्षेत्रात विचारांना चालना मिळेल.

शुभ दिनांक : 6, 7

 

कर्क

कायदा मोडू नका

चंद्र, बुध त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. व्यवसायात काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या मुद्यांना प्रसिद्धी मिळेल. मात्र गुप्त कारवायांना कमी लेखू नका. कायदा न मोडता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा.

शुभ दिनांक : 7, 8

 

सिंह

चौफेर प्रगतीची संधी

सूर्य, गुरु त्रिकोणयोग, चंद्र बुध केंद्रयोग होत आहे. महत्त्वाची कामे, किचकट समस्या लवकर संपवा. चौफेर प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रत्येक दिवस नवा मार्ग दाखकेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या ध्येयाकर लक्ष केंद्रित करा. अधिकाराचा योग्य वापर करा.यश मिळेल.

शुभ दिनांक : 7, 8

 

कन्या

विचार करून कृती करा

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, बुध हर्षल षडाष्टक योग होत आहे. तुमच्या बुद्धीचा, शक्तीचा वापर करून घेतला जाईल. वादाच्या प्रसंगात तुम्हाला खेचले जाईल.राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा वापर केला जाईल. तेव्हा विचार करून कृती करा. नोकरीत वरिष्ठांना विरोध नको.

शुभ दिनांक : 9, 10

 

तूळ

रागावर नियंत्रण ठेवा

सूर्य, गुरु त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. महत्त्वाचा निर्णय घ्या. योजनांना पूर्ण करण्याची तयारी ठेवा. रागावर नियंत्रण ठेऊन कृती करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नका विचार कराल. व्यावहारिक बोलणे सावधपणे करा. कलासाहित्य क्षेत्रात प्रगतीची संधी सोडू नका.

शुभ दिनांक :  6, 7

 

वृश्चिक

प्रसंगावधान ठेवा

चंद्र, बुध त्रिकोणयोग, सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. विरोधकांना शह देताना कायद्याचे भान ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या योजनेला शह देण्याचा प्रयत्न होईल. व्यवसायात जम बसण्यासाठी मेहनत घ्या. जिद्दीनेच यश मिळेल. चित्रपट, साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

शुभ दिनांक : 9, 10

 

धनु

वरिष्ठांचा वरदहस्त लाभेल

चंद्र, बुध त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. कोणत्याही प्रतिष्ठत कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा वरदहस्त लाभेल. सहकाऱयांना कमी लेखू नका. नोकरीत वर्चस्व  काढेल. कुटुंबात गैरसमज उद्भवतील. नवीन परिचयावर भाळू नका.

शुभ दिनांक : 6, 7

 

मकर

प्रगतीचा मार्ग लाभेल

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. चातुर्याचे बोल प्रगतीचा मार्ग दाखवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यक्तीचा खरा चेहरा ओळखा. कायद्याच्या जाळ्यात अडवू नका. प्रवासात धोका पत्करू नका. साहित्यात विशेष कामगिरी कराल.

शुभ दिनांक : 8, 9

 

कुंभ

शब्द जपून वापरा

सूर्य, गुरु त्रिकोणयोग, बुध, हर्षल षडाष्टक योग होत आहे. मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न होईल. शब्द जपून वापरत तुमचे मुद्दे मांडा. इतरांच्या चुका तुम्हास त्रासदायक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. साडेसाती सुरु आहे. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : 6, 7

 

मीन

उतावळेपणा दूर ठेवा

चंद्र, गुरु त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. कोणतीही समस्या सोडवताना उतावळेपणा नको. अधिकारी थाट बाजूला ठेऊन नम्रता बाळगा. व्यवसायात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात वरिष्ठांचे कान भरले जातील. साहित्य क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील.

शुभ दिनांक : 8, 9

आपली प्रतिक्रिया द्या