आठवड्याचे भविष्य २९ जुलै ते ४ ऑगस्ट

189

>> नीलिमा प्रधान

मेष – मनाप्रमाणे घडणे कठीण
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, मंगळ-हर्षल केंद्रयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमचे डावपेच प्रभावी व वेगळेच असतात हे सर्वांना मान्य असले तरीही तुमच्या मनाप्रमाणे घडणे कठीण आहे. सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होईल. मानसिक स्थैर्य मात्र कायम राहील. शुभ दिनांक – २९, ३०.

वृषभ -परिस्थितीचा सामना करा
वृषभेच्या पंचमेषात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात फार मोठी उडी घेणे कठीण असले तरी धंदा चालू ठेवणे शक्य होईल. राजकीय क्षेत्रात सर्वांना धरून राहा. चांगली संधी मिळेल. प्रगतीचे शिखर गाठता येईल हा विचार न करता आहे त्या परिस्थितीचा सामना करा. शुभ दिनांक – ३१, १.

मिथुन – नोकरी बदलण्याची संधी
मिथुनेच्या सुखस्थानात शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्या प्रतिष्ठsचे पारडे जड राहील. अधिकार मिळेल. व्यवसायात मोठी उलाढाल होईल. शेअर्समध्ये लाभ मिळेल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. वाहन, घर, दुकान इत्यादी खरेदी होऊ शकेल. शुभ दिनांक – ३०, ३१.

कर्क- लोकांचे सहकार्य मिळेल
कर्केच्या पराक्रमात शुक्र प्रवेश, चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. तणाव होईल. दुखापत होऊ शकते. राजकीय क्षेत्रात तुमच्या मुद्यांना प्रसिद्धी मिळेल. आक्रमकता कौतुकास्पद ठरेल. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम व सहकार्य भरभरून मिळेल. शुभ दिनांक – १, २.

सिंह – खंबीर राहा!
सिंहेच्या धनस्थानात शुक्र प्रवेश, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात दुसऱयांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी सर्व शक्ती खर्च होईल. प्रवासात प्रकृतीची काळजी घ्या. गुप्तशत्रू चेकाळतील. प्रश्न जास्त चिघळणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायात फसगत करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक – ३०, ३१

कन्या- व्यसनात वेळ घालवू नका
स्वराशीत शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न होईल. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसनात वेळ फुकट घालवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात वर्चस्व दिसेल. स्पर्धा मात्र कसोटीची व कौतुकाची ठरेल. परदेशात जाण्याची संधी येईल. शुभ दिनांक – १, २.

तूळ – मैत्रीत दुरावा येईल
तुळेच्या व्ययस्थानात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात फायदा झाला तरी घरातील खर्च वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढत असलेले पाहून जवळचे लोक मनातून वैर धरतील. वरिष्ठ तुमचे कौतुक करून मोठी कामगिरी तुमच्याकडे देतील. मैत्रीत दुरावा येईल. शुभ दिनांक – ३०, ३१.

वृश्चिक- वेळेला महत्त्व द्या!
वृश्चिकेच्या एकादशात शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात आठवडय़ाच्या शेवटी फार मोठा तणाव होईल. तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती पारखून घ्या. व्यवसायात तुमचा अंदाज बरोबर येईल. वेळेला महत्त्व द्या. म्हणजे कामाचा व्याप सांभाळता येईल. शुभ दिनांक – २९, १.

धनु – आरोप होऊ शकतो
धनुच्या दशमस्थानात शुक्र प्रवेश चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. तुमचे मानसिक सामर्थ्यच तुमचे खरे शास्त्र असेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या मुद्यांना फारसे महत्त्व दिले जाणार नाही. स्पष्ट बोलणे प्रभावी ठरले तरी विपरित अर्थ लावला जाईल. तुमचे वागणे अतिरेकीपणाचे असल्याचा आरोप होऊ शकतो. शुभ दिनांक – ३, ४.

मकर – दिल से जितो!
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. प्रत्येक दिवशी तुमच्या कामात मोठे यश मिळेल. साडेसाती सुरू असली तरी राजकीय क्षेत्रात जोरात कामास लागा. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्याला जनता चांगला प्रतिसाद देईल. दिलसे जितो. कुटुंबातील चिंता कमी होईल. कोर्टकेस संपण्याचे चिन्ह दिसेल. शुभ दिनांक – १, २.

कुंभ – दगदग जास्त होईल
चंद्र-गुरू त्रिकोणयोग, मंगळ-हर्षल केंद्रयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात दगदग जास्त होईल. वरिष्ठ तुमच्याकडे मोठी जबाबदारी देतील. मानसिक, शारीरिक त्रास होऊ शकतो. सामाजिक कार्यात मतभेद होतील. कुटुंबात तुमचे विचार पटणे कठीण आहे. दुखापत संभवते. वेगळय़ा अनुचित वाटेने जाऊ नका. शुभ दिनांक – २, ३.

मीन – लोकांचे प्रेम वाढेल
मीनेच्या सप्तमेषात शुक्र प्रवेश, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. बुधवारपासून तुमच्या कार्याला गती मिळेल. राजकीय क्षेत्रात घेतलेले श्रम सत्कारणी लागतील. सामाजिक कार्यात लोकांचे प्रेम व विश्वास तुमच्या प्रति वाढेल. अधिकारप्राप्तीसाठी वाट पाहावी लागेल. धंद्यात वेगाने प्रगती होईल. शुभ दिनांक – ३, ४.

आपली प्रतिक्रिया द्या