साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 8 ते शनिवार 14 मार्च 2020

6833

>> नीलिमा प्रधान

मेष – बुद्धिचातुर्य वापरा
मेषेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत तुमचे बस्तान अस्थिर करण्याचा प्रयत्न होईल. बुद्धिचातुर्यच वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुने आरोप, जुन्या चुका तुमच्यावर टाकल्या जातील. लोकप्रियता वाढेल. अडचणीतून मार्ग शोधता येईल.
शुभ दिनांक – 8, 12

वृषभ – जिद्दीने यश मिळवाल
चंद्र-बुध प्रतियुती, वृषभेच्या एकादशात सूर्य राश्यांतर होत आहे. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. जवळचे लोक तुमच्याच पैशांवर मजा करून तुमच्या नावाने शिमगा करतील. खर्च वाढेल. व्यवसाय, नोकरीत तुमची जिद्द यश देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनस्ताप होईल. नवीन ओळख होईल.
शुभ दिनांक – 8, 11

मिथुन – प्रसंगावधान राखा
मिथुनेच्या दशमेषात सूर्य राश्यांतर, सूर्य-गुरू लाभयोग होत आहे. विरोधकांच्या टिकेची होळी करून आत्मविश्वासाने कार्य सिद्ध करा. प्रसंगावधान ठेवा. आर्थिक येणे वसूल करा. नोकरीत वर्चस्व ठेवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहित केल्याचे कौतुक होईल. योजनाबद्ध कार्य करा.
शुभ दिनांक – 8, 12

कर्क – प्रगतीची संधी मिळेल
कर्केच्या भाग्येषात सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. आप्तेष्टांची मदत मिळेल. व्यवसाय, नोकरीत समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. परिचयाचा उपयोग करून घ्या. संयम ठेवा. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रक्षोभक वाक्ये बोलण्याचे टाळा. प्रतिष्ठेचा अहंकार दाखवू नका.
शुभ दिनांक – 10, 14

सिंह – आत्मविश्वास वाढेल
शुक्र-हर्षल युती, सिंहेच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर होत आहे. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज लोकांच्या भेटी घेता येतील. लोकप्रियता मिळेल. वर्चस्व वाढेल.
शुभ दिनांक – 10, 12

कन्या – रागावर नियंत्रण ठेवा
कन्येच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल युती होत आहे. व्यवसायातील चर्चा पुढे करा. नोकरीत वरिष्ठांंचा दबाव मनस्ताप देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या प्रकल्पाला विरोध होईल. तुमचा राग वाढेल. त्यावर नियंत्रण ठेवा. सहनशीलता ठेवा. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. शुभ दिनांक – 13, 14

तूळ – मोठे कंत्राट मिळेल
तुळेच्या षष्ठेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. व्यवसायात मोठे कंत्राट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. चर्चा सफल होईल. नोकरीत महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करा. धूलिवंदनाच्या दिवशी थट्टामस्करीत ताळतंत्र सोडू नका. राजकीय क्षेत्रात दौऱयात लोकांच्या भेटी घेण्यात यश मिळेल.
शुभ दिनांक – 8, 12

वृश्चिक – कामात अडथळा येईल
वृश्चिकेच्या पंचमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. इतरांना मदत करण्यामुळे तुमच्या कामात अडथळा येईल. मैत्रीत गैरसमज होऊ शकतो. नोकरीत निष्कारण वाद होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळचे लोकांच्या चुकांचा तुम्हाला मनस्ताप होईल.
शुभ दिनांक – 8, 14

धनु – व्यवसायात प्रगती होईल
शुक्र-हर्षल युती, धनुच्या सुखेशात सूर्य राश्यांतर होत आहे. तुमच्या मागे लागलेली सर्व शुक्लकाष्ठs होळीच्या आगीत भस्म होतील. नव्या दमाने, उत्साहाने मागे पडलेली कामे करा. व्यवसायात प्रगती होईल. परिचयातून मोठे काम मिळेल. कुटुंबातील प्रश्न सोडवा. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल.
शुभ दिनांक – 8, 11

मकर – वर्चस्व वाढेल
मकरेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. होळीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय, नोकरीत प्रयत्नांच्या जोरावर प्रगती कराल. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मानप्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नामवंत लोकांचा सहवास मिळेल.
शुभ दिनांक – 11, 12

कुंभ – कलाटणी देणारी घटना घडेल
कुंभेच्या धनेषात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल युती होत आहे. व्यवसायात कलाटणी देणारी घटना घडेल. फायदेशीर योजना समोरून येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. नव्या कामासाठी तुमची शिफारस होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व सिद्ध कराल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळेल. शुभ दिनांक – 8, 12

मीन – घाईत निर्णय नको
स्वराशीत सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल युती होत आहे. होळी, धूलिवंदन या दिवशी तणाव होईल. व्यवसाय, नोकरीत घाईत निर्णय घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यात खंड पडू देऊ नका. लोकांच्या अडचणी समजून घ्या. तुम्हाला स्वतःच्या प्रगतीचा मार्ग मिळेल. नाटय़, क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील.
शुभ दिनांक – 11, 14

आपली प्रतिक्रिया द्या