साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 08 ऑक्टोबर ते शनिवार 14 ऑक्टोबर 2023

>> नीलिमा प्रधान

 

मेष – शब्द जपून वापरा

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो कायदा पाळा. प्रतिष्ठा जपा. गुप्त कारवायांचा सुळसुळाट होईल. नोकरीत जपून बोला. चूक टाळा. धंद्यात पैसा, शब्द जपून वापरा. भावना व कर्तव्याचा मेळ घाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला सर्व बाजूंनी कमकुवत ठरवण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक : 10, 11

वृषभ – विचारांना चालना मिळेल

सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि प्रतियुती. विचारांना चालना देणारी घटना घडेल. नवीन परिचय नीट जाणून व्यवहार करा. नोकरी, धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे वरिष्ठांना पटतील. अधिकारप्राप्तीचे आश्वासन मिळेल. कौटुंबिक कामे होतील. शुभ दिनांक : 8, 9

मिथुन – कठीण कामे कराल

शुक्र, शनि प्रतियुती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. किचकट कामे करून घ्या. नम्रतेने यश मिळेल. नोकरीत कठीण कामे कराल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या शब्दाला, मताला किंमत मिळेल. वरिष्ठांना तुमची बाजू समजावा. मित्र मदत करतील. सल्लागारांना  सन्मानाने वागवा. शुभ दिनांक : 8, 9

कर्क – रागावर ताबा ठेवा

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, शुक्र युती. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. किचकट कामे रेंगाळत ठेऊ नका. कायद्यासंबंधी योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्या. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल. कौटुंबिक दुरावा दूर करा. धंद्यात मोठा लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. रागावर ताबा ठेवा. शुभ दिनांक : 10, 11

सिंह – फसगत टाळा

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, शनि प्रतियुती. आत्मविश्वास व कल्पकता वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेताना फसगत टाळा. नोकरीत वर्चस्व वाढेल. बदल शक्य. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळवा. थकबाकी मिळवा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे परिचय होतील. शुभ दिनांक : 10, 11

कन्या – गुंतवणुकीची घाई नको

शुक्र, शनि युती, बुध, गुरू षडाष्टक योग. तुमच्याकडून एखादे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल. मोह टाळा. भावनेच्या भरात कोणतीही चूक करू नका. नोकरीत कर्तृत्व लाभेल. धंद्यात गुंतवणुकीची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मित्र व शत्रू ओळखणे कठीण. नवीन परिचय धोकादायक. शुभ दिनांक : 8, 9

तूळ – उतावळेपणा दूर ठेवा

चंद्र, शुक्र युती, बुध, गुरू षडाष्टक योग. कोणताही निर्णय घेताना उतावळेपणा नको. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणालाही वचन देण्याची चूक करू नका. अहंकार नुकसानकारक ठरेल. कठीण कामात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील वातावरण म्हणजे तारेवरची कसरत ठरेल. शुभ दिनांक : 8, 9

वृश्चिक – योजनांना गती मिळेल

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध युती. गुप्त कारवायांना रोखता येईल. दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रवासात कोणताही धोका स्वीकारू नका. नोकरी, धंद्यात थकबाकी वसूल करा. कठीण कामे वेळेत पूर्ण करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती देता येईल. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. शुभ दिनांक : 8, 9

धनु – स्पर्धेत प्रगती होईल 

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला दडपण येईल. नवीन परिचय फायद्याचा ठरेल. नोकरी, धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी मिळवा. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. कामाचे कौतुक होईल. स्पर्धेत प्रगती होईल. शुभ दिनांक : 10, 11

मकर – अनाठायी खर्च होईल

सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ, शनि त्रिकोणयोग. रागावर नियंत्रण ठेवा. मोह, व्यसन टाळा. नोकरी, धंद्यात प्रगती होईल. अनाठायी खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. कार्याचा विस्तार करण्याकडे लक्ष द्या. स्पर्धा करणारे लोक वाढतील. महत्त्वाच्या वस्तू जपा. स्पर्धेत जिद्द ठेवा. शुभ दिनांक : 8, 9

कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या

चंद्र, शुक्र युती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. अडचणींवर मात करून ध्येय गाठा. प्रकृतीची काळजी घ्या. कठोर वक्तव्य टाळा. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात उतावळेपणा नको. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिशयोक्ती नको. तुमच्यावर आरोप होतील. वरिष्ठांची नाराजी होईल. शुभ दिनांक : 10, 11

मीन – मौल्यवान वस्तू जपा

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, बुध युती. बुद्धिचातुर्याने कोणतीही समस्या सोडवता येईल. मैत्रीचा गैरफायदा घेणारे लोक ओळखा. मौल्यवान वस्तू जपा. प्रवासात धोका पत्करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिस्पर्धी गुप्त कारवाया करतील. तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. कुणालाही गृहीत धरू नका. यश मिळेल. शुभ दिनांक : 8, 9