राशी आणि फॅशन – 25 ते 31 जानेवारी 2020

3915

>> मानसी इनामदार

मेष
आशीर्वाद लाभेल
नवी स्वप्ने, नव्या आकांक्षा यांचा आठवडा असेल. फक्त या स्वप्नांना मेहनतीची जोड देण्यात कसूर नको. सदाचारी आध्यात्मिक व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. त्यामुळे मनःशांती मिळेल. एखादा महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात घ्याल. त्यावेळी लाल रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – हळदीकुंकू, सोन्याचा अलंकार

वृषभ
महत्त्व वाढेल
भूतकाळात रममाण व्हाल. लहान भावंडांचे मार्गदर्शक ठराल. त्यांना योग्य सल्ला द्या. त्यामुळे घरात तुमचे महत्त्व वाढेल. व्यवसाय-उद्योगात महत्त्वाचे आर्थिक करार कराल. भगवा रंग जवळ बाळगा. त्यामुळे कार्ये निर्विघ्न पार पडतील.
शुभ परिधान – काचेची बांगडी, गॉगल

मिथून
विश्रांती महत्त्वाची
अतिश्रमाचा ताण या आठवडय़ात जाणवेल. शक्यतो विश्रांती घ्या. त्यामुळे मन आणि मेंदू दोन्ही ताजेतवाने होतील. उधार- उसनवारी टाळा. खासगी आयुष्यात इतरांचे हस्तक्षेप टाळा. त्यामुळे मन आनंदी होईल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नथ, गुलाब

कर्क
सात्त्विक व्हाल
स्पर्धेत यश मिळेल. यामध्ये घरातील ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. परक्या व्यक्तीवर विश्वास दाखवू नका. घरात एखादी पूजा पार पडेल. त्यामुळे वृत्ती सात्त्विक होतील. मोतिया रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – खादीचा कुर्ता, अत्तर

सिंह
कौतुक होईल
आनंदी वातावरण तुमच्या मनात असेल. त्यामुळे मन उत्साही आणि प्रसन्न असेल. एखादी नवी व्यक्ती जीवनात प्रवेशकर्ती होईल. तुमचे प्रेम तुम्हाला मिळेल. शिवगौरीची उपासना करा. पिवळा रंग जवळ बाळगा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
शुभ परिधान – शिंपल्याचे दागिने, रेशमी वस्त्र

कन्या
दूरगामी फायदा
अनपेक्षित प्रवास घडेल. ताणतणावावर मात देणारे शांत संगीत ऐका. आर्थिक लाभ होईल. आलेले पैसे योग्य जागी गुंतवा. त्यातून दूरगामी फायदा होईल. उगाच अस्वस्थ वाटेल. घरातील लहानांमुळे आठवडा मजेत जाईल. तुळशीचा हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – काळी साडी, मोती

तूळ
वरिष्ठांची मर्जी
कामाच्या ठिकाणी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर कराल. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन वरिष्ठ खूश होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे एक वेगळेच समाधान लाभेल. संतुलित आहार आणि व्यायाम यात सातत्य ठेवा. मोरपिशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – डिझायनर दागिने, शाल

वृश्चिक
सुवार्ता मिळेल
कलात्मक कामात स्वतःला गुंतवा. त्यातून आनंद प्राप्त होईल. दूरचा प्रवास घडेल. त्यातून निसर्गाच्या जवळ जाल. एक वेगळी अनुभूती मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यावर होईल. सुवार्ता कानावर येतील. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुगंध, फिक्या रंगाचे कपडे

धनु
सोहळा घडेल
भरपूर आर्थिक लाभ. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहील. समाज माध्यमांचा अति वापर टाळा. मित्रमंडळीत रमाल. एखादा सोहळा साजरा कराल. आप्तस्वकीय भेटतील. खेळाडूंची प्रगती होईल. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – इस्त्रीचे कपडे, चष्मा

मकर
प्रेम, सद्भावना
हाती अचानक पैसे येतील. खर्च कसे करावे हे कळणार नाही, पण ते जपून वापरा. अनाठायी खर्च टाळा. घरातील लहान चुकीच्या संगतीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवा. कौटुंबिक प्रेम आणि सद्भावना लाभतील. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सोन्याचे कडे, शर्ट

कुंभ
प्रकृती उत्तम
आपले काम आणि प्राथमिकता यावर लक्ष केंद्रित करा. पैशाच्या उधळपट्टीला आवर घाला. नव्या योजना हाती घेण्याआधी नियोजन करा. प्रकृती उत्तम राहील. आरामाची गरज आहे. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. लाल रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – ब्लेझर, मफलर

मीन
सकारात्मक विचार
येणारा काळ खूप चांगला आहे. आनंदी रहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. त्यामुळे बऱयाच समस्यांचे निराकरण होईल. कामात झोकून द्याल. ध्येयापासून विचलित होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुगंधी फुले, हिरा

आपली प्रतिक्रिया द्या