साप्ताहिक राशिभविष्य- उत्तम काल

2946

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
सर्जनशील व्हा
बराच काळ अडकलेली कामे या आठवडय़ात मार्गी लागतील. लेखन वाचनात विशेष रुची निर्माण होईल. हातून चांगले लिखाणही घडेल. महिलावर्गाने स्वयंपाकघरात वावरताना सावध असावे. लाल रंग जवळ बाळगा. दररोज गणपती स्तोत्र म्हणा.
शुभ परिधान – सोन्याचा अलंकार, लाल वस्त्र.

वृषभ
आर्थिक घडामोड
हितशत्रूंपासून सावध राहा. विशेषतः ओळखीच्या व्यक्तीवर कामाबाबत फार विश्वास दाखवू नका. मोठय़ा आर्थिक उलाढाली या आठवडय़ात होतील. त्यावेळेस आकाशी रंग परिधान करा. यश मिळेल. मानसिक संतुलन राखा. शिवकवच स्तोत्र वाचा.
शुभ परिधान – चांदीचा दागिना, कुंकू .

मिथुन
स्वागतशील आठवडा
पाहुण्या रावळ्यांची ये-जा राहील. त्यामुळे संपूर्ण आठवडा गृहिणींसाठी अत्यंत व्यस्त पण आनंददायी ठरणार आहे. कारण आवडती माणसे घरी येतील. त्यातून घरातील उद्योग धंद्यास फायदा होईल. उन्हात जास्त फिरणे सगळ्यांनीच टाळा. अबोली रंग लाभदायी.
शुभ परिधान – लखनवी कुर्ता, ओढणी.

कर्क
गाडी घ्या
वाहन खरेदीचा योग आहे. चारचाकी गाडी घरी येईल. पांढरा रंग जवळ बाळगा. भावंडांच्या भेटीगाठींचा योग आहे. एकंदरीत घरात आनंदाचे वातावरण राहील. शिव उपासना करा. पित्ताचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
शुभ परिधान – अबोलीचा गजरा, खादीचा कुर्ता.

सिंह
सोन्याचे दिवस
जोडीदाराचे मन सांभाळा. थोडेफार वादविवाद संभवतात. पण ते तेवढय़ापुरतेच. नव्या योजना आकार घेतील. दूरगामी गुंतवणूक कराल. सोनेरी रंग जवळ बाळगा. शकुनाचे म्हणून सोन्याचे नाणे खरेदी करून देवघरात ठेवा. मानसिक संतुलन सांभाळा.
शुभ परिधान – मंगळसूत्र, केसांचा क्लीप.

कन्या
उत्तम फळ
जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. वेळ मजेत जाईल. त्वचेची काळजी घ्या. सकारात्मक विचार मनात ठेवा. त्याचे चांगले फळ मिळेल. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – जॉर्जेटची साडी, पाचूचा खडा.

तूळ
कार्यमग्न राहाल
आळस झटकून कामाला लागा. तुमच्या घराला तुमच्या कार्यतत्परतेची गरज आहे. मित्र-मैत्रिणींची यामध्ये तुम्हाला मदत होईल. कामाच्या ठिकाणी छोटी कासवाची प्रतिकृती ठेवा. पैशांची आवक वाढेल. गडद हिरवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – डिझायनर घडय़ाळ, ओढणी.

वृश्चिक
स्वप्नं पाहा
विचारपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा. त्याचा अनुकूल परिणाम तुमच्या तब्येतीवर होईल. ध्यानधारणा करा. त्यामुळे हुरूप येईल. चांगली स्वप्ने पाहाल. त्यावर कृती करा. खूप फायदा होईल. व्यायामात सातत्य ठेवा. भगवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – अत्तर, मोती.

धनु
सहलीला चला
दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त बाहेर जाल. नवी ठिकाणे पाहता येतील. आवडते काम करण्याची संधी मिळेल. मोरपिशी रंग जवळ बाळगा. इष्ट देवतेचे स्मरण करा. अनपेक्षित संकटे टळतील. पायांची काळजी घ्या.
शुभ परिधान –डेनिम, आधुनिक कपडे.

मकर
चांगली संधी
कामातील बदल सुखावणारे असतील. नव्या कामात मन रमेल. प्रवासाचा योग आहे. त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरील खाणे टाळा. खासगी क्षेत्रात उत्तम संधी प्राप्त होईल. पिवळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – चमकदार रंग, फॅन्सी दागिने.

कुंभ
गप्पांचे फड
काहीतरी नवे करावेसे वाटेल. पण कामाचा प्रचंड ताण असेल. मित्र-मैत्रीणींत मन रमेल. गप्पांचे फड रंगतील. कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. छोटासा सोहोळा साजरा कराल. उत्सवमूर्ती तुम्ही असाल. केशरी रंग लाभदायी.
शुभ परिधान – ब्लेझर, रेशमी साडी.

मीन
भरभराटीचे दिवस
वेळेचा सदुपयोग करा. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल. कामात चोख असता. तसेच राहा. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढा. मानस विरंगुळा मिळेल. आत्मबल कणखर ठेवा. येणारे दिवस भरभराटीचे असतील. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – घड्याळ, सुगंध.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या