साप्ताहिक राशिभविष्य 01 जून ते 7 जून 2019

>>मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – बदली, पगारवाढ
नोकरीत बदली आणि पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी जुळवून घ्या. वादाचे प्रसंग टाळा. नवविवाहितांना संततीयोग आहे. शिव पार्वतीची उपासना करा. नाते सुदृढ होईल. देवीला झेंडूचे फुल आणि पिंडीवर बिल्वदल वाहा. आकाशी रंग फलदायी.
शुभ परिधान – टोप पदरी साडी, बाजूबंद

वृषभ – गुंतवणूक फायदेशीर
घरात आनंदाचे वातावरण टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. व्यक्तिगत आयुष्यात काही मोहाचे क्षण येतील. व्यवसायात यश मिळेल. नवी धंद्यात पैसे गुंतवा. घरातील बाळकृष्णाला तुळस वाहा. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुती कापड, झुमके

मिथुन – नव्याची चाहूल
तुमच्या राशीत जोडीचे फार महत्व आहे. प्रेम खुलेल. नवीन माणूस आयुष्यात येईल. विवाहितांचे संबंध खुलतील. मनोकामना पूर्ण होतील. शक्यतो एकमेकांसाठी काहीतरी मागा. सिंदुरी रंग जवळ ठेवा. विवाह योग प्रबळ आहे.
शुभ परिधान – जोडीदाराच्या आवडीचे कपडे

कर्क – निव्यार्जन करा
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. एखादी नवीन विद्या शिकण्यास सुरुवात करण्यास हा योग्य कालखंड आहे. या निवडलेल्या नवीन विद्येत तुम्ही उच्च पदास पोहोचाल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. जांभळा रंग फलदायी.
शुभ परिधान – अत्तर, चंदन

सिंह – छोटय़ांच्या सहवासात
घरातील लहानांचे लाड करा. त्यांचा सहवास तुम्हाला या आठवडयात मिळणार आहे. त्यांना नवे वस्त्र घेऊन द्या. शक्यतो लाल रंगाचे. घरात थोडयाफार कुरबुरी होतील. त्याकडे दुर्लक्ष करा. दुधाचा नैवेद्य शंकराला दाखवा.
शुभ परिधान – टोपी, फेटा

कन्या – शुभ संधी
वास्तुखरेदीचे योग आहेत. चांगल्या संधी चालत येतील. व्यवहार करा. शुभ ठरतील. तब्येतीची काळजी घ्या. ज्येष्ठांनी जास्त चालणे टाळावे. नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. कामावर लक्ष केंद्रित करा.. नीळा रंग परिधान करा.
शुभ परिधान – लेखणी, आधुनिक फोन

तूळ – भरभराट होईल
घरात आनंदाचे वातावरण राहील. सोने खरेदी होईल. नृसिंह लक्ष्मीचे पूजन करा. शक्य झाल्यास प्रतिमा देवघरात ठेवा. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. दही साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवा. व्यक्तिगत पातळीवरही उत्कर्ष होईल. राखाडी रंग फलदायी.
शुभ परिधान – राखाडी मोती, खादी

वृश्चिक – आनंदाचा आस्वाद
शक्य झाल्यास विनायकीचा उपवास करा. जवळच्या गणेश मंदिरात जाऊन या. घरात वातावरण चांगले राहील. जवळचा एखादा प्रवास घडेल. आनंददायी अनुभव येतील. पिवळा रंग लाभदायी. घरातील लहानांची काळजी घ्या.
शुभ परिधान – सोनेरी घडयाळ, अंगठी

धनु – खरेदीचा योग
वाहन खरेदीचे योग संभवतात. दुचाकी खरेदी कराल. योग चांगला आहे. घरातही लहानसहान वस्तूंची खरेदी होईल. केलेल्या मेहनतीचे चीज होईल. सहलीचा योग संभवतो. त्यामुळे चित्तवृत्ती सुधारतील. सकारात्मकता वाढेल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पारंपरिक पोशाख

मकर – उत्कर्ष होईल
कष्ट आणि मेहनत म्हणजे मकर रास. मेहनतीचे फळ या आठवडयात नक्कीच मिळेल. थंड पदार्थ खा. गुलकंद आवर्जून खा. आप्तस्वकीयांकडून भेटवस्तू मिळेल. मुलांचा उत्कर्ष होईल. त्यांना नवीन कामांच्या संधी प्राप्त होतील.
शुभ परिधान – चष्मा, कडे

कुंभ – नवी खरेदी
अविवाहितांना चांगली स्थळे चालून येतील. विवाह जुळेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. जवळच्या व्यक्तीस जपा. कामाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. सावध राहा. लक्ष्मी मातेची उपासना करा. खिरीचा नैवेद्य दाखवा. अबोली रंग शुभकारक.
शुभ परिधान – पांढरा कुर्ता, कपाळी अष्टगंध

मीन – चालत राहा
व्यायाम आणि आहार यांचे योग्य संतुलन करा. अन्यथा प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल. कामावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक शक्ती मिळेल. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल. पांढरा रंग फलदायी. गणेशाची उपासना हातून घडेल.
शुभ – कुर्ता, पैंजण

समस्या – सतत बारीक सारीक अडचणी येतात, काम पूर्ण होत नाही. संध्या चुरी – मुंबई
तोडगा – प्रवेशद्वार आणि पुढील जागा नेहमी स्वच्छ ठेवा. रोज सकाळी दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढा.

आपली प्रतिक्रिया द्या