आठवड्याचे भविष्य 29 जून ते 5 जुलै 2019

980

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – भरपूर पैसे
गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम कालखंड. शेअर्समध्ये अवश्य गुंतवणूक करा. त्यावेळेस जांभळा रंग जवळ ठेवा. यश तुमचेच असेल. आर्थिक फायदा होईल. लक्ष्मीमातेची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे देवघरात ठेवा. दररोज पूजा करा.
शुभ परिधान – ब्लेझर, लांब छत्री

वृषभ – नात्यात गोडवा
जवळच्या नातेसंबंधात ताणतणाव निर्माण होतील, पण तुमच्या पुढाकाराने ते निवळतील. विशेषतः भावंडांतील नातेसंबंध सुधारतील. आकाशी रंग फलदायी ठरेल. कठीण प्रसंगावर मात कराल. घरातील ज्येष्ठांना आनंद मिळेल असे वातावरण घरात असेल.
शुभ परिधान – शाई पेन, सोनेरी घडय़ाळ

मिथुन – समुद्र दर्शन
मनास शांतता लाभेल. आवडती व्यक्ती सहज प्राप्त होईल. गुलाबी रंग शुभ असेल. प्रेमाचा आठवडा असेच वर्णन करावे लागेल. मनाने एकमेकांच्या जवळ याल. समुद्रावर अवश्य जा. जोडीने गेलात तर एखादा शिंपला अवश्य जवळ जपून ठेवा.
शुभ परिधान – मूनस्टोन , तांब्याचे कडे ‘

कर्क – सरकारी नोकरी
घरात रोजच्या रोज जलपूजा करा. देवपूजा करतानाच पाण्याच्या कलशाचीही पूजा करा. आपसूकच जलपूजा होईल. सरकारी नोकरीसाठी यश मिळेल. ज्येष्ठांना वेळ द्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
शुभ परिधान – चांदीचे ब्रेसलेट, मेंदी

सिंह – नवा व्यवसाय
या आठवडय़ात तुमच्या बुद्धीचा कस लागणार आहे आणि एका महत्त्वाच्या कामातील अडचणीवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नव्या व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील. भावंडांच्या नात्यात प्रेम वाढेल. पांढरा रंग जवळ बाळगा. अनपेक्षित अर्थप्राप्ती होईल.
शुभ परिधान – डेनिम, कुंकू

कन्या – मनास संतोष
घरात थोडेफार ताणतणाव जाणवतील, पण त्याकडे दुर्लक्ष करा. नव्या कामाच्या संधी चालून येतील. मुलाची त्यांच्या कामात प्रगती होईल. ते पाहून मनास संतोष होईल. घरात नारळाचे पदार्थ आवर्जून बनवा. एखादी चांगली बातमी येईल. हिरवा रंग भाग्यदायी.
शुभ परिधान – सैल वस्त्र, धोतर

तूळ – जोडीदाराला पाठिंबा
मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. घरातील लहानांचे मन राखा. त्यांना दुखवू नका. त्यांच्या आवडीचे पदार्थ करा. उद्योगधंद्यात स्थैर्य लाभेल. एकंदरीत वातावरण चांगले राहील. जोडीदाराला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मातीचा रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – पलाझो, कुर्ता

वृश्चिक – अचूक अंदाज
तब्येतीत सुधारणा होईल. ऋतूनुसार आहार ठेवा. आर्थिक प्राप्ती होईल. गुंतवणूक अवश्य करा. त्यातून लाभ होतील. निळा रंग महत्त्वाचा. देवघरात एकमुखी रुद्राक्ष ठेवा. त्याची रोज पूजा करा. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील.
शुभ परिधान – मोजे, रेनकोट

धनु – प्रिय व्यक्ती भेटेल
एखादी चांगली बातमी कानावर येईल. त्यातून बरेच नवे बदल घडतील. आपल्या इष्ट देवतेची आराधना करा. प्रिय व्यक्तीशी भेटगाठ होईल. सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. चंदेरी रंग जवळ ठेवा. कलावंतांच्या सर्जनशीलतेस वाव मिळेल.
शुभ परिधान – जॅकेट, ब्रॅण्डेड शर्ट

मकर – स्थावर मिळकत
हा आठवडा एखादा जटील प्रश्न घेऊन येईल. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळावर मात द्याल. आहारात गोडाचे प्रमाण कमी करा. पिवळा रंग जवळ ठेवा. सोने खरेदीचा योग आहे. जरूर खरेदी करा. घरात वातावरण चांगले राहील. स्थावराचे प्रश्न सुटतील.
शुभ परिधान – हातमाग, पैंजण

कुंभ – नवी आशा
प्रगतीच्या नवीन दिशा गवसतील. आतापर्यंतच्या मेहनतीचे सार्थक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. घरात एखादा छोटासा समारंभ पार पडेल. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सोनेरी रंग लाभदायी ठरेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
शुभ परिधान – लिनन, चंदन

मीन – वेगळे वळण
घरातील कुरबुरींपासून लांब रहा. तुमच्या ध्येयावर लक्ष द्या. त्यातील यश तुम्हाला बरेच काही मिळवून देईल. गुलाबी रंग जवळ ठेवा. मनाजोगता जोडीदार लाभेल. आयुष्यातील महत्त्वाचे नाते एक वेगळे वळण घेईल. तुमच्यातील आध्यात्मिक शक्ती विकसित होतील.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, ओढणी

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या