साप्ताहिक राशिभविष्य – 06 जुलै ते 12 जुलै 2019

886

>> मानसी इनामदार

मेष – संकटांवर मात
आठवडय़ाच्या मध्यावर उद्योगधंद्यात थोडाफार चढउतार जाणवेल; पण काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. पांढरा रंग मनास शांतता देईल. आहारात दुधाचा समावेश करा. हाडांच्या दुखण्यापासून सावधान.
शुभ परिधान – रेनकोट, हातात ब्रेसलेट

वृषभ – उज्ज्वल उद्या
सरकारी नोकरीतून उत्तम आर्थिक लाभ होणार आहे. . भगवा रंग हा त्यागाचा आहे. अत्यंत प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी त्याग कराल. भविष्यकाळ खूप उज्ज्वल होईल. मुलांची प्रगती आता कोणी रोखू शकणार नाही. घरातील बाळकृष्णाला तुळस वहा.
शुभ परिधान – कृत्रिम दागिने, हातरुमाल

मिथुन – प्रसन्न राहाल
गृहखरेदीचे योग आहेत. संधीचा लाभ घ्या. सोबत पाच लवंग ठेवा. काम होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. जोडीदारासमावेत उत्तम काल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. आकाशी रंग जवळ ठेवा..
शुभ परिधान – लिपस्टिक, अष्टगंध

कर्क – बाळाचे आगमन
विवाहित जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे योग आहेत. करंगळीत मोती धारण केल्यास खूप फायदा होईल. महिलावर्गास आठवडा चांगला जाईल. अंजिरी रंग जवळ बाळगा. आप्तस्वकीयांशी वादाचे प्रसंग येतील. पण तुम्ही अलिप्त रहा. सात्विक आहारावर भर द्या..
शुभ परिधान – सुगंध, ब्रॅण्डेड कपडे

सिंह – प्रेमाची नाती
हा आठवडा तुमच्यासाठी कामाचा आणि नात्यांचा आहे. अनेक प्रेमाची नाती बांधली जातील. नात्यांचे विविध रंग अनुभवास येतील. आणि ते अर्थात सकारात्मक असतील. लाल रंग हा खास तुमचाच आहे. त्याला या क्षणांचा साक्षीदार बनवा. सरकारी कामात यश मिळेल..
शुभ परिधान – आधुनिक पेहराव, घडय़ाळ

कन्या – व्यासंग वाढेल
मनोवांछित फळ मिळेल. मुलांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचा पाठिंबा त्यांना कायम ठेवा. नवीन नाती जोडली जातील. त्यातून आनंद मिळेल. चांगले साहित्य वाचनात येईल. त्यातून व्यासंग वाढेल. लेखकांच्या हातून नवनिर्मिती होईल. मोतिया रंग धारण करा.
शुभ परिधान – कानात कुडय़ा, खादी

तूळ – यश मिळेल
राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम यश प्राप्ती होईल. गृहिणींसाठी हा आठवडा थोडा तणावाचा ठरेल. हातून उत्तमोत्तम पदार्थ तयार कराल. घरात तुमच्या कार्यकुशलतेचे कौतुक होईल. पिवळा रंग परिधान करा.
शुभ परिधान – मंगळसूत्र, गुलाबाचे फुल

वृश्चिक – संयम बाळगा
सबुरी आणि सातत्य या दोन गोष्टींचा सध्या अवलंब करा. कामातील सातत्य अजिबात कमी होऊ देऊ नका. जोडीला संयम बाळगलात की यश तुमचेच आहे याची खूणगाठ बांधा. सर्दी-पडशापासून स्वतःला जपा. तांब्याचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ऊबदार कपडे, तांब्याचे कडे

धनु – व्यायाम करा
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. पायांची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. बऱयाच गोष्टी त्यातून सुकर होतील. न्यायालयीन कामे होतील. कामाच्या ठिकाणी मेहनत जास्त घ्यावी लागेल. एखाद्या छोटय़ा सहलीचे आयोजन कराल. निळा रंग धारण करा.
शुभ परिधान – टोपी, पावसाळी कपडे

मकर – कलानिर्मिती होईल
घरातील लहान मुलांच्या प्रगतीकडेही लक्ष असूद्या. नोकरीच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील. त्यामुळे मनास विरंगुळा लाभेल. चित्रकार उत्तम कलानिर्मिती करतील. त्यातून कामास प्रतिष्ठा लाभेल. घरात थोडेसे आर्थिक नुकसान संभवते. सावध रहा. आकाशी रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – टाय, ब्लेझर

कुंभ – कार्याचे कौतुक
जलतत्त्वाची तुमची रास. तुमच्या कार्याचे कौतुक होईल. मानमरातब प्राप्त होईल. जवळच्या व्यक्तींची साथ मोलाची ठरेल. लाल रंग जवळ बाळगा. हातून साहित्य निर्मिती होईल. आहारात सात्विक पदार्थ ठेवा. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. त्यातून नवी नाती जोडली जातील.
शुभ परिधान – चष्मा, नीलम खडा

मीन – मनास शांतता
तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. कृष्णाची मानस पूजा करा. मनाला शांतता लाभेल. घरात वातावरण चांगले राहील. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. निळा रंग जवळ बाळगा. जुनी देणी चुकती कराल.
शुभ परिधान – खेळाचे कपडे, हिरा

समस्या –
मी कॉम्प्युटर इंजिनीयर आहे. दोन वर्षांपासून नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे. अजून यश मिळत नाही.
– अनिल सुतार, मुंबई
तोडगा –
रोज मारुती स्तोत्र म्हणा. मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी घरच्या देवांना दहीसाखरेचा नैवेद्य दाखवा व तो भक्षण करा.

आपली प्रतिक्रिया द्या