सुंदर दिवसांची चाहूल

910

>> मानसी इनामदार(ज्योतिषतज्ञ)

मेष
छानशी खरेदी
मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. त्या दृष्टीने आठवडा महत्त्वाचा आहे. निळा रंग जवळ बाळगा. सोमवारी विठोबाच्या देवळात जाऊन तुळशी पत्र वाहा. कार्यालयात कामाचा प्रचंड ताण पडेल. जबाबदारी टाळू नका. खरेदीच्या व्यवहारात जोडीदाराचे मत महत्त्वाचे ठरेल.
शुभ परिधान – मखमली वस्त्र, सोन्याच्या पाटल्या.

वृषभ
या वळणावर…
या आठवडय़ात गुलाबी रंगाचे प्राबल्य तुमच्या राशीवर आहे. प्रेमाचा आठवडा असेही म्हणता येईल. विवाह योग आहे. चांगली स्थळे येतील. गांभीर्याने विचार करा. हरिपाठाचे अभंग आवर्जून ऐका. घरात सकारात्मक वातावरण राहील. विचारांनाही चांगले वळण लागेल.
शुभ – आवडीचा पोशाख, मेकअप.

मिथुन
वरिष्ठांची मर्जी
घरात बारीक सारीक कुरबुरी होतील. नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यालयीन गप्पांपासून लांब राहा. तुमच्या झोपण्याच्या जागेजवळ तांब्याच्या गडूत स्वच्छ पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर ते प्या. आकाशी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – मलमल वस्त्र, रुद्राक्ष.

कर्क
यश तुमचेच
शांतपणे आपले काम करीत राहणे हा तुमच्या राशीचा स्वभावधर्म. या आठवडय़ात तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. केवळ आपल्या कामावर लक्ष द्या. यश तुमचेच आहे. लाल रंग जवळ बाळगा. रात्री झोपण्यापूर्वी गणपती स्तोत्र म्हणा. न्यायालयीन कामे मार्गी लागतील.
शुभ परिधान – पारंपारिक कपडे, घडय़ाळ.

सिंह
पैसा येईल
घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. व्यवसायाच्या ठिकाणी प्रयत्नार्थी परमेश्वर हा प्रत्यय येईल. प्रयत्नांची कास सोडू नका. आमरशी रंग फलदायी. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभ होईल.
शुभ परिधान – साडी, कर्णभूषणे.

कन्या
पाहुणे येतील
मोसमातील फळांचा मनपूर्वक आस्वाद घ्या. घरात पाहुणे येतील. त्यांच्या सरबराईत आठवडा जाईल. नवविवाहितांसाठी काल उत्तम. बाहेर जाऊन या. मनाने जवळ याल. व्यवसायात यश लाभेल. पिवळा रंग जवळ बाळगा. घरातील लहानांवर ओरडू नका. काळजी घ्या.
शुभ परिधान – कुंकू, केसांना डिझायनर रंग.

तूळ
कामे होतील
महत्त्वाचे काम करताना मोतिया रंग परिधान करा. घरातील कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. सासू-सुनांचे वाद होतील, पण ती चहाच्या पेल्यातील वादळे असतील. आपसूक शमतील. जमिनींच्या व्यवहारांपूर्वी घरातून दही-साखर खाऊन बाहेर पडा, कामे होतील.
शुभ परिधान – पारंपारिक दागिना, छत्री

वृश्चिक
आनंदी वातावरण
घरात दुरुस्तीची कामे निघतील. श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता. घरात मोगऱयाची फुले ठेवा. त्याच्या सुगंधाने घरात पवित्र वातावरण निर्माण होईल. पांढरा रंग यश देणारा ठरेल. आप्तस्वकियांच्या गाठीभेटी होतील. त्यातून आनंदी वातावरण निर्माण होईल.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, हिरा.

धनु
गुंतवणूक करा
समीकरणे जुळतील. तुमचे महत्त्वाच्या गोष्टींबाबत आराखडे अचूक ठरतील. स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. वादात सापडू नका. शक्य झाल्यास दर गुरुवारी उपवास करा. घरातील वातावरण सुधारेल. हिरवा रंग जवळ बाळगा. जमिनीत पैसे गुंतवा.
शुभ परिधान – तुलसी पत्र, लांब बाह्यांचा शर्ट.

मकर
निर्विघ्न कार्य
आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. आर्थिक व्यवहार करताना राखाडी रंग जवळ बाळगा. देवघरात लक्ष्मीची मुद्रा असलेले नाणे ठेवा. त्याची रोज पूजा करा. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडेल.
शुभ परिधान – वहाण, सुती कपडे.

कुंभ
जमिन खरेदी
अत्यंत व्यस्त आठवडा. कामानिमित्त प्रवास घडेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. सात्विक आहार घ्या. घरातील क्लेशांपासून दूर राहा. उशीरपर्यंत घराबाहेर राहण्याचे टाळा. पिस्ता रंग महत्त्वाचा ठरेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. दुर्लक्ष करा.
शुभ परिधान – ब्लेझर, सुटसुटीत कपडे.

मीन
सर्जनशील काम
मारुतीच्या देवळात जाण्याचा नेम ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. सर्जनशील काम हातून घडेल. जवळच्या माणसांच्या भेटीगाठी संभवतील. आठवडा मजेत जाईल. वस्तू खरेदीचा योग आहे. गुलाबी रंग परिधान करा. मन शांत ठेवा.
शुभ परिधान – डिझायनर अंगठी, रेशमी वस्त्र.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या