साप्ताहिक राशिभविष्य : चाहूल छान दिवसांची

1223

>> मानसी इनामदार

मेष – महिला विशेष
संपूर्ण आठवडाच अत्यंत उत्साहवर्धक आहे. महिला वर्गासाठी खूपच यशदायी आठवडा. तरुणींना इप्सित वर मिळवून देईल. देवीची उपासना अवश्य करा. घरात सर्वच आघाडय़ांवर यशस्वी तोंड द्याल. कामकाजातही पुढे जाल. केशरी वस्त्र परिधान करा.
शुभ परिधान – अष्टगंध, पैठणी

वृषभ – निसर्गाच्या जवळ
विद्यार्थांसाठी उत्तम आठवडा. विद्येची उपासना हीच गणपतीची उपासना. घरातील मोठय़ांचा मान राखा. पर्यावरणपूरकतेसाठी प्रयत्नशील राहा. निसर्ग सान्निध्य लाभेल. हिरवा रंग शुभ ठरेल. जुन्या नात्यांशी नव्याने ओळख होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ परिधान – हिरव्या फ्रेमचा चष्मा, नाकात रिंग

मिथुन – नवी सुरुवात
कामातील अडथळे दूर होतील. लाल रंग जवळ ठेवा. व्यवसायात एखादी नवी सुरुवात कराल. भागीदारी लाभदायक ठरेल. गणेशोपासना अवश्य करा. आज एखादी आशादायक बातमी मिळेल. गणपतीला एकवीस दुर्वा आवर्जून वाहा. बाहेर फिरायला जा.
शुभ परिधान – लाल छत्री, रेशमी कुर्ता

कर्क – यश मिळेल
तब्येतीच्या साऱया तक्रारी सहज दूर होतील. पथ्याचे काटेकोर पालन करा. आज गणेश पूजन करा. पंचामृताने अभिषेक करा पांढरा रंग जवळ बाळगा. पाण्याशी संबंधित व्यवसायात भरपूर यश मिळेल. प्रेमात सफलता लाभेल.
शुभ परिधान – टी-शर्ट, डेनिम

सिंह – जबाबदारी वाढेल
गणनायकाचे नेतृत्वगुण तुमच्यातही उतरले आहेत. या गुणांचा चांगला प्रत्यय तुम्हालाही येईल आणि तुमच्याशी संबंधित व्यक्तींनाही येईल. त्याचा सिंदुरी रंग जवळ बाळगा. कामाच्या ठिकाणी एखाद्या मोठय़ा प्रकल्पात यश मिळेल. जबाबदारी वाढेल.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, पाऊस पोशाख

कन्या – नवनिर्मिती होईल
मनावरील सारी मरगळ या आठवडय़ात दूर होईल. घरातील लहान लेकरांची काळजी घ्या. आज बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवा. हातून नवनिर्मिती होईल. सर्जनशील काही घडेल. येणारी प्रत्येक संधीचा लाभ घ्या. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – चंदेरी साडी, शाल

तूळ – सहकार्य लाभेल
महिला वर्गासाठी हा आठवडा खूपच आशादायी आहे. व्यवसायात यश मिळेल. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल. घरातल्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आज बाप्पासोबत पार्वती मातेचीही उपासना करा. आवर्जून उपास करा. सोनेरी रंग फलदायी.
शुभ परिधान – सोन्याच्या बांगडय़ा, कुर्ता

वृश्चिक – प्रगती होईल
आषाढ महिना छान जाणार आहे. आरोग्यदायी आर्थिकदृष्टय़ा लाभदायक. गणपतीला दर मंगळवारी एकवीस दुर्वा वाहा. मनातील इच्छा पूर्ण होतील. मंगळ ग्रह तुमच्या राशीचा आहे. त्यामुळे विनायकाची कृपा आहेच. लाल रंग जवळ ठेवा. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
शुभ परिधान – पोवळे, स्कार्फ

धनु – शुभ वर्तमान
गणेश ही राजसतेसोबत युद्धदेवताही आहे. लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द तुमच्या मनात सदोदित प्रदीप्त राहील. नव्या संधी उपलब्ध होतील. घरात शुभ घटना घडेल. आकाशी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – पारंपरिक पोशाख, सोन्याची साखळी

मकर – उत्साही राहाल
संकष्टी स्वकियांसोबत साजरी कराल. घरात उत्साह राहील. जुने वादविवाद संपुष्टात येतील. मुलांना यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – खादीचा कुर्ता, कोल्हापुरी चप्पल

कुंभ – इच्छा पूर्ण
भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यास अत्यंत योग्य कालखंड. जन्मस्थानी जाण्याचा योग येईल. नव्या ओळखी होतील. त्यातून समाजात प्रतिष्ठा लाभेल. वातावरण बदलण्यास सुरुवात होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. गणेशाची मनःपूर्वक उपासना करा. चंदेरी रंग लाभदायक.
शुभ परिधान – कमरपट्टा, सुगंध

मीन – मनोवांछित फळ
बाप्पाची उपासना खूप मनःपूर्वक कराल. त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. कामात आणि तुमच्या दैनंदिनीत सातत्य ठेवा. नव्या नोकरीची संधी, व्यवसायातही यश मिळेल. मनोवंचित फळ लाभेल. पथ्य सांभाळा. निळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – दुपट्टा, लिपस्टिक

समस्या-
रात्री वाईट स्वप्न पडतात. भीतीने झोप येत नाही.
-रजत देसाई, पुणे
तोडगा –
रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हणा आणि मसाला दूध घ्या.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या