साप्ताहिक राशिभविष्य : 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2019

1533

>> मानसी इनामदार

मेष – शुभ घडेल
व्यवसाय उद्योगात भरभराट होईल. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा आठवडा संमिश्र असेल. पण मेहनतीने इप्सित साध्य करता येईल. गणेश आराधना सुरु ठेवावी. विशेषत; विद्यार्थ्यांनी. तुळशीचा हिरवा रंग जवळ बाळगा. कामे होतील. घरात नवे काहीतरी शुभ घडेल.
शुभ परिधान – जरीचे वस्त्र, टोपी

वृषभ – समृद्धी नांदेल
कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. देवघरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची रोज पूजा करा. घरात कायम समृद्धता राहील. पिवळा रंग जवळ बाळगा. न्यायालयीन कामे त्वरित होतील.
शुभ परिधान – शुभ पैठणी, झब्बा

मिथुन – निसर्ग सान्निध्य
फुललेला निसर्ग तुमच्यासाठी अनुकूल वातावरण तयार करेल. तुम्ही त्याच्या सान्निध्यात जा. एखादे झाड लावून निसर्गदान अवश्य करा. पती पत्नीच्या नात्यातील माधुर्य वाढेल. तिची साथ महत्वाची ठरेल. एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. राणी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – सुवर्णालंकार, मेकअप

कर्क – सन्मान मिळेल
कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष होऊ देऊ नका. काही महत्वाच्या जबाबदाऱया तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. त्यातून मानमरातब वाढेल. मेहनतीत कसूर नको. हा बाप्पाचा आशीर्वाद असेल. अबोली रंग महत्वाचा. प्रकृतीकडे लक्ष द्या. घरातील स्त्राrवर्गाचे मत महत्वाचे ठरेल.
शुभ परिधान – मोत्याचे दागिने, टाय

सिंह – सुलभ आठवडा
सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असाल तर त्यात नक्की यश मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आज घरातील बाळकृष्णाला तुळस वाहा. काम साध्य होईल. निळा रंग जवळ बाळगा. मनावर संयम ठेवा. त्यामुळे बऱयाच गोष्टी सुलभ होतील.
शुभ परिधान – कर्णभूषणे, ब्लेझर

कन्या – अतिथी देवो भवः
घरात सध्या पाहुण्यांची वर्दळ राहील. त्यामुळे स्वतःसाठी उसंत मिळणार नाही. मन प्रसन्न राहील. गृहिणींच्या हातून पाहुण्यांची भरपूर सेवा घडेल. छोटासा प्रवास घडेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. मुलांना आर्थिक फायदा होईल. गुलाबी रंग लाभदायी.
शुभ परिधान – जॅकेट, ब्रेसलेट

तूळ -नवे काम
आरोग्यात सुधारणा होईल. भरपूर विश्रांती मिळेल. आठवडयातून एकदा जवळच्या गणपती मंदिरात जाऊन या. नव्या योजना हातात घ्याल. त्यात यशस्वी व्हाल. त्यातून अर्थ प्राप्ती होईल. हळदी रंग जवळ बाळगा. सोने खरेदी कराल.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, मंगळसूत्र

वृश्चिक – स्वतःला ओळखा
तप्त मंगळाची नेहमीच तुमच्यावर कृपा दृष्टी असते. त्यामुळे अनेक अडचणीतून मार्ग काढता येतो. तुम्हाला थोडय़ाफार अतींद्रिय शक्ती प्राप्त आहेत. त्याचा सदुपयोग करून घ्या. घरात शुभ कार्य घडेल. भावंडांना दुखवू नका. मोतिया रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुटसुटीत कपडे, सुगंध

धनु – सरस्वती प्रसन्न
गणेशाचे वरदान तुमच्या सोबत असेल. शैक्षिणिक क्षेत्रात प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात थोडीफार पेल्यातील वादळे संभवतात. काळजीचे कारण नाही. भावंडांसमवेत वेळ मजेत जाईल. हिरवा रंग जवळ ठेवा. तांब्याच्या भांडयातून पाणी प्या.
शुभ परिधान – उबदार कपडे, चांदीचे आभूषण

मकर – आवडीचा खाऊ
शुभ वर्तमान समजेल. घरात प्रसन्न वातावरण राहील. पांढरा रंग जवळ बाळगा. नोकरीसाठी प्रयत्न फलद्रूप होतील. संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तब्येतीच्या थोडया फार कुरबुरी जाणवतील. पण काळजीचे कारण नाही.
शुभ परिधान – सुती साडी, रेनकोट

कुंभ – सामाजिक प्रतिष्ठा
मन अस्वस्थ राहील. आवडीच्या गोष्टी करा. त्यामुळे मनास प्रसन्नता लाभेल. राखाडी रंग जवळ बाळगा. कामाच्या ठिकाणी थोडे चढ उतार येतील. पण त्यावर मात कराल. हाती भरपूर यश आहे. सामाजिक वर्तुळ अधिकच विस्तृत होईल.
शुभ परिधान – आवडीचे कपडे, घडय़ाळ

मीन – सन्मार्ग… सत्य
मनावर मळभ आले असले तरी चिंतेचे कारण नाही. यशस्वी व्हाल. सन्मार्ग आणि सत्याचा हात कधीही सोडू नका. ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवा. घरात नवीन खरेदी होईल. आकाशी रंग जवळ ठेवा. मारुतीची उपासना करा.
शुभ परिधान – खेळाचे कपडे, अंगठी

समस्या – मन स्थिर राहत नाही. नकारात्मक विचार येतात. – शांताताई जाधव, सातारा
तोडगा – रोज रात्री झोपण्यापूर्वी शिवकवच स्तोत्र वाचावे.

आपली प्रतिक्रिया द्या