साप्ताहिक राशिभविष्य – 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2019

5702

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
नवीन नाती
या आठवडय़ात काही जुने हिशेब मार्गी लागतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. घरात भरपूर पाहुणे येतील. यातून हितसंबंध सुधारतील. घरातील गृहिणीवर कामाचा ताण पडेल. लाल रंग जवळ बाळगा. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल.
शुभ परिधान – सॅटीनचे वस्त्र, चंदन

वृषभ
भेटीगाठी होतील
संकष्टी चतुर्थी अत्यंत लाभदायक आहे. उपवास अवश्य करावा. जमिनीची कामे मार्गी लागतील. व्यवहार याच आठवडय़ात करून घ्या. पांढरे वस्त्र्ा परिधान करा. जोडीदाराची साथ नेहमीप्रमाणेच लाभदायक असेल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील.
शुभ परिधान – लिनन, टाय

मिथुन
ज्येष्ठांची मदत
मनाप्रमाणे गोष्टी झाल्याने मनास प्रसन्नता लाभेल. घरातील ज्येष्ठांचा मान राखा. महत्त्वाच्या कामात त्यांचा सल्ला आवर्जून विचारात घ्या. काही अडचणीचे प्रसंग येतील. त्यांच्या पाठिंब्यानेच सुटण्यास मदत होईल. निळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – शाईचे पेन, रुमाल

कर्क
आईची काळजी
अनपेक्षित धनलाभ होईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आकाशी रंग परिधान करा. आईशी वादविवादाचे प्रसंग उद्भवतात. पण त्यापेक्षा आईची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाचे निर्णय याच आठवडय़ात घ्या.
शुभ परिधान – रंगीबिरंगी कपडे, अंगठी

सिंह
मदत करा
सध्या कालावधी तुमचा कस पाहणारा असेल. इथे तुमचा स्वभाव कामी येईल. अनेक लोकोपयोगी कामे हातून घडतील. दुसऱयांना मदत करण्याची संधी अजिबात सोडू नका. त्यातून पुण्यसंचय होईल. चंदेरी रंग लाभदायक ठरेल. प्रेमवीरांसाठी परीक्षेचा कालखंड.
शुभ परिधान – डेनिम, जॅकेट

कन्या
मनोकामना पूर्ण
प्रकृतीची काळजी घ्या. थोडा वेळ स्वतःसाठी द्या. त्यामुळे मनास प्रसन्नता येईल. चांगले साहित्य वाचाल. घरातील देवांची पूजा मनःपूर्वक करा. मनोकामना पूर्ण होतील. आपल्या पूर्वजांची आठवण आवर्जून काढा. लाल रंग परिधान करा.
शुभ परिधान – लाल ओढणी, कुंकू

तूळ
भावबंध जुळतील
या आठवडय़ात अतिशय उत्तम कलाकृतीचा आनंद घ्याल. बाहेर फिरण्याचा योग आहे. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ मजेत जाईल. त्यातून भावनिक बंध मजबूत होतील. त्यामुळे खुश राहाल. पोपटी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – शालू, अलंकार

वृश्चिक
चिंता नको
तब्येतीतील सुधारणा मनास उभारी देऊन जाईल. घरातही वातावरण प्रसन्न राहील. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तरुणाईसाठी आठवडा खूप आशादायक असेल. खेळात प्रावीण्य मिळवाल. भगवा रंग जवळ बाळगा. एकंदरीत आठवडा चांगला.
शुभ परिधान – बांगडी, जानवे

धनु
कामाचे कौतुक
स्वच्छ मनाने केलेल्या कामाला नेहमीच यश मिळते. या आठवडय़ात काहीसा असाच अनुभव तुम्हाला येईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. कर्मयोगावर विश्वास ठेवा. नवीन नाती जोडली जातील. त्यातून अत्यंत मानसिक समाधान लाभेल. तांब्याचा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पारंपरिक पोशाख, रुद्राक्ष

मकर
महत्त्वाचा निर्णय
अत्यंत समजूतदार आणि परिपक्वता हे तुमच्या राशीचे वैशिष्टय़. तुमच्या याच स्वभावाचा प्रत्यय तुमच्या आप्तेष्टांना येईल. घरातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमच्याकरवी घेतला जाईल. त्यामुळे फार मोठे संकट टळेल. केशरी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – अष्टगंध, कुर्ता

कुंभ
प्रेमाचा आठवडा
मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणाल. पण त्यातून कोणाचे मन दुखवू नका. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. कामात थोडीफार घाई संभवते. तरुणाईसाठी प्रेमाचा आठवडा. नव्या व्यक्तीच्या संपर्कात याल. त्यातूनच जीवनाचा जोडीदार मिळेल. आकाशी रंग लाभदायी.
शुभ परिधान – टी शर्ट, आधुनिक पोशाख

मीन
प्रगतीच्या वाटेवर
अत्यंत धावपळीचा आठवडा. पण निश्चिंत रहा. त्यातून मिळणारे यश नेत्रदीपक असेल. हितशत्रूंपासून सावधान. वादात सापडू नका. तटस्थ रहा. खेळात प्रगती होईल. आहार आणि व्यायाम यांची पथ्ये सांभाळावी लागतील. पांढरा रंग जवळ बाळगा. देवीची उपासना करा.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, टोपी

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या