साप्ताहिक राशिभविष्य- 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019

4274

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष
कौतुक होईल
हा आठवडा तुमच्यासाठी कोणाला तरी मदत करण्याचा आठवडा ठरेल. मदत करताना निर्मम वृत्ती ठेवा. पण त्याचबरोबर आर्थिक व्यवहार लक्षपूर्वक करा. अगदी परिचितांवरही फार विश्वास ठेऊ नका. तुमच्या मदतीची आप्तांकडून प्रशंसा होईल. लाल रंग महत्वाचा.
शुभ परिधान – कुर्ता, ब्रेसलेट

वृषभ
आर्थिक सुरक्षा
खूप दिवस रखडलेली आर्थिक कामे या आठवडयात मार्गी लागतील. यातून अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. बचत खात्याला एक स्थिरता येईल. अवास्तव खर्च टाळा. पांढरा रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – सौंदर्य प्रसाधन, अंगठी

मिथुन
भावबंध जुळतील
वातावरण प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा जनसंपर्क वाढेल. त्याचा भविष्यात तुम्हला फायदा होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. जोडीदारास घेऊन फिरायला जा. भावनिक बंध दृढ होतील. गुलाबी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – पैठणी, जरीचे वस्त्र

कर्क
राजकीय स्पर्धा
या आठवडयात खूप चांगली बातमी मिळेल. त्यातून कामाच्या ठिकाणी लाभ होतील. हातातील वेळ निरर्थक कामात वाया घालवू नका. राजकीय क्षेत्रात एखादी संधी चालून येईल. अवश्य लाभ घ्या. काळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – रुमाल, घडय़ाळ

सिंह
नवे काम
तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. एखादे नवीन काम हाती घ्याल. जोडिदारावरील विश्वास दृढ होईल. एकमेकांच्या साथीने निर्णय घ्या. प्रेम प्रकरणात यश मिळेल. ज्येष्ठांची काळजी घ्या. सुवासिनीची ओटी भरा. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – आय लायनर, सुगंध

कन्या
फिरायला जाल
आर्थिक परिस्थिती अनुकूल होण्यास सुरुवात होईल. स्वतःची आणि प्रिय जनांची काळजी घ्या. बाहेरगावी जाण्याचा योग आहे. भगवा रंग जवळ बाळगा. अडचणींचे निवारण होईल. सात्विक आहार घ्या. मानसिक स्थिती चांगली राहील.
शुभ परिधान – रुद्राक्ष, सोने

तूळ
निवांत क्षण
कामातून फार थोडे निवांत क्षण वाटयाला येतील. ते आपल्या जोडिदारासमवेत घालवा. करमणुकीचा कार्यक्रम दोघांनी मिळून पहा. विठ्ठल रखुमाईचे पूजन करा. देवळात जाऊन दर्शन घ्या. अर्थात जोडीने. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – बाजूबंद, जोडवी

वृश्चिक
आवडीचा खाऊ
या आठवडयात प्रकृतीच्यास समस्या मार्गी लागतील. खर्च खूप होतील. पण लाभही तसाच होईल. स्वकीयांना दुखवू नका. अनपेक्षित संकटाना त्याची मदत लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. आकाशी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – गोफ, बांगडी

धनु
पैसे गुंतवा
महत्वाच्या कामासाठी केलेली धावपळ फलद्रूप होईल. उद्योगात पैसे गुंतवण्यासाठी योग्य काल. घरात थोडेफार वाद संभवतात. त्याकडे दुर्लक्ष करा. चाफ्याचे फुल जवळ बाळगा. मनाप्रमाणे घडेल. पिवळा रंग महत्वाचा.
शुभ परिधान – लिपस्टिक, सुती वस्त्र

मकर
मदत मिळेल
महत्वाचे कार्य हाती घ्याल. त्यातून दूरगामी आर्थिक लाभ होतील. हाती घेतलेल्या कामात जवळच्या माणसाची मदत होईल. तामसी पदार्थ टाळा. अबोली रंग परिधान करा. अनपेक्षित भोजनाचा लाभ मिळेल.
शुभ परिधान – खादी, साडी

कुंभ
नाटय़पूर्ण आठवडा
नव्या योजनांवर काम करण्याचा योग आहे. त्यात यशस्वीही व्हाल. मनास उगाच हुरहूर लागेल. कारण तुमच्याकडेच सापडेल. थोडी ख़ुशी थोडा गम असा अनुभव येईल. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ब्लेझर, टाय

मीन
यश, मनोबल
सतत कार्यमग्न राहणे हा तुमचा स्थायीभाव. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. पण त्या फिरून तुमच्याकडेच येणार आहेत. भगवा रंग जवळ बाळगा. मारुतीची उपासना नेहमी करा. तुम्हाला यश आणि मनोबल मिळेल.
शुभ परिधान – आवडीचा पोशाख

समस्या – माझे घर महामार्गात गेले आहे. पैसे आले आहेत, पण मिळण्यास विलंब होत आहे.- रविन्द्र जांभेकर, पोलादपूर, रायगड
उपायः देवघरात लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवा. रोज त्याची पूजा करा. लक्ष्मी गायत्री मंत्राचे 108 वेळा पठण करा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या