साप्ताहिक राशिभविष्य 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2019

5313

>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष- माणसांत रमाल
या आठवडय़ात तुमचा जनसंपर्क वाढेल. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहाल. यातून आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी वेळ काढा. तुमच्या यशात त्यांचा वाटा मोठा राहील. पांढरा रंग परिधान करा. घरातील शंकराच्या पिंडीवर पांढरे फूल वाहा.
शुभ परिधान – आरामदायी कपडे, टीशर्ट

वृषभ- समस्या सुटतील
कामासंदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल. बढतीचा योग आहे. व्यवसायात फायदेशीर गुंतवणूक कराल, पण कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. मुलांच्या अभ्यासाबाबत थोडीफार चिंता सतावेल. प्रश्न आपसूक सुटतील. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – अष्टगंध, सुगंध

मिथुन- मजेचा वेळ
अचानक बाहेरगावी जाण्याचा योग येईल. जमिनीबाबत व्यवहार करायचे असल्यास हा आठवडा चांगला आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. सगळा थकवा नाहीसा होईल. भगवा रंग जावळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, रुद्राक्ष

कर्क- अलिप्त राहा
तुमच्या राशीवर चंद्राची कृपा आहे. या आठवडय़ात चंद्र दर्शन अवश्य तिऱहाईत व्यक्तींच्या वादात सापडू नका. कामाच्या ठिकाणी आपण बरे की आपले काम असे धोरण ठेवा. अलिप्तता फायदेशीर राहील. मोतिया रंग अवश्य जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेघांचा शर्ट, डेनिम

सिंह- सामाजिक कार्य
कामावर लक्ष केंद्रित करा. प्रलोभनांपासून दूर राहा. तरुणाईने सावध राहावे आणि आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावे. सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. आई-वडिलांना आवर्जून वेळ द्या. अबोली रंग शुभकारक.
शुभ परिधान – अबोलीचा गजरा, मोत्याची माळ

कन्या- आनंदी राहा
घरातील वातावरण उगाचच तणावाखाली राहील. तुमच्या आनंदी स्वभावाचा येथे फायदा होईल. घरात एखादा अनौपचारिक सोहोळा मुद्दाम आयोजित करा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. आकाशी रंग जवळ ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवा.
शुभ परिधान – साडी, रुमाल

तूळ- निश्चिंत राहा
घरातील थोडेफार ताणतणाव दूर होतील. तुम्हाला स्वतःला अध्यात्माकडे ओढा जाणवेल. तो थांबविण्याचा प्रयत्न करू नका. यातून तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. जवळच्या व्यक्तीचे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे निश्चिंत व्हाल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रुद्राक्षाची माळ, मारव्याची पाने

वृश्चिक- सकारात्मक राहा
नवीन गोष्टीत मन गुंतवा. नवीन कामाच्या संधी चालून येतील. त्याचा फायदा अवश्य घ्या. कामाच्या ठिकाणी वेळ पाळा. घरातल्यांबरोबर वेळ घालवा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढेल. पिवळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – पोवळे, फेटा

धनु- स्वच्छ राहा
घरातील अडगळ दूर करा. घरातील स्वच्छतेवर लक्ष द्या. वैवाहिक जीवन उत्तम. घरात रोज गुलाबाची फुले ठेवा. लाल रंग महत्त्वाचा. चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्याल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. घरातील तरुणाईस समजून घ्या. संवाद साधा.
शुभ परिधान – चांदीचा गोफ, सॅटिनचे वस्त्र

मकर- ऊर्जेचा अनुभव
तरुणाईसाठी प्रेमाचा आठवडा. प्रेमप्रकरणात उत्तम यश. जोडीदाराची साथ लाभेल. लक्ष्मी नृसिंहाची उपासना करा. केशरी रंग जवळ बाळगा. घरात आरोग्यपूर्ण वातावरण राहील. प्रगतीचा मार्ग सुकर होईल.
शुभ परिधान – चंदेरी वस्त्र, जानवे

कुंभ- प्रतिष्ठा लाभेल
खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे नवीन कामाला हात घालता येईल. आप्त स्वकीयांच्या गाठीभेटी होतील. जोडीदाराशी तुम्हाला झुकते घ्यावे लागेल. समाजात मानमरातब वाढेल. सोनेरी रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – सोनेरी चष्मा, कुर्ता

मीन- मेहनत घ्या
कठोर परिश्रम हेच सध्या तुमचे ध्येय राहील. क्रीडापटूंना अत्यंत मेहनतीचा आठवडा. पण या मेहनतीचे फळही तसेच गोड मिळेल. ज्येष्ठ आणि लहानांसमवेत वेळ मजेत जाईल. तरुणांची मने जुळतील. गुलाबी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान-गुलाबाचे फूल, अंगठी

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या