साप्ताहिक राशिभविष्य- 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2019

3011

>> मानसी इनामदार

मेष
आनंदाचे दिवस
या आठवडयात जुन्या आर्थिक गुंतवणुकीमुळे मानसिक ताणताणाव जाणवतील. तुम्ही जेवढे स्वतःला तणावमुक्त ठेवलं तितक्या इतर अनेक लाभाच्या संधी प्राप्त होतील. महत्वाचे काम करताना निळा रंग जवळ बाळगा. काम यशस्वी होईल.
शुभ परिधान – ठेवणीतील कपडे, घड्याळ

वृषभ
लाभाची संधी
घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या कामातून वेळ काढून त्यांच्यासाठी वेळ द्या. कामाच्या ठिकाणी अचानक अर्थप्राप्ती होईल. त्यामुळे घरात एखादा सोहोळा साजरा होईल. आनंदी वातावरण असेल. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – साडी, उपरणे

मिथुन
सोहळा होईल
सामाजिक क्षेत्रात तुमच वावर वाढेल. कामाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. पण त्यात धावपळ खूप होईल. पायांची काळजी घ्या. तिळाच्या तेलाने पायांचे नियमित मर्दन करून घ्या. ऑफव्हाईट रंग जवळ बाळगा. घराच्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या.
शुभ परिधान – कोल्हापुरी चप्पल, कुर्ता

कर्क
मानसन्मान मिळेल
आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नव्या ओळखी होतील. त्यात बाहेरचे खाण्याचे अनेक प्रसंग येतील. ते शक्यतो टाळा. प्रथिनयुक्त पदार्थ आहारात घ्या. त्यामुळे स्नायूंची शक्ती वाढेल. नियमित व्यायामाचा नेम ठेवा. हिरवा रंग जवळ बाळगा. फायदा होईल.
शुभ परिधान – रेशमी कपडे, शेवंतीचे फुल

सिंह
नवे परिचय
ज्या एखाद्या गोष्टीवर तुम्ही अनेक दिवसांपासून खूप मेहनत करीत आहात टी गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. पण हवेमुळे एखादा संसर्ग होण्याची शक्यता. बाहेरील हवेपासून स्वतःच्वे रक्षण करा. घरातील लहानंचीहि थंडीपासून काळजी घ्या. गडद रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – स्टोल, आय लायनर

कन्या
इप्सित साध्य
या आठवडयात बाहेरील प्रवासाचा योग येणार आहे. निर्णय घेण्यात विलंब लावू नका. आपल्या मुलांचे म्हणणे ऐका. त्यात नक्की तथ्य असते. घरातील उद्योगातून अर्थिल लाभ होतील. गुलाबी रंग जवळ ठेवा. मन प्रसन्न  राहील.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, हातात कडे

तूळ
प्रसन्नता वाढेल
अनेक आघाड्यांवर पराक्रम गाजवाल. त्यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. घरात पौष्टिक पदार्थ शिजवण्याचा कटाक्ष ठेवा. बरीच थांबलेली कामे मार्गी लागतील. प्रेमाचे प्रसंग मनास उभारी देतील. चंदेरी रंग फलदायी.
शुभ परिधान – मलमलची साडी, चांदी

वृश्चिक
यश मिळेल
या आठवडयात अनाठायी खर्च वाढण्याची शक्यता. महत्वाच्या आर्थिक उलाढालीच्या प्रसंगी जांभळा रंग परिधान करा. मनावरील ताण कामिकाराण्यासाठी घरात टी ट्री तेलाचा वापर करा. रुमालावर घालून तो रुमाल जवळ ठेवा.
शुभ परिधान – केप्री, जीन्स

धनु
मन शांत ठेवा
घरातील व्यक्तिगत समस्य दूर होतील. महत्वाच्या कामासाठी केलेली धावपळ यशस्वी ठरेल. दूरच्या प्रवासासाठी वाहन चालक नेमा. जवळचा प्रवास घडेल. देवदर्शनासाठी जाल. पारदर्शी रंग लाभदायी. नव्या वस्तूच्या खरेदीचा योग आहे.
शुभ परिधान – जाळीदार कपडे, सोन्याची साखळी

मकर
धावपळ यशस्वी
काही गोष्टी अपूर्ण राहतील. त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही नव्या योजना आखल. त्यात दूरगामी यश मिळेल. त्यामुळे मेंदूस चालना मिळेल. आहारात वातूळ पदार्थ टाळा. हाडांची दुखणी निघण्याचा संभाव. वावरताना जपून वावरा. हिरवा रंग लाभदायी.
शुभ परिधान – चमेलीचे फुल, लेदर जॅकेट

कुंभ
प्रेमास बहर
अनाठायी खर्च खूप होईल. पत्नीवरील प्रेम नव्याने खुलेल. प्रेमाचा आठवडा आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जोदिदारासामावेत फिरायला जाल. गुलाबी रंग जवळ बाळगा. त्यामुळे प्रेमास बहार येईल. नव्या अनेक योजना हाती घ्याल. सर्दी पडशाचा त्रास होईल.
शुभ परिधान – अंगठी, नीलम खडा

मीन
चालत राहा
क्रोधावर नियंत्रण ठेवा. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवा. यश तुमचेच आहे. नेमून दिलेले काम करत राहा. कामाचे कौतुक न्होईल. मनाजोगती खरेदी कराल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. चोकलेटी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – उबदार कपडे, बांगडी

आपली प्रतिक्रिया द्या