आठवड्याचे भविष्य- 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2018

200

>>मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – प्रतिष्ठा मिळेल
सध्या थंडी आणि ऊन या दोहोंचा अनुभव येतो आहे. या हवेचा विपरीत परिणाम प्रकृतीवर होऊ देऊ नका. थंडी आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करा. नव्या कपडय़ांची खरेदी कराल. शक्यतो सुती कपडे वापरा. पांढरा रंग परिधान करा. बराच काळ अडकलेले काम यशस्वीपणे पुढे न्याल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल.
शुभ आहार – ताजे दही, ताक, साजूक तूप

वृषभ – अनुकूल ग्रहमान
कामामुळे बाहेरगावी प्रवास करावा लागेल. पण अति प्रवास टाळा. शक्यतो एकाच ठिकाणी प्रवास होईल असे पहा. त्यामुळे पायावर ताण येईल. खूप वेळ उभे राहणे टाळावे. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल ग्रहमान. त्यासाठी नव्या योजना आखाल. जांभळा रंग अवश्य जवळ ठेवावा. शुभ आहार – कंद, रताळे, सुरण

मिथुन – सकारात्मक ऊर्जा
जवळच्या नात्यात उगाच गैरसमज निर्माण होतील. त्याचा ताण मनावर येईल. पण काळजी नको. नात्यांवरील मळभ आपसूकच दूर होईल. त्यामुळे मानसिक तणावापासून दूर राहा. लाल रंग जवळ ठेवा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी नेटके काम कराल. शक्य असल्यास गाईला चारा घाला.
शुभ आहार – नाचणी, कुळीथ, लाल माठाची भाजी

कर्क – पर्यटनाचा योग
आपल्या कामाच्या बाबतीत संतुष्ट राहाल. त्याचे सकारात्मक परिणाम घरात होतील. आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील. त्यामुळे संपूर्ण घरच निरोगी राहील. थंडीत कुटुंबीयांसोबत छोटीशी सहल आयोजित कराल. कृषी पर्यटन करा. मोतिया रंग जवळ बाळगा. नवी ऊर्जा मिळेल.
शुभ आहार – बाजरी, हुरडा, शेंगदाणे

सिंह – रामरक्षा म्हणा
अपचनाचे विकार संभवतील. घरातील सात्विक आहार घ्या. बाहेरील अनावश्यक खर्च टाळण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील. त्यातून राजकीय संबंध वाढतील. पण मनात अस्वस्थता वाटेल. अशावेळी रामरक्षा स्तोत्र म्हणा. सोनेरी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – ज्वारीची भाकरी, मका, घरचा पिष्टमय आहार

कन्या – आनंदाचे वातावरण
अनेक दिवस करीत असलेल्या मेहनतीचे फळ या आठवडय़ात मिळणार आहे. हवेमुळे श्वसनाचे विकार उद्भवतील. संध्याकाळनंतर बाहेर राहणे टाळा. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याचा योग येईल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. मंगलकार्य ठरेल. हिरवा रंग लाभदायी. घरात विवाहाची बोलणी होतील.

शुभ आहार – हिरव्या पालेभाज्या, चवळी, पालक

तूळ – उत्साहवर्धक आठवडा
आठवडा उत्साहवर्धक राहील. घसघशीत अर्थप्राप्ती होईल. पण अनावश्यक खर्च टाळा. पैसे उधळू नका. पित्ताचा त्रास संभवतोय. रात्रीचे जागरण टाळा. घरातील वादविवादांना आळा घाला. निळा रंग जवळ ठेवा. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. नवे साहित्य वाचनात येईल. त्यामुळे बौद्धिक भूक भागेल.
शुभ आहार – सात्विक पदार्थ, पेज, खिचडी

वृश्चिक – पैसा आणि समाधान
मनातील कटुता काढून टाका. जसे पाहाल तसे जग दिसेल. स्वतःला विधायक कार्यात गुंतवून घ्या. त्यातून पैसे आणि मानसिक समाधान दोन्ही लाभेल. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मनास उमेद मिळेल. भगवा रंग परिधान करा. मनोरंजन होईल. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल.
शुभ आहार – कडधान्ये, मटकी, मसूर

धनू – स्पर्धेत यश
समाजात पत प्रतिष्ठा वाढेल. मित्रमंडळींत लोकप्रिय व्हाल. आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. खेळाडूंसाठी आठवडा यशदायी ठरेल. स्नायूंचे दुखणे उद्भवते. व्यायाम, विश्रांती आणि आहार यांचा ताळमेळ साधा. स्पर्धेत यश मिळेल. आकाशी रंग जवळ बाळगा. नोकरदार व्यक्तींसाठी चांगला आठवडा.
शुभ आहार – प्रथिने, डाळी, मुगाची डाळ

मकर – मार्ग निघेल
हाती घेतलेले काम व्हायला अडथळे येतील. त्यामुळे काळजी आणि चिंता मनास व्यापून राहील. पण तुमचा कामाचा धडाका आणि धडाडी यामुळे मार्ग काढाल. घरातील छोटय़ा सदस्याचे आजारपण त्रास देईल. हृदयाची काळजी घ्या. कामातील यश दिलासा देणारे ठरेल. राखाडी रंग जवळ बाळगा.
शुभ आहार – सातूचे पीठ, चणा डाळ, बेसन

कुंभ – अनपेक्षित धनलाभ
मनाप्रमाणे घडेल. अनपेक्षित अर्थप्राप्ती. त्यामुळे नवा उत्साह जाणवेल. घरात अनावश्यक खर्च करावा लागेल. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करा. पायाचे दुखणे त्रास देईल. तिळाच्या तेलाने पायांचे मर्दन करून घ्या. अबोली रंग जवळ बाळगा. देवघरात एकमुखी रुद्राक्षाची प्रतिस्थापना करा.
शुभ आहार – गव्हाचे पदार्थ, दलिया, पोळी.

मीन – नवी उमेद
शुभ वर्तमान कानी येईल. त्यामुळे नवी उमेद जागी होईल. क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. मानमरातब मिळेल. मेहनत जीवतोड करावी लागेल. रात्रीची झोप पूर्ण घ्या. तब्येतीवर सकारात्मक परिणाम होईल. मनात चांगले विचार आणा. पांढरा रंग जवळ बाळगा. मारुतीची उपासना करा. सुयोग्य आहार घ्या.
शुभ आहार – फळे, सफरचंद, संत्रे

समस्या
सतत आर्थिक ताण जाणवत असेल, खिशात पैसे टिकत नसतील तर…
तोडगा
कुठेही बाहेर जाताना अंगरख्याच्या वरच्या खिशात नेहमी काही नोटा ठेवाव्यात. त्यामुळे पैसे राहतात. टिकतात. रिकाम्या खिशाने कधी बाहेर पडू नये.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या