साप्ताहिक राशिभविष्य 14 मार्च ते 20 मार्च 2020

4716

>> मानसी इनामदार

मेष – फायद्याची गुंतवणूक
प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घ्या. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. काही बाबतीत हट्ट सोडून द्या. पोवळे रत्न तांब्याच्या कोंदणात घाला. शुभ अलंकार – शिंपल्याचा दागिना, चांदी

वृषभ – यश मिळेल
तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्याने खूश असाल. कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी यशदायी आठवडा. हिरा रत्न शुभ ठरेल. शुभ अलंकार – मोहन माळ, सुवर्णफुल

मिथुन – पैसे येतील
या आठवडय़ात आरामात घरी राहण्याची संधी मिळेल. कुटुंबीयांसमवेत प्रदीर्घ सुट्टीचा आस्वाद घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ रत्न पाचू.
शुभ अलंकार – नथ, चांदीचा अलंकार

कर्क – आप्त भेटतील
घरातील व्यक्तींवर भरपूर पैसे खर्च होतील. त्यातून कौटुंबिक भावबंध दृढ होण्यास फायदाच होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल. गोमेद रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – पाटली, लक्ष्मी मुद्रा

सिंह – ऊर्जा मिळेल
पुण्यकर्म नेहमीच कामी येते. विशेषतः अन्नदान करा. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल. फसवणुकीचा धोका टळेल. अविवाहितांसाठी चांगली स्थळे येतील. गारनेट रत्न जवळ बाळगा.
शुभ अलंकार – फॅन्सी दागिने, घडय़ाळ

कन्या – पुस्तकांचे सान्निध्य
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. नव्या पुस्तकांची खरेदी होईल. त्याच्या नव्या सुगंधाने मन प्रसन्न होईल. साहित्यशास्त्रावर चर्चा होईल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीगाठी होतील. पाचू रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – रुद्राक्ष, सोन्याचा दागिना.

तूळ – चांगले दिवस
स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. मन कणखर ठेवा. आहारात बदल करा. सात्त्विक आहारावर भर द्या. तरुणाईसाठी चांगला आठवडा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अमेरिकन डायमंड जवळ ठेवू शकता.
शुभ अलंकार – मीनाकारीचे दागिने, पैंजण

वृश्चिक – उत्साह वाढेल
शैक्षणिक सहल घडेल. क्रीडा प्रकारात सहभागी व्हाल. रोजच्या कामाशी उत्साह वाढेल. आर्थिक व्यवहारांसाठी चांगला आठवडा. तुळशीचा काढा घ्या. पोवळे रत्न महत्त्वाचे ठरेल. शुभ अलंकार – केशालंकार, मोत्याची माळ

धनु – पैसे जपून ठेवा
अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्याचा आठवडा आहे. आपल्याकडील अतिरिक्त पैसे जपून ठेवा. कामाशी काम ठेवा. घरात वाद टाळा. पुष्कराज रत्न धारण करा.
शुभ अलंकार – तांब्याचे कडे, कवडी

मकर – योग्य दिशा
स्वतःविषयी नेहमी चांगला, शुभकारक विचार करा. त्यातून बरेच चांगले घडेल. उत्साह वाढेल. त्यातून कामाला योग्य दिशा मिळेल. अनेक नव्या गोष्टी या आठवडय़ात घडतील. नीलम रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – मंगळसूत्र, पंचधातूचे कडे

कुंभ – सुख वर्षा
संयम बाळगा. आपल्या निरंतर प्रयत्नांना यश मिळणार आहे. मनासारख्या गोष्टी घडतील. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील सुखांचा वर्षाव होईल. नीलम रत्न महत्त्वाचे.
शुभ अलंकार – टायपिन, ब्रोच

मीन – खर्चावर नियंत्रण
नव्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेकांची मने जिंकून घ्याल. घरातील गोष्टींसाठी बरेच पैसे व खर्च कराल. पुष्कराज खडा जवळ ठेवा.
शुभ अलंकार – फॅन्सी अंगठय़ा

आपली प्रतिक्रिया द्या