साप्ताहिक राशिभविष्य- 17 मार्च ते 23 मार्च 2019

>> मानसी इनामदार

मेष – नवी उमेद
आनंदाचा, खुशीचा, प्रवासाचा आठवडा, पण प्रवासात पैसे जपून खर्च करा. प्रिय व्यक्तीस भेटवस्तू द्याल. प्रलंबित अडचणी या आठवडय़ात सुटतील. त्यामुळे मनावरील मोठे दडपण उतरेल. नव्या कामाला सुरुवात होईल. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – कुर्ता, तुळशीची माळ.

वृषभ – कामातून यश
जोडीदाराच्या मनातील गोष्ट समजून घ्या. खूप धावपळीचा आठवडा असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. कलात्मक बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यातून अनपेक्षित लाभ होईल. तुमचा कामाचा झपाटा तुम्हाला यश मिळवून देईल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – शिफोंचे वस्त्र, कडे.

मिथुन – आठवणींचा प्रदेश
आपल्या कुटुंबाबाबत तुम्ही खूप भावनिक आहात. त्यांच्याबरोबर तुमचे भावबंधही दृढ आहेत. भूतकाळातील आनंदी क्षणांमध्ये रमाल. त्याचा भविष्य काळासाठी उपयोग करा. अबोली रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नाकातील अलंकार, अबोलीची फुले.

कर्क – सरकारी लाभ
शांततेचा आणि मौजमजेचा आठवडा. मित्रमैत्रिणींसमवेत बाहेर जाण्याचा योग. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल करण्याची संधी मिळेल. यात तुमच्या जोडीदाराची साथ लाभेल. सरकारी लाभ मिळतील. भगवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – अष्टगंधाचा टिळा, खादीचे वस्त्र.

सिंह – कौतुक होईल
खेळाडू त्यांच्या क्षेत्रात चमकतील. सरावात सातत्य ठेवा. त्यातून उत्साह आणि ऊर्जा दोन्ही वाढेल. तुमचे प्रयत्न आणि मेहनत यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कोणताही निर्णय उतावीळपणाने घेऊ नका. चंदेरी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, हिरा.

कन्या – बचत कराल
अल्पपरिचित लोकांशी जास्त सलगीने वागू नका. स्वतःविषयी जास्त माहिती कोणालाच देऊ नका. आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील गरजेचे सामान भराल. राणी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – गुलाबाचे फूल, चांदीची अंगठी.

तूळ – सामाजिक प्रतिष्ठा
भरपूर विश्रांती घ्या. म्हणजे नव्या जोमाने कामाला लागाल. रात्रीची झोप पूर्ण कराल. त्यामुळे उत्साह वाटेल. गोड पदार्थांचे सेवन कमी करा. सकाळी अनवाणी पायाने गवतावर चाला. तुमच्याविषयी लोकांना आदर वाटेल. हिरवा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – दवण्याचे पान, नखांना नेलपेंट.

वृश्चिक – कणखर राहा
स्वतःला कामात गुंतवा. काम हा कोणत्याही व्याधीवरील अचूक उपाय आहे. मानसिकदृष्टय़ा स्वतःला कणखर ठेवा. शेअर बाजारात गुंतवणूक करा. दामदुपटीने पैसे परत मिळतील. कौटुंबिक जबाबदाऱया टाळू नका. केशरी रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – दुपट्टा, पुरुषांसाठी धोतर.

धनु – सोने खरेदी
जोडीदारावरील विश्वास अबाधित ठेवा. बाहेरच्या व्यक्तीस फार जवळ येऊ देऊ नका. दूरच्या प्रवासात जवळील मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या. वरिष्ठांकडून कौतुक होईल. पिस्ता रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – गळ्यात साखळी, डिझायनर चष्मा.

मकर – जमीन खरेदी
गावाहून आलेल्या बातमीमुळे मन सुखावून जाईल. मुलांच्या बाबतीत समाधानी राहाल. व्यवसायधंद्यात चढउतार येतील. पण निराश होऊ नका. तुम्ही नवी जमीन खरेदी कराल. जलपूजन करा. घरात शांतता राहील. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – पेन, घडय़ाळ.

कुंभ – स्थिर मन
हा आठवडा संस्मरणीय ठरेल. स्नेहसंमेलनात भाग घ्याल. करमणुकीवर प्रमाणाबाहेर खर्च करू नका. वाचनात मन रमेल. नवे साहित्य वाचनात येईल. लाल रंग जवळ बाळगा. भूतकाळातील व्यक्ती भेटेल. जुन्या आठवणीत रमाल. मन स्थीर ठेवा.
शुभ परिधान – चामडय़ाच्या पट्टय़ाचे घडय़ाळ, चाफ्याची फुले.

मीन – गप्पांचा फड
विनाकारण खर्च करू नका. आजची गुंतवणूक उद्याचा आधार असेल. बाहेरगावी जाण्याचा योग येईल. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यांच्या कलेने घ्या. कोणालाही दुखवू नका. गप्पांचा फड जमेल. तुमचे म्हणणे सर्वांना पटेल. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मोगरा, हातात सुवर्णालंकार.

  • समस्या – माझी व्यवसायात प्रगती होत नाही. काही लोकांकडे पैसे अडकले आहेत. ते अजून परत देत नाहीत. घरात लक्ष्मी कशी नांदेल, मार्गदर्शन करा.
  • तोडगा – कामाच्या ठिकाणी पैसे जिथे ठेवता तिथे लक्ष्मीमातेची प्रतिमा असलेले नाणे पूजा करून ठेवा. सायंकाळी देवासमोर 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा.
आपली प्रतिक्रिया द्या